News Flash

साथीचे रोग नियंत्रण कार्यक्रम

आजारी व्यक्ती ओळखून त्वरित औषध उपचार केले जातात.

जलजन्य आजारांचे दैनंदिन स्वरूपातील संनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य साथीचे रोग नियंत्रण कार्यक्रमार्फत केले जाते. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण केले जाते. आजारी व्यक्ती ओळखून त्वरित औषध उपचार केले जातात.

उद्दिष्टे

जलजन्य आजारांचे उद्रेक टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे. जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेस वेळोवेळी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देणे.

  • पाणी गुणवत्ता नियंत्रण.
  • ब्लिचिंग पावडर गुणवत्ता नियंत्रण.
  • जलजन्य आजार टाळण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे आरोग्य शिक्षण.
  • पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास आणि नागरी विकास विभागाशी आंतरविभागीय समन्वय.

अंमलबजावणी

राज्यस्तरावरील साथ रोग नियंत्रण कक्षामार्फत राज्यातील साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, पर्यवेक्षण केले जाते. सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था उपकेंद्र स्तरापासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व संस्था साथरोग नियंत्रणात क्रियाशील सहभाग घेतात.

उपयायोजना

  • जलजन्य आजाराचे उद्रेक टाळण्यासाठी या कार्यालयामार्फत कृती योजना तयार करून कार्यवाही करण्यात येते. पाणीपुरवठय़ाच्या पाइपमधील असलेल्या गळती शोधणे व दुरुस्ती करण्यात येते. सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची जिल्हा, राज्य आरोग्य प्रयोग शाळांमार्फत नियमित तपासणी करण्यात येते.
  • ग्रामपंचायत नगरपालिका/महानगरपालिका अथवा जिल्हा परिषद यांच्या अंदाजपत्रकात ब्लिचिंग पावडरच्या खरेदीबाबत पाठपुरावा करणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:51 am

Web Title: epidemic disease control programme
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : शिक्षणशास्त्रातील अभ्यासासाठी..
2 मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना
3 नोकरीची संधी
Just Now!
X