आपल्याकडे परदेशातील उच्च शिक्षणाबाबत असलेली जागरूकता आता मोठय़ा प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थी पदवी शिक्षण घेतानाच परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कंबर कसतात. परदेशी विद्यापीठातील प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षांच्या मांडवाखालून जावे लागते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी द्याव्या
लागणाऱ्या जीआरई, जीमॅट, सॅट, टोफेल किंवा आयईएलटीएस यांसारख्या प्रवेश परीक्षांची  तोंडओळख..
जीआरई  (GRE- Graduate Records Exam)
जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये (ग्रॅज्युएट स्कूल्समध्ये) पदव्युत्तर व पीएच.डीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेिस्टग सíव्हस’ या संस्थेतर्फे
ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्टय़ म्हणजे अमेरिकेमध्ये तसेच काही इतर देशांमध्येही  व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएच.डी.च्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून  परीक्षार्थीचे विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या साहाय्याने देता येते. मात्र, ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख घटक आहेत-
* इंग्रजीचे ज्ञान (Verbal Reasoning) – या विभागात परीक्षार्थीचे  इंग्रजी भाषेचे ज्ञान अजमावले जाते.  हा विभाग अजून दोन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. या प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी अध्र्या तासाचा अवधी असतो. शब्द व वाक्यांमधील संबंध, विविध शब्दांमधील सहसंबंध अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. ‘जीआरई’ची गुणांकन पद्धत खूप वेगळी आहे. या विभागासाठी किमान गुण १३० तर कमाल १७० गुण असतात. त्या दरम्यान, एकेका गुणाची वाढ
होऊ शकते.
* गणिती क्षमता (Quantitative Reasoning)- या विभागात परीक्षार्थीच्या संख्यात्मक क्षमता म्हणजे गणित व भूमितीमधील मूलभूत कौशल्ये जाणून घेतली जातात. हा विभागही दोन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. इथेही प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात. त्यासाठी ३५ मिनिटे वेळ दिलेला असतो. या विभागाचे गुणांकनही १३०-१७० च्या टप्प्यात केले जाते.
* विश्लेषणात्मक लेखन (Analytical Writing) – या विभागात परीक्षार्थीचे  विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जाते. या विभागात फक्त दोन प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्नासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन ०-६ च्या टप्प्यात केले जाते. त्यामध्ये अध्र्या गुणाची वाढ होऊ शकते.
या परीक्षेचा कालावधी एकूण पावणेचार तासांचा असतो. ‘जीआरई’चे गुणांकन एकूण पाच वर्षांसाठी वैध असते. ‘जीआरई’ परीक्षेचे एकूण शुल्क १९५ अमेरिकी डॉलर आहे. परीक्षार्थी संगणकावरील आधारित ‘जीआरई’ परीक्षा एका वर्षांत कितीही वेळा देऊ शकतो. मात्र सलग दोन परीक्षांमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर असावे लागते. लिखित ‘जीआरई’ परीक्षा मात्र वर्षभरातून फक्त तीन वेळा तीसुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी याच महिन्यांत देता येते. परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर लगेचच समोर दिसतो. अधिकृतरीत्या मात्र तो १५ ते २० दिवसांत परीक्षार्थीने दिलेल्या पत्त्यावर पाठवला जातो. त्यानंतर ‘जीआरई’चे गुण थेट विद्यापीठाला न कळवता ETS  (Educational Testing Service) मार्फत
कळवावे लागतात.

टोफेल TOEFL (Test of English as a Foreign Language)
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘जीआरई’ किंवा ‘जीमॅट’सारखीच द्यावी लागणारी ‘टोफेल’ ही इंग्रजीची परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा विद्यार्थ्यांना ‘टोफेल’ ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ‘जीआरई’ व ‘सॅट’सारखी ‘टोफेल’ ही परीक्षासुद्धा अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेिस्टग सíव्हस’ या संस्थेकडून घेतली जाते. ‘टोफेल’ ही इंटरनेट आधारित परीक्षा (IBT-internet Based test) आहे, म्हणून बऱ्याचदा ‘टोफेल’ परीक्षेचा उल्लेख TOEFL-iBT असाही केला जातो. मात्र, अजूनही ही परीक्षा लिखित स्वरूपातदेखील घेतली जाते.
‘टोफेल’ ही इंग्रजीची परीक्षा असल्याने तुलनेने ‘जीआरई’ व ‘जीमॅट’पेक्षा सोपी असते. ‘टोफेल’ परीक्षेत एकूण चार विभाग आहेत. प्रत्येक विभागास ३० गुण आहेत. म्हणजेच एकूण ‘टोफेल’ ही
१२० गुणांची परीक्षा असते.
