नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट स्टडीज, नवी दिल्ली येथे संशोधकांच्या २ जागा

वयोमर्यादा- ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  www.nistads.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

केंद्र सरकारच्या प्रशिक्षण व कौशल्य विकास विभागात प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या १० जागा

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १५ एप्रिल २०१६ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  www.upsc.gov.in किंवा  www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २८ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी, पुणे येथे रिसर्च फेलोशिपसह ७ जागा

www.tmpnet.res.in/careers या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

एमएनटीसीमध्ये डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंटसच्या) ६ जागा.

वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी एमएनटीसीच्या www.mntclimited.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल  पदाच्या ४४ जागा

शैक्षणिक आणि तणावमुक्ती विषयक कॉन्स्टेबल  पदांवर नेमणूक करण्यात येणार आहे. अर्जदारांनी मानसशास्त्र विषयासह पदवी घेतलेली असावी अथवा शिक्षणशास्त्र विषयासह पदवीधर असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा- २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर हेड क्वार्टर, इंडो- तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, ओल्ड ए. पी. सेक्रेटरीएट बिल्डिंग, कँटॉनमेंट एरिया, शिलाँग- ६९३००१  या पत्त्यावर  २९ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावा.

सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, अलाहाबाद येथे फायरमनच्या २७ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमन विषयक प्रशिक्षण प्राप्त असावेत. वयोमर्यादा- २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ एप्रिल २०१५ च्या अंकातील जाहिरात पाहावी.

अर्ज जनरल मॅनेजर सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, चीओकी, अलाहाबाद- २१२१०५, उत्तर प्रदेश या पत्त्यावर  ३० एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

डायरेक्टोरेट जनरल, सीमा सुरक्षा दल, नवी दिल्ली येथे पदभरती.

या २६ जागा हेड कॉन्स्टेबल (स्टॉकमन वा कंपाऊंडर) पदांसाठी आहेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा सीमा सुरक्षा दलाच्या ६६६.ु२ऋ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

हवाई दल- मेंटेनन्स मुख्यालय, नागपूर येथे सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या ४ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांना संबंधित कामाचा किमान वर्षभराचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडिंग ऑफिसर (मेंटेनन्स कमांड) हवाई सेना नगर, नागपूर- ४४०००६ या पत्त्यावर १ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल म्हणून खेळाडूंसाठी ३७५ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा- २३ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह असिस्टंट डायरेक्टर (स्पोर्टस्), फोर्स हेडक्वार्टर, सशस्त्र सीमा बल, ईस्ट ब्लॉक- ५, आर. के. पुरम,  नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर १ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

सिडकोमध्ये सीनिअर डेव्हलपमेंट ऑफिसर पदांची भरती

अधिक माहितीसाठी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

गेल (इंडिया) लि. मध्ये राजभाषा अधिकाऱ्यांच्या ३ जागा

अधिक माहितीसाठी गेल (इंडिया)च्या www.gailonline.com kcareersl या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा