ठोंब्या

ठोंब्या हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. मूर्ख, मंदबुद्धीच्या किंवा काहीच कामाच्या नसलेल्या माणसाला ही ‘पदवी’ मिळते. असा एक तरी पदवीबहाद्दर आपल्या आसपास असतोच. कधी कधी घरातल्या लहान मुलालाही लाडाने ठोंब्या म्हटले जाते. या शब्दाचा मूळ शब्द मजेदारच आहे. मूळ शब्द आहे, ठोंब. या पुल्लिंगी शब्दाचा अर्थ आहे फांद्या, फुले, पाने नसलेले झाडाचे खोड. त्याचवरून ज्याला काही आगापिछा नाही, असा धटिंगण असा दुसरा अर्थही आहे. ज्याचा बौद्धिक विकास थांबला आहे, खुंटला आहे, असा अक्षरशत्रू म्हणजे ठोंब्या.  यापासून ‘ठोंब’चा अर्थविकास झाला आणि त्यापासून ‘ठोंब्या’ हे विशेषण तयार झाले.

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

वैषम्य

विषम या विशेषणापासून बनलेले हे भाववाचक नाम आहे. ‘विषम’ म्हणजे जे ‘सम’ नाही ते. एकसारखेपणाचा अभाव असलेले, द्वैत, कमी-जास्तपणा, अनियमितपणा, विषमभाव, विरुद्धता, भेदभाव (विषम वागणूक असा शब्दप्रयोग आहेच) इतके अर्थ आहेत. खरे तर वैषम्यचासुद्धा हाच अर्थ असायला हवा होता. पण ‘वैषम्य’ म्हणजे दु:ख, मत्सर या अर्थी वापरला जाऊ  लागला. ‘त्याचे मला अजिबात वैषम्य वाटले नाही!’ म्हणजे मला त्याचे दु:ख नाही. ‘सम’ हे नेहमीच आनंददायक असणार मग त्याच्या विरुद्ध ‘विषम’ म्हणजे दु:खदायक; त्यावरून ‘वैषम्य’ म्हणजे दु:ख. अर्थविस्ताराची बरीच दीर्घ वाटचाल करीत हा शब्द इथपर्यंत आलेला आहे.