देशभरातील विविध विद्यापीठे तसेच नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये संगीत शिक्षण-प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी संबंधित अभ्यासक्रमांची ही झलक –

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाने सुरू केलेले विविध अभ्यासक्रम :
०    बॅचलर ऑफ फाइन आर्टस् इन व्होकल म्युझिक  
०     डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी व्होकल क्लासिकल (कालावधी- दोन वर्षे)
०    डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल (कालावधी- दोन वर्षे)
०     डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी व्होकल लाइट (कालावधी- दोन वर्षे)
० डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी  इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल- तबला (कालावधी- दोन वर्षे)
०     बॅचलर ऑफ फाइन आर्टस् इन इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल तबला/ सतार (कालावधी-तीन वर्षे)
०     मास्टर ऑफ फाइन आर्टस् इन म्युझिक व्होकल (कालावधी- दोन वर्षे).
पत्ता- डिपार्टमेंट ऑफ म्युझिक, विद्यापीठ, विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट, मुंबई- २०, दूरध्वनी-०२२-२२०४८६६५ वेबसाइट- http://www.mu.ac.in/arts/finearts
सेंटर फॉर परफॉìमग आर्टस्,  पुणे</strong>
पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर परफॉìमग आर्टस्च्या ललित कला केंद्राच्या वतीने बॅचलर ऑफ आर्ट इन म्युझिक, डान्स अ‍ॅण्ड थिएटर हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. प्रवेशजागा- ३०.
पत्ता- सेंटर फॉर परफाìमग आर्ट, ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे- ४११००७, दूरध्वनी- ०२०-२५६९ २१८२
वेबसाइट- http://www.ac.in
अण्णामलाई युनिव्हर्सिटी
०     बॅचलर ऑफ म्युझिक इन व्होकल, वीणा, व्हायोलिन, मृदंगम अ‍ॅण्ड फ्लूट. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी. कालावधी तीन वर्षे. प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
०     इंटिग्रेटेड कोर्स इन बॅचलर इन म्युझिक (म्युझिक इन व्होकल, व्हायोलिन, मृदंगम अ‍ॅण्ड फ्लूट. अर्हता- दहावी. कालावधी- पाच वर्षे.
पत्ता- अण्णामलाई युनिव्हर्सिटी, अण्णामलाईनगर ६०८००२     तामीळनाडू. दूरध्वनी-०४१४४-२३८२ ४८,
वेबसाईट-www.annamalaiuniversity.ac.in
मेल- dde@annamalaiuniversity.ac.in
रवींद्रभारती युनिव्हर्सिटी :
पश्चिम बंगालच्या मातीत फुललेल्या आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा परिसस्पर्श लाभलेले रवींद्र संगीत औपचारिकपणे कुणालाही शिकता यावे, अशी सुविधा रवींद्रभारती युनिव्हर्सिटीच्या दूरशिक्षण विभागातर्फे उपलब्ध झाली आहे. या विभागामार्फत रवींद्र संगीत या विषयाशी निगडित पदवी- पदव्युत्तर पदवी असे अभ्यासक्रम चालवले जातात.
०     बॅचलर ऑफ आर्टस् (स्पेशल ऑनर्स) इन रवींद्र संगीत : देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो.
०     मास्टर ऑफ आर्टस् इन रवींद्र संगीत अ‍ॅण्ड व्होकल म्युझिक: कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. ही पदवी त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून घेतली असावी.
अर्ज व माहितीपत्रकासाठी २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, रवींद्र भारती युनिव्‍‌र्हसिटी, कोलकता या नावे पाठवावा. यासोबत पाठविण्यात येणाऱ्या पत्रात ज्या अभ्यासक्रमासाठी अर्ज हवा असेल त्याचे नाव ठळकपणे नमूद करावे. सोबत स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा जोडावा.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा अर्ज http://www.dde.rabindrabharatiuniversity.net या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल.
पत्ता : डायरेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, रवींद्र भारती युनिव्‍‌र्हसिटी, ५६ ए, बी. टी. रोड, कोलकता- ७०००५०. वेबसाइट- http://www.dde.rbu.ac
स्कूल ऑफ परफॉìमग अ‍ॅण्ड व्हिज्युअल आर्ट
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्‍‌र्हसिटीच्या या विभागातर्फे पुढील संगीतविषयक अभ्यासक्रम चालविण्यात येतात-
०     सर्टििफकेट इन परफॉìमग आर्ट इन भरतनाटय़म- या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष आणि कमाल चार वर्षे. अर्हता – दहावी उत्तीर्ण.
०     सर्टििफकेट इन िहदुस्थानी म्युझिक- या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष, कमाल दोन वर्षे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
० सर्टििफकेट इन कर्नाटकी म्युझिक- या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष, कमाल चार वर्षे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
०     सर्टििफकेट इन थिएटर आर्ट- या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष, कमाल चार वर्षे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
०     सर्टििफकेट इन अप्लाइड आर्ट- या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष, कमाल चार वर्षे. अर्हता- बॅचलर ऑफ फाइन आर्ट उत्तीर्ण.
०     मास्टर ऑफ परफॉìमग आर्ट इन िहदुस्थानी व्होकल म्युझिक. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. अर्हता- बीए इन म्युझिक किंवा मान्यताप्राप्त समकक्ष पदवी.
०     मास्टर ऑफ परफॉìमग आर्ट इन भरतनाटय़म. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. अर्हता- बीए इन भरतनाटय़म.
पत्ता- स्कूल ऑफ परफॉìमग अ‍ॅण्ड व्हिज्युअल आर्ट, आंबेडकर भवन, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्‍‌र्हसिटी, नवी दिल्ली- ११००६८.
ईमेल- sopva@ignou.ac.in

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ुट, आग्रा
०     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिव्होशनल अ‍ॅण्ड फोक म्युझिक, कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी.
०     मास्टर ऑफ आर्ट इन म्युझिक वुईथ स्पेशलायझेशन इन व्होकल, सतार अ‍ॅण्ड तबला. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील किंवा संबंधित विषयातील पदवी.
पत्ता- दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट, दयालबाग, आग्रा- २८२११०, वेबसाईट- http://www.del.ac.in
बनारस िहदू युनिव्हर्सिटी
० बॅचलर ऑफ म्युझिक कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण आणि संगीत विशारद असल्यास उत्तम. या अभ्यासक्रमात व्होकल आणि इन्स्ट्रमेन्टल दोन्ही प्रकारातील संगीत शिकवले जाते. इन्स्ट्रमेन्टल म्युझिकमध्ये तबला, सितार, व्हायोलिन, बासरी यांचा समावेश आहे.
०     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रवींद्र संगीत – दोन वर्षे.
०     सर्टििफकेट कोर्स इन म्युझिक अ‍ॅप्रिसिएशन- एक वर्षे.
पत्ता- बनारस िहदू युनिव्‍‌र्हसिटी, वाराणसी-२२१ ००५. अर्ज व माहितीपत्रकाची किंमत ५० रुपये. अर्ज ‘द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, बीएचयू,  वाराणसी’ या पत्यावर मिळू शकेल. मेल-controller@bhu.ac.in
वेबसाइट- http://www.bhu.ac.in
भातखंडे संगीत संस्था
लखनौ स्थित भातखंडे संगीत संस्थेत नृत्य आणि संगीताचं दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण दिलं जातं. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
विविध अभ्यासक्रम : या संस्थेमध्ये पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करण्याची सोय आहे.
डिप्लोमा इन म्युझिक हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला तो करता येतो.
बॅचलर ऑफ परफॉìमग आर्टस्- हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून संगीतात पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. याशिवाय या संस्थेने पुढील विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
ध्रुपद / धमाद / होरी, सेमी क्लासिकल म्युझिक इन ठुमरी / दादरा, लाइट म्युझिक, हार्मोनिअम/ की बोर्ड.
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षांचा आहे. या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑडिशन टेस्ट घेतली जाते.
तीन वर्षे कालावधीचा आणि मास्टर इन म्युझिक हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांसाठी जुलमध्ये प्रवेशपरीक्षा घेतली जाते. इच्छुकविद्यार्थ्यांनी उच्चमाध्यमिक पातळीपर्यंत संगीत या विषयाचा अभ्यास केलेला असावा किंवा संगीत विषयात पदविका प्राप्त केलेली असावी.
या संस्थेमध्ये पीएचडीसुद्धा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी पीएचडीसाठी नोंदणी करू शकतात. संस्थेत मुलींच्या राहण्यासाठी वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. पत्ता : भातखंडे म्युझिक इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सटिी, कैसरबाग लखनौ (उत्तरप्रदेश.)
वेबसाइट-www.bhatkhandemusic.edu.in
 ल्ल