विवेक वेलणकर

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई (मेन्स) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे; महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेशासाठी असणारी MH—CET  परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षेच्या निकालानंतर यंदाची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. कोविडमुळे ही प्रक्रिया जवळपास सहा महिने लांबली आहे. या सहा महिन्यांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जागतिक मंदीची चाहूल लागल्यामुळे पालक आणि विद्यार्थी सैरभैर झालेत आणि त्यांच्यापुढचा आत्ता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, या करोनोत्तर काळात अभियांत्रिकीचा कोणता अभ्यासक्रम आणि कोणते महाविद्यालय निवडावे, जेणेकरून भविष्यात करिअरच्या उत्तम संधी मिळतील. या संदर्भातील निर्णय घेताना उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा परामर्श घेऊयात.

Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 10th exam from tomorrow pune
राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, १६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
maharashtra government, bsc nursing, government colleges, 7 district, 700 seats, increase,
राज्यात नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ७०० जागा वाढणार

१) अभियांत्रिकी शाखा निवडताना विद्यार्थी ठरावीक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि फार फार तर केमिकल एवढय़ाच ठरावीक शाखांचा विचार करतात. मुळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या राज्यात

७० शाखा आहेत; त्यातील अनेक शाखा एक किंवा दोन महाविद्यालयांत आहेत. या शाखांमध्येही करिअरच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी आहेत आणि मुख्य म्हणजे एक किंवा दोनच महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम असल्याने स्पर्धाही तुलनेने कमी आहे. गरज आहे ती फक्त चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची. पॉवर इंजिनीअरिंग, एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअरिंग अशा काही शाखांचा यात समावेश आहे.

२) ज्या विद्यार्थ्यांनी फिम्जिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सबरोबर बारावीला बायॉलॉजी हा विषयही घेतला होता त्यांना काही विशेष शाखा उपलब्ध होऊ शकतात. जसे की, बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग. कोविडच्या संकटानंतर जगभरात बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात संधी वाढत आहेत, त्यामुळे  बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग या शाखेत रोजगाराच्या आणि परदेशात जाऊन उच्च शिक्षणाच्या संधी नक्कीच जास्त मिळतील. एकूणच मानवावरील उपचारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने बायोमेडिकल इंजिनीअरिंग या शाखेला महत्त्व आले आहे, मात्र या शाखेत ८०% इलेक्ट्रॉनिक्स आणि फक्त २०% बायॉलॉजी असल्याने फक्त बायॉलॉजी आवडते म्हणून, पण इलेक्ट्रॉनिक्स आवडत नसताना या शाखेला प्रवेश घेऊ नये.

३) कोणत्या शाखेला वाव जास्त आहे किंवा चार वर्षांनंतर कोणत्या शाखेला वाव जास्त असणार आहे, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक कायम विचारतात. खरे तर अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांना उत्तम वाव आहे, मात्र तो अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जे अभियांत्रिकीच्या पहिल्या सत्रापासून सातत्याने प्रथम वर्गात उत्तीर्ण होतात; एकदाही एकही विषयात नापास होत नाहीत, कारण कंपन्या जेव्हा महाविद्यालयात कॅ म्पस निवडीसाठी येतात त्या वेळी विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावताना सर्व सत्रांमध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण हे सूत्र लावतात. अभियांत्रिकीच्या चारही वर्षांत विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवली तर  वाव आहे का, याचा वेगळा विचार करण्याची गरजच भासणार नाही.