* वाचन – या विभागात चार ते सहा उतारे दिलेले असतात आणि त्यावर १२-१४ विचारलेले प्रश्न असतात. हे उतारे शैक्षणिक विषयांवर आधारित असतात. साधारणपणे कारण-परिणाम किंवा तुलनात्मक विरोधाभास याबाबत समज असल्यास हे उतारे सहजपणे परीक्षार्थी सोडवू शकतो. या विभागासाठी एकूण वेळ ६०-१०० मिनिटांचा असतो. त्याचे गुणांकन ०-३० या टप्प्यात केले जाते.
* श्राव्य चाचणी (Listening)- या विभागामध्ये एकूण सहा ते नऊ उतारे असतात, ज्यात प्रत्येकी पाच ते सहा प्रश्न असतात. या विभागासाठी एक ते दीड तास एवढा वेळ दिलेला असतो. वरील दोन्ही विभागानंतर मात्र १० मिनिटांचा अनिवार्य विराम असतो.
* वक्तृत्व – या विभागामध्ये एकूण सहा प्रश्न असतात आणि परीक्षार्थीला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना अर्थातच इंग्रजी बोलण्याची सवय असणे अत्यावश्यक आहे. या सहा प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी २० मिनिटांचा
वेळ असतो.
* लेखन- या विभागामध्ये एकूण दोन प्रश्न असतात. एका प्रश्नामध्ये दिलेल्या विषयावर स्वत:ची मते व्यक्त करणारे निबंधलेखन करायचे असते आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एक संवाद ऐकून त्यावर आधारित लेखन करणे आवश्यक आहे. या विभागासाठी ५० मिनिटांचा अवधी असतो. या विभागाचेही गुणांकन ०-३० या टप्प्यात केले जाते.
‘टोफेल’ परीक्षेचा एकूण कालावधी हा सव्वातीन ते सव्वाचार तासांचा असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षांत ‘टोफेल- आयबीटी’ ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो, मात्र दोन परीक्षांमध्ये किमान १२ दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे.
या परीक्षेचे एकूण शुल्क १६० ते २५० अमेरिकी डॉलर्सच्या दरम्यान आहे. जगभरातील १६५ देशांमध्ये या परीक्षेची साडेचार हजारांहून अधिक परीक्षा
केंद्रे आहेत.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…

सॅट (SAT)
या परीक्षेला पूर्वी स्कोलास्टिक अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (सॅट) या नावाने ओळखले जायचे. आता ETS ने
या परीक्षेचे नाव बदलून ‘सॅट’ असेच केलेले आहे. ही परीक्षादेखील ‘एज्युकेशनल टेिस्टग सíव्हस’ (ETS) या संस्थेकडून घेतली जाते. आपल्याकडील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही
परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेत गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक लेखन तपासले जाते. तसेच परीक्षेचे एकूण गुणांकन ६००-२४०० गुणांच्या पातळीवर केले जाते. ‘सॅट’ परीक्षेचे तीन घटक आहेत-
* इंग्रजी वाचन (Critical Reading) – या घटकामध्ये तीन उपविभाग असून त्यात विविध प्रकारचे प्रश्न असतात. यातील प्रत्येक  उपविभाग सोडविण्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ मिनिटांचा कालावधी असतो.
* गणित- गणित विभागामध्येही वरील इंग्रजी विभागासारखेच उपविभागांचे आणि प्रश्नांचे वितरण केलेले आहे.
* विश्लेषणात्मक इंग्रजी लेखन-
या विभागात निबंध लेखन व इतर विविध प्रकारच्या विश्लेषणात्मक लेखनाची चाचणी घेतली जाते.
‘सॅट’ परीक्षेचा एकूण कालावधी ‘जीआरई’सारखाच पावणेचार
तासांचा आहे. ‘सॅट’चे गुणांकनदेखील पाच वर्षांसाठी वैध असते.
परीक्षार्थी ‘सॅट’परीक्षा एका वर्षांत सात वेळा देऊ शकतो. २०१६ मध्ये मात्र
या परीक्षेचे स्वरूप बदलणार आहे. या परीक्षेचे एकूण शुल्क परीक्षार्थीच्या नागरिकत्वावर अवलंबून आहे.
भारतीय परीक्षार्थीना हे शुल्क
१०० अमेरिकी डॉलर एवढे आहे.

