सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला येथे टेक्निशियन्सच्या ४ जागा 
अर्जदारांनी कृषी व फलोत्पादन विषयांसह शालान्त परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल पोटॅटो इन्स्टिटय़ूट, सिमलाची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://ccri.ernet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला (हिमाचल प्रदेश) १७१ ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१४.

पूर्व-तटीय रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ४६ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत व त्यांनी अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, फुटबॉल, भारोत्तोलन, हॉकी, क्रिकेट, शरीरसौष्ठव यांसारख्या क्रीडा प्रकारांत ऑलिम्पिक, राष्ट्रकुल वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २८ डिसेंबर २०१३ ते ३ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व-तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज ‘दि असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट) दुसरा मजला, साऊथ ब्लॉक, रेल सदन, मंचेस्वर, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर ७५१०१७’ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४.

‘डीआरडीओ’अंतर्गत डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल अँड अलाइड रिसर्च- नवी दिल्ली येथे ५ संशोधनपर फेलोशिप
अर्जदारांनी बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोमेडिकल सायन्सेस, लाइफ सायन्सेस वा इलेक्ट्रॉनिक यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ची जाहिरात पाहावी.
पात्रताधारक उमेदवारांनी डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजी अँड अलाइड रिसर्च, डीआरडीओ, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली ११० ०५४ येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१४.

औरंगाबाद कँटॉनमेन्ट बोर्डात कारकुनांच्या ४ जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर व एमएस- सीआयटी पात्रताधारक असायला हवेत. टंकलेखनाची पात्रता असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली औरंगाबाद कँटॉनमेंट बोर्डाची जाहिरात पाहावी अथवा http://oasis.mkcl.org/cantonment या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१४.

भारतीय वायुदलात कारकुनांसाठी ५ जागा
अर्जदार बारावी व टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २८ डिसेंबर २०१३ ते ३ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडिंग ऑफिसर, एअर फोर्स स्टेशन, कॉटनग्रीन, मुंबई ४०००३३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०१४.