अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ ऑक्टोबर -१ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज असिस्टंट पसरेनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), रेल्वे रिक्रुटमेंट सेल, दक्षिण पूर्व रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकाता ६०००४३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१३.

अकाउण्टण्ट जनरल- राजस्थान येथे खेळाडूंसाठी ९ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यानी हॉकी, क्रिकेट, फुटबॉल यासारख्या विषयांत राष्ट्रीय नैपुण्य प्राप्त केलेले असावे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २६ ऑक्टोबर- १ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली अकाउण्टण्ट जनरल-राजस्थान यांची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी अकाउण्टण्ट जनरल (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), प्रिन्सिपल अकाउण्टण्ट जनरल (ए. अण्ड. ई) राजस्थान, जनपथ, जयपूर, ३०२००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१३.

एनएमडीसीमध्ये कुशल कामगारांच्या ९० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ९ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एनएमडीसी’ची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील व तपशीलवार भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (पसरेनेल) आर अ‍ॅण्ड पी, बेलाडिला आयर्न ओर माइन, किरनाडुल कॉम्प्लेक्स, पोस्ट किरनाडुल, दांतेवाडा, जि. दक्षिण बस्तर ४९४५५६ (छत्तीसगड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१३.

सैन्यदलात बारावी उत्तीर्णासाठी ८५ जागा
अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह व चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा १९.५ वर्षे.
अधिक महिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
२९ नोव्हेंबर २०१३.

रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉपरेरेशन: आयटी  इंजिनीअर्सच्या चार जागा
अर्जदारांनी संगणक विज्ञान अथवा माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयातील बीई/ बीटेक् अथवा एमसीए पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ९ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉपरेरेशची जाहिरात पाहावी अथवा आरईसीच्या http://www.recindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.

पॉवर ट्रान्समीशन कॉपरेरेशनमध्ये सिव्हिल इंजिनीअर्सच्या ४ जागा
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग-मधील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली पॉवर ट्रान्समीशन कॉपरेरेशन ऑफ उत्तराखंडची जाहिरात पाहावी अथवा कॉपरेरेशनच्या http://www.ptcul.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर (एचआर) पॉवर ट्रान्समीशन कॉपरेरेशन ऑफ उत्तराखंड लि, विद्युत भवन, आयएसबीटी क्रॉसिंग, शाहरणपूर रोड, माजरा-देहराडून- २४८००२ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.