जीमॅट  (GMAT Graduate Management Admission Test)
जीमॅट ही उद्योग व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असणारी प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा जीमॅक अर्थात ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट अ‍ॅडमिशन कौन्सिल  या संस्थेतर्फे घेतली जाते. जगभरातल्या साधारणत: ११४ देशांमध्ये ‘जीमॅट’ परीक्षा केंद्रे आहेत. ‘जीमॅट’बद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेला गरसमज म्हणजे उद्योजकीय कौशल्ये व निर्णयक्षमता यांचे पृथक्करण ‘जीमॅट’ परीक्षेतून केले जाते. प्रत्यक्षात मात्र या परीक्षेत परीक्षार्थीचे संख्यात्मक व विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व इत्यादी तपासले जाते. ही परीक्षा संगणकाच्या साहाय्याने देता येते. ‘जीआरई’ आणि ‘जीमॅट’ परीक्षांमध्ये काही विभाग समान आहेत, मात्र त्यांचे गुणांकन आणि उपलब्ध वेळ यामध्ये फरक आहे. या परीक्षेचे प्रमुख चार घटक आहेत-
* विश्लेषणात्मक लेखनाची चाचणी (Analytical Writing Assessment )
जीमॅट परीक्षेतील या विभागात ‘जीआरई’ प्रमाणे परीक्षार्थीचे  विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जाते. इथे हे विश्लेषण मात्र युक्तिवादाचे असते. या विभागात एकच प्रश्न असतो आणि त्यासाठी अध्र्या तासाचा वेळ दिलेला असतो. या विभागाचे गुणांकन ‘जीआरई’सारखेच ०-६ च्या पातळीत केले जाते. त्यामध्ये अध्र्या गुणाची वाढ होऊ शकते.
* गणिती क्षमता ( Quantitative Reasoning) – या विभागात संख्यात्मक ज्ञान, गणित व भूमिती
या विषयांवर आधारित ३७ प्रश्न असतात. हे
प्रश्न सोडविण्यासाठी  ७५ मिनिटांचा वेळ दिलेला असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० गुणांच्या पातळीवर
केले जाते.
* इंटिग्रेटेड रिझनिंग – जीमॅट परीक्षेत २०१२ सालापासून
हा  घटक समाविष्ट करण्यात आला. या विभागात
एकूण १२ प्रश्न असतात आणि त्यासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन १-८ या
पातळीवर असते.
* भाषिक क्षमता (Verbal Reasoning) – या विभागात एकूण ४१ प्रश्न असतात. इंग्रजी वाचन व
त्यावर आधारित प्रश्न, समीक्षात्मक विश्लेषण आणि वाक्यांवर आधारित प्रश्न असे या विभागातील
प्रश्नांचे सर्वसाधारणपणे स्वरूप आहे. या विभागासाठी एकूण वेळ ७५ मिनिटांचा असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० या पातळीवर केले जाते.
‘जीमॅट’ परीक्षा एकूण साडेतीन तासांची असते. परीक्षेमध्ये अध्र्या तासाची सुट्टी दिली जाते. ‘जीमॅट’चे गुणांकनदेखील एकूण पाच वर्षांसाठी वैध असते.
परीक्षार्थी ‘जीमॅट’ परीक्षा एका वर्षांत कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे एकूण शुल्क २५० अमेरिकी डॉलर आहे.

आयइएलटीएस (International English Language Testing System)
‘टोफेल’सारखीच ‘आयईएलटीएस’ ही इंग्रजीची परीक्षा आहे. ‘आयईएलटीएस’ आणि ‘टोफेल’ या दोन्ही परीक्षांमध्ये बरेच साम्य आहे. मात्र ‘टोफेल’ परीक्षेला पर्याय म्हणून अनेकदा ‘आयईएलटीएस’कडे पाहिले जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये ‘आयईएलटीएस’चे गुण स्वीकारले जातात, पण अमेरिकेमध्ये मात्र ‘आयईएलटीएस’पेक्षा ‘टोफेल’ परीक्षेलाच जास्त पसंती दिली जाते. परदेशातील पदव्युत्तर प्रवेशासाठी ‘टोफेल’सारखीच ‘आयईएलटीएस’ परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही (ठल्ल-ल्लं३्र५ी एल्लॠ’्र२ँ रस्र्ीं‘ी१२) अशा विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. ‘आयईएलटीएस’मध्ये ‘टोफेल’सारखेच चार – वाचन, लेखन, श्रवण आणि वक्तृत्त्व हे विभाग आहेत. या विभागांच्या परीक्षाही ‘टोफेल’सारख्याच असतात. इथे गुणांच्याऐवजी या विभागांचे मूल्यांकन बँडस्च्या आधारे केले जाते. हे बँडस् ०-९ या दरम्यान दिले जातात. ‘आयईएलटीएस’साठी एकूण तीन तासांचा अवधी दिलेला असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षांत ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे शुल्क १६५ अमेरिकी डॉलर आहे.
अभ्यास कसा कराल?
या परीक्षा घेणाऱ्या संस्था स्वत:च या परीक्षांच्या तयारीची व्यवस्था करतात. परीक्षांच्या तयारीसाठी या संस्था पुस्तकांपासून ते सॉफ्टवेअर्सपर्यंत विविध शैक्षणिक उत्पादने बनवतात. त्या संस्थांच्या वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.
महत्त्वाचे संदर्भ
* http://www.ets.org/gre
* http://www.mba.com
* http://www.ets.org/toefl  
* http://www.ielts.org  
* sat.collegeboard.org  
* http://www.ets.org