इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेन, दिल्ली येथे खास महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या अभियांत्रिकी विषयातील पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व संशोधनपर पीएचडीसाठी  पात्रताधारक विद्यार्थिनींकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
बीटेक पदवी अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थिनींनी बारावीची परीक्षा कमीत कमी ८५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा ‘जेईई’ दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड संगणकीय पद्धतीने करण्यात येईल.
एमटेक- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थिनींनी अभियांत्रिकीमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘जीएटीई’ ही प्रवेश-पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘गेट’ पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येईल.
संशोधनपर पीएचडी : अर्जदार विद्यार्थिनींनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची आवड असायला हवी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थिनींना ‘रिसर्च अॅप्टिटय़ूड टेस्ट’ व त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेन’ची जाहिरात पाहावी अथवा युनिव्हर्सिटीच्या http://www.igdtuw.ac.in  अथवा http://www.igit.ac.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१४ आहे.