रोहिणी शहा

या लेखामध्ये सन २०१७पासून पूर्वपरीक्षेमध्ये इंग्रजी भाषेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या आधारे तयारीसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे. तर दोन्ही भाषा विषयांमधील अभ्यासक्रम व तयारीचे मुद्दे एकसारखे असल्याने त्यांच्या तयारीबाबत एकत्रित चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येईल.

मागील प्रश्नपत्रिकांमधील इंग्रजी व्याकरणाचे काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

(योग्य उत्तरांचे पर्याय ठळक केले आहेत.)

Que 1. Match the following sentences with correct prepositions to fill in the blanks

  1. to I. The river flowed _______ a bridge.
  2. after II. The repairs ____ the roof were completed quickly.
  3. with III. _______ the party we did a lot of washing—up.
  4. under IV. The bad tempered man replied ______ a grunt.

a      b      c      d

  1. r) IV I       III     II
  2. s) II III     IV    I
  3. t) II III     I       IV
  4. u) I IV    II      III

 

Que 2. I met unexpectedly an old friend yesterday at the bus station.

Select the correct alternative that could replace the underlined part meaningfully

(r) caught at. (s) came across

(t) waited on (u) went by

 

Que 3. Choose the correct word which is the most opposite to the meaning of the underlined word in the sentence.

At night much of the activity comes to rest.

  1. r) cessation s) tranquility
  2. t) pause u) exertion

 

Que 4. Identify the correct sentence.

  1. She got up when the alarm clock went off.
  2. Erika had dropped her bag while she was getting into her car
  3. It was the first time Ild talked to Ella outside the office.
  4. She will be taking up her place at University in October

(r) a and c      (s) band d

(t) a, c and d          (u) b, c and d

 

Que 5. Choose the appropriate pair to fill in the blanks in both the given sentences.

  1. Measles is highly ——
  2. England is the only country to —— Wales

(r) contagious, contagious

(s) contiguous, contagious

(t) contagious, contiguous

(u) contiguous, contiguous

 

Que 6.  ___________ parents sat up half the night.

Which one of the following correctly fills the blank in the above sentence ?

(r) Both of                (s) Both the

(t) The both              (u) Both

 

Que 7. He is a man of the world. His honest advice will help us a lot.

Identify the correct meaning of the underlined.

  1. r) an important person
  2. s) an experienced person
  3. t) a social person
  4. u) genius

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

व्याकरणावर पाच आणि उताऱ्यावर पाच अशी प्रश्नांची विभागणी आहे.

व्याकरणावरील प्रश्नांमध्येही समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांवर जास्त भर असलेला दिसून येतो. त्यानंतर वाक्प्रचार व म्हणी व नंतर वाक्यरचना व इतर नियम अशा क्रमाने अभ्यासक्रमातील मुद्दय़ांना महत्त्व देण्यात आलेले दिसून येते.

बारावीपर्यंतच्या अभ्यासात इंग्रजी व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर सहजपणे सोडविता येतील अशी व्याकरणावरील प्रश्नांची काठीण्य पातळी आहे.

समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यातील शब्दप्रयोग यांचे प्रश्न पाहता मूलभूत व्याकरणाची  उजळणी आणि रोजचे वचन असेल तर आत्मविश्वासाने सोडविता येतील असे आहेत हे लक्षात येते.

रोजचे पेपर वाचन किंवा इतर कोणतेही इंग्रजी वाचन (व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील पोस्ट्स बिलकूल नाही) तयारीसाठी उपयोगी ठरेल.

उताऱ्यांची शब्दमर्यादा १०० पासून ३५० शब्दांपर्यंत अशी कोणतीही असू शकते हे या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून दिसून येते. त्यामुळे ज्या वर्षी कमी शब्दांचा उतारा त्या वर्षी वेळेचा बोनस मिळातो. पण उताऱ्याची लांबी जास्त असेल तरी प्रश्न हे खूप जास्त कठीण नसल्याने गुणांवर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि सराव झालेला असणे आवश्यक आहे.

या विश्लेषणाच्या आधारे दोन्ही भाषा विषयांच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.