एमपीएससी मंत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक (गट ब- अराजपत्रित) या पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि तयारीविषयक मार्गदर्शन.

India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

राज्याच्या  प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख केंद्र मंत्रालय आहे हे आपणा सर्वानाच माहिती आहे. सहायक पदे फक्त बृहन्मुंबईस्थित विविध मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयीन नियुक्तीकरताच आहेत. ज्येष्ठता व पात्रतेनुसार कक्ष अधिकारी व त्यावरील पदांकरता पदोन्नती होते. शासनाच्या विविध विभागांतील असंख्य विषयांवरील अर्जाची छाननी करणे, शासकीय नियम व आदेशांनुसार त्यांच्यावरील सुयोग्य कार्यवाहीचे शब्दांकन करून मांडणी करणे, तसेच लिपिक वर्गाच्या कार्याचे निरीक्षण करणे अशी अनेक कामे सहायकपदास पार पाडावी लागतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक (गट ब- अराजपत्रित) या पदासाठी स्वतंत्र परीक्षेद्वारे तर कक्ष अधिकारी (गट ब- राजपत्रित) या पदासाठी राज्यसेवा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबवली जाते. अलीकडेच आयोगाने २०१६ साली घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यसेवा परीक्षेची जाहिरातदेखील आली आहे. तसे पाहता, कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासक्रमात केवळ काही भागच भिन्न असतो. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पायाभूत समजून अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यसेवा परीक्षा सोडून इतर परीक्षांच्या दीड महिना अगोदर केवळ त्या परीक्षेसंबंधित असलेल्या वेगळ्या अभ्यासक्रमासाठी दररोज साधारणत: तीन तासांचा वेळ दिल्यास अनेक परीक्षांत कोणत्याही दडपणाशिवाय सहज यश मिळवता येऊ शकते. आयोगाचे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास असा वेळ बाजूला काढणे तुम्हाला शक्य आहे.

सहायक परीक्षेचे टप्पे

  • पहिला टप्पा- पूर्वपरीक्षा (१०० गुण)
  • दुसरा टप्पा- (२०० गुण )

अंतिम निवडीच्या वेळी पूर्वपरीक्षेचे गुण ग्राह्य़ धरत नाहीत. आजच्या या लेखात आपण पहिल्या टप्प्याबाबत पूर्ण माहिती समजून घेऊ.

पहिला टप्पा : पूर्वपरीक्षा 

सहायक परीक्षेचा पारंपरिक ढाचा बदलून नव्या आकृतिबंधानुसार गतवर्षीच्या परीक्षा पार पडल्या. खुल्या प्रवर्गातून मुख्य परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या शेवटच्या उमेदवाराला पूर्वपरीक्षेत १०० पकी ४३ गुण मिळाले होते. इतर संवर्गातील यशस्वी विद्यार्थ्यांचे गुण थोडय़ाफार फरकाने असेच होते. यावरून आपल्याला पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाचा आणि काठिण्य पातळीचा अंदाज येईल.

पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा तपशील 

  • विषय- सामान्य क्षमता
  • प्रश्नसंख्या – १००
  • एकूण गुण- १००
  • अर्हता- पदवी
  • माध्यम- मराठी व इंग्रजी
  • परीक्षेचा कालावधी- एक तास
  • ऋण गुणांकन- २५ टक्के

प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एक गुण एकूण प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येतो.

पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम

  • चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील.
  • नागरिकशास्त्र- राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व ग्रामीण प्रशासन.
  • आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इ.
  • अर्थव्यवस्था (भारतीय)- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इ. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इ.
  • सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.

गतवर्षीच्या परीक्षेत एकूण २३ प्रश्न बहुविधानात्मक पर्यायांचे होते.

संदर्भसाहित्य सूची

  • चालू घडामोडी- िहदू दैनिक, लोकराज्य, योजना, करंट ग्राफ.
  • नागरिकशास्त्र- एनसीईआरटीची राज्यशास्त्रावरील सर्व पुस्तके, भारतीय राज्यघटना- डी. डी. बसू (मराठी), भारत की राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत (िहदी/इंग्रजी.)
  • इतिहास- एनसीईआरटीची सातवी ते बारावीची पुस्तके, राज्य शिक्षण मंडळाची पाचवी, आठवी व अकरावीची पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास-ग्रोव्हर, बेल्हेकर मराठी)
  • भूगोल- एनसीईआरटीची सहावी ते बारावीची पुस्तके, महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, इंडिया इअर बुकमधील पाठ.
  • अर्थव्यवस्था- एनसीईआरटीची अकरावीची पुस्तके, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, इंडिया इअर बुकमधील पाठ.
  • विज्ञान- एनसीईआरटीची सहावी ते बारावीची पुस्तके, राज्य शिक्षण मंडळाची नववी ते बारावीची पुस्तके.
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित- स्पर्धापरीक्षा बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताची पुस्तके, Quantitative Aptitude – आर. एस. अग्रवाल.

सरावासाठी एमपीएससी व यूपीएससीच्या गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका व टाटा मॅकग्रा हिलच्या विषयानुरूप प्रश्नसंच वापरावेत. पुढील लेखात आपण सहायक मुख्य परीक्षा आणि या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन यासंबंधी माहिती घेऊ.

विश्लेषणाची निकड

सहायक पूर्वपरीक्षेच्या नव्या आकृतिबंधातील बहुविधानात्मक प्रश्न सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता असते. जास्त  प्रश्न सोडवताना किंवा घाईगडबडीत हे प्रश्न हमखास चुकण्याची शक्यता असते. म्हणूनच सखोल अभ्यास व अशा प्रश्नांचा सराव आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी

सर्वप्रथम विषयवार अभ्यासक्रम स्वत: लिहून काढावा. त्यानंतर प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाखाली मागील तीन वर्षांच्या परीक्षांमध्ये आलेले त्यासंबंधित सर्व प्रश्न उत्तरांसहित लिहून काढावेत. या विश्लेषणामुळे अभ्यासाची दिशा अधिक नेमकी होते.

पूर्वपरीक्षेचे विश्लेषण- सहायक पूर्वपरीक्षा २०१५ चे विश्लेषण

MPSC-chart