द मूनभागून शांत विसाव्याला बसून शरीराची ऊर्जा हळूहळू शांत करण्यासाठी मनाला प्रफुल्लित करून तल्लख बुद्धीची धार टोकदार करण्याचा सोपा मार्ग ‘हस्तकला’. यात करिअर करायचे म्हणजे तसेच काही भव्यदिव्य विचार हवेत, असे नाही. आपली सृजनशीलता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूर्णपणे वापरायची, ज्यात आपल्याला आनंद तर मिळतोच. शिवाय अर्थार्जनासाठी या विषयांचे मार्गदर्शन शाळा-शाळांतून किंवा वर्तमानपत्रे, पुस्तकांच्या रूपानेसुद्धा करता येते. आपली संभाषणकला प्रभावीपणे वापरून, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आबालवृद्धांपर्यंत आपल्या इकोफ्रेंडली विचारांना फुलवा. प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. लहान मुलांना कार्टून्स पाहण्याचा छंद, ज्येष्ठ, वयस्कर बायकांना मराठी मालिका बघण्याचा छंद, कुणाला नाणी गोळा करायचा तर कोणाला स्टॅम्प्स गोळा करायचा, कोणी रंगीबेरंगी काचा गोळा करतं तर कुणी नाजूक फुलांच्या पाकळ्या. इतके प्रकार असतात की, मोजणी कमी पडते. पण या सर्व गोष्टींचं नंतर खरंच काय करायचं, हा प्रश्नच असतो. सध्या चायनामार्केटमुळे आपल्या पूर्ण पिढीला ‘वापरा व फेका’ची जी सवय जडलीय. ती पुढे फारच घातक ठरणार आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात एका बटनाच्या दाबाने खुले होते विश्वरूप. काय पाहू, काय नको? कुठल्याच माहितीचा नाही तोटा. ‘ओरीगामी’- ही जपानी कला आत्मसात केल्यास मुलांच्या बोटांच्या हालचाली व्यवस्थित होतात व परिणामी गणिताची व भूमितीचीसुद्धा बैठक पक्की होते. यात आपण एका कागदाच्या वेगवेगळ्या घडय़ा घालतो, उकलतो, दुमडतो, बंद करतो. हजारो प्रकारे आपल्या सर्व बोटांचा वापर करून सुंदर-सुंदर वस्तू बनवतो. हे सर्व करताना आपल्या मेंदूला, डोळ्यांना व हाताच्या बोटांना फायदा होतोच तसे नवनिर्मितीचा आनंद आपला आत्मविश्वास वाढवतो. शिवाय हे शिकायला वयाची अट नाही. अगदी दोन वर्षांपासून कोणीही सोप्यापासून खूप कठीण वस्तू हळूहळू शिकतो. अशीच अजून एक कला आहे. ‘पेपर क्विलिंग.’  यात वेगळ्या वेगळ्या रुंदीच्या कागदी पट्टय़ा एका साध्याशा सुईमध्ये गुंतवून, गुंडाळून, गोल-गोल करून नवीन नवीन आकारांच्या साहाय्याने सुंदर सुंदर पाने, फुले, झाडे, प्राणी, पक्षी, पऱ्या बनवू शकतो. या सर्व गोष्टींचा वापर करून आपण फोटोफ्रेम, रांगोळ्या, तोरणे, ग्रीटिंग कार्डस्, एन्व्हलप्स, शोभेच्या वस्तू बनवून त्या विकता येतात. या वस्तूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर फारच मागणी आहे. यात जर तुम्ही योग्य दर्जा ठेवून काम केले तर एक लघुउद्योग सुरू करता येतो. शिवाय आपल्या घरात उरलासुरला ओला कचरा-खत बनवण्यास वापरता येतो. सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसे पाहिले तर सोप्पे आहे, पण त्यामुळे होणारे प्रदूषण टाळणे गरजेचे ठरते. कागदी कचऱ्याचा पुनर्वापर करणे सुरुवातीला शक्य आहे. शक्य असेल तिथे कागदी पिशव्या वापरणे सुरू करण्यास सरकार प्रामुख्याने पुढाकार घेऊन प्राधान्य देत असल्याने पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन वा उद्योग अगदीच सहजसाध्य आहे. पेपरमॅशचे प्रकारसुद्धा आपले स्वत:चे स्थान बाळगून आहेत. मूर्तिकला, हस्तकलेचे साहित्य कोणीही अगदी कमी भांडवलात सुरू करण्यासारखा उद्योग ठरतो. कुठून कुठून गोळा केलेल्या काडय़ा, कोरडी पाने इतर वाळका कचरा वापरून आपण टिकाऊ पुष्पगुच्छ बनवू शकतो. रंगांच्या साहाय्याने त्यात वैविध्य राखून हजारो प्रकारचे नमुने बनवून त्याच्या आधारे बाजारातून मागणी तसा पुरवठा तत्त्वावर उद्योग करता येतो. आपल्या या व्यवसायात प्रचंड भांडवल लागते ते सृजनशीलतेचे, योग्य दर्जा व सुबकता या गोष्टींचे. चला, तर मग आपल्या सुंदर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास स्वत:च्या सूक्ष्म प्रयत्नाने हळूहळू कमी करायच्या वाटेवर चालू या. आपल्या पुनर्वापराच्या सवयी इतरांनाही लावू व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…