29 September 2020

News Flash

पर्यावरणविषयक संशोधन संधी

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉनमेंट हेल्थ, भोपाळ येथे खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत

| December 22, 2014 01:15 am

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉनमेंट हेल्थ, भोपाळ येथे खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या व तपशील : तंत्रज्ञ पदाच्या चार जागा. यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव.
आवश्यक पात्रता व अनुभव : उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. त्यांना वैद्यकीय-तांत्रिक विषयक कामाचा अनुभव असायला हवा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यावरून त्यांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांची भोपाळच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थ येथे टेक्निशियन म्हणून दरमहा ५,२००-२०,२००+१,९०० या वेतनश्रेणीत नेमणूक होईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभही देय असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहितीसाठी भोपाळच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थच्या www.nireh.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अंतिम मुदत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थ, गांधी मेडिकल कॉलेज परिसर, ४६२००१ या पत्त्यावर २ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:15 am

Web Title: environmental research opportunities
Next Stories
1 कृषी व सहकार मंत्रालयात संधी
2 वन-व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका
3 तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी
Just Now!
X