छोटय़ा कामांना वेळ देत दिवसभर कार्यक्षम राहू शकता. यासाठी-
प्रथम मोठय़ा कामावर लक्ष केंद्रित करा, त्याचे छोटे-छोटे भाग करा. त्यातील एक जरी भाग पूर्ण झाला तरी तुमचे काम पुढे सरकले असे म्हणता येईल.
ई-मेल्स, फोन कॉल्स इत्यादी गोष्टींसाठी तुमच्या प्रवासाचा वेळ उपयोगात आणा.
काही कामे एकत्रितपणे उरकता येतात. त्यामुळे बराच वेळ वाचतो.
याशिवाय वेळेच्या व्यवस्थापनासाठी काही उपयुक्त तंत्रांचा वापर करता येईल-प्रारंभापासूनच काम योग्य पद्धतीने करा. पुन:पुन्हा तेच काम करणे महागात पडते. त्यात फार वेळ जातो.
प्रत्येक कागद, पत्र यासंबंधित कामे लांबणीवर टाकू नका वा दुसऱ्यांवर सोपवूही नका. त्यामुळे काम बिघडत जाण्याचीच शक्यता अधिक.
कार्यक्रम ठरवताना निश्चित धोरण ठेवा. तुमच्या सुविधा, बैठका इ. निश्चित करा. तुमची सोय ही महत्त्वाची!
प्रत्येक दिवशी व आठवडय़ात जी कामे करायची त्याची जंत्री तयार करा. तातडीची कामे कधी करायची, हे निश्चित करा, यामुळे महत्त्वाच्या कामासाठी वेळ राखून ठेवता येईल.
लवचिकता हवी. कितीही काटेकोरपणे वेळापत्रक ठरवले तरी आयत्या वेळी पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींसाठी वेळ राखून ठेवावाच लागेल. यासाठी तुमच्याजवळ उपलब्ध वेळेबाबत योग्य दृष्टिकोन असला पाहिजे.
इतरांची मदत घ्या. सर्व गोष्टी एकटय़ाने करता येत नाहीत.