मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठ आणि संशोधन संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी  पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत-
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तींची एकूण संख्या ६० असून यापैकी ५४ शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या, ४ शिष्यवृत्ती विमुक्त जमातीच्या तर २ जागा कृषी मजुरांच्या मुलांसाठी उपलब्ध आहे.
शिष्यवृत्तींची विषयवार वर्गवारी : उपलब्ध ६० शिष्यवृत्तींमध्ये २० शिष्यवृत्ती अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्रांसाठी तर प्रत्येकी १० शिष्यवृत्ती विज्ञान, कृषी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अकाऊंटिंग, वित्त व सामाजिक शास्त्र या विषयांसाठी आहेत.
शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
० संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदारांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
० पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांसह पदवी परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
० अर्जदारांनी विदेशी विद्यापीठ वा संशोधन संस्थेत संबंधित अभ्यासक्रमाच्या २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांच्या सत्रात रीतसर प्रवेश घेतलेला असावा.
उत्पन्न मर्यादा : अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तीचा कालावधी : योजनेंतर्गत संशोधनपर पीएच.डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा कालावधी चार वर्षे तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी तीन वर्षांचा आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शैक्षणिक कालावधीसाठी वार्षिक १५,४०० अमेरिकन डॉलर्स अथवा ९,९०० ब्रिटिश पाऊंड्सची शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय संबंधित विद्यार्थी वैयक्तिक पातळीवर शैक्षणिक काम करण्यास पात्र असतील.
अधिक माहिती : योजनेंतर्गत तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची जाहिरात पाहावी अथवा केंद्रीय समाजकल्याण मंत्रालयाच्या http://www.socialjustice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एसीडी-व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट, रूम नं. २५३, ए विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर १६ जुलै २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.