४) अभियांत्रिकी शाखानिवडीचा निर्णय करताना विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंत शिकलेल्या फिजिक्सचा उपयोग होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्समधील मेकॅनिक्स हा भाग जास्त आवडला असेल त्यांच्यासाठी मेकॅनिकल किंवा सिव्हिल ही शाखा निवडणे फायद्याचे ठरू शकते. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्समधील इलेक्ट्रॉनिक्स हा भाग जास्त आवडला असेल त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स किंवा  instrumentation  किंवा  ए& ळउ  ही शाखा निवडणे फायद्याचे ठरू शकते. ज्यांना फिजिक्समधील इलेक्ट्रिकल हा भाग जास्त आवडला असेल त्यांच्यासाठी इलेक्ट्रिकल किंवा power engineering  ही शाखा निवडणे फायद्याचे ठरू शकते. ज्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर किंवा आयटी हा विषय १२ वीपर्यंत शिकला असेल आणि त्यांना तो आवडला आणि समजला असेल त्यांच्यासाठी  computer किंवा कळ  शाखा निवडणे फायद्याचे ठरू शकते.

v) computer engineering आणि IT engineering   या दोन शाखांच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नसल्याने त्यातली कुठलीही शाखा निवडलेली चालू शकेल.

६) ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर MBA किंवा UPSC/MPSC  कडे वळायचे आहे त्यांना कोणतीही शाखा किंवा कोणतेही महाविद्यालय निवडले तरी फारसा फरक पडत नाही, कारण त्या ठिकाणी मुख्यत्वे पदवी मिळवलेली असणे यालाच महत्त्व असते.

७) ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी  पदवीनंतर नोकरी करायची आहे त्यांनी अशा  महाविद्यालयाची निवड काळजीपूर्वक करायची आहे ज्या महाविद्यालयामध्ये गेल्या काही वर्षांपासून कँपसनिवडीसाठी चांगल्या कं पन्या येत आहेत. पर्यायाने भरपूर नोकऱ्या मिळत आहेत. पदवीनंतर नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सँडविच’ कोर्स निवडणे फायद्याचे ठरू शकते, कारण त्यामध्ये पदवीबरोबरच एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो जो नोकरी मिळताना उपयोगी पडतो. ज्या विद्यार्थ्यांना एमबीए  करायचे आहे त्यांनाही सँडविच कोर्स लाभदायक ठरू शकतो.

८) ज्या विद्यार्थ्यांना पुढे तांत्रिक विषयातच भारतात वा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आवडत्या अभियांत्रिकी शाखेची निवड करणे जास्त महत्त्वाचे आहे,  मग त्याकरिता महाविद्यालयनिवडीमध्ये थोडी तडजोड करावी लागली तरी चालेल.

९) महाविद्यालय निवडताना त्या त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती वाचावी ज्यामध्ये तेथील पायाभूत सुविधा, प्राध्यापक वर्ग, कँपसनिवडीसाठी येणाऱ्या कं पन्या, त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या यांची माहिती असते. शक्य असेल त्या महाविद्यालयात समक्ष जाऊन प्राध्यापकांशी बोलले किंवा तेथे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

१०) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत प्रेफरन्स फॉर्म भरताना उगीचच मला काय मिळेल,  गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता याचा फारसा विचार करत न बसता आपल्याला हव्या त्या महाविद्यालयाचा व शाखेचा पर्याय आपल्या आवडीनुसार भरावा.  फक्त भरताना पसंतिक्रम उलटसुलट भरू नये, तर जे जास्त आवडणारे कॉलेज/ शाखा आहे ती प्रथम, त्याखालोखाल आवडणारी नंतर या क्रमाने भरावेत. आपल्या मेरिट क्रमांकाप्रमाणे कॉम्प्युटर जेव्हा आपला फॉर्म वाचेल त्या वेळेला तो आपल्या पसंतीप्रमाणे पर्याय वाचत जाईल आणि जेथे आपली पसंती व जागांची उपलब्धता यांची सांगड बसेल ते महाविद्यालय आणि शाखा आपल्याला देईल.

११) लवकरच तंत्रशिक्षण विभाग अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया जाहीर करेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरण्यास सांगितले जाईल, यात दोन किंवा तीन फे ऱ्या असतील.  विद्यार्थ्यांना स्वत:च्या पसंतीचं महाविद्यालय व शाखा मिळेपर्यंत पुढच्या

फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल,  त्यामुळे पहिल्या फे रीमध्ये हवे ते  महाविद्यालय किंवा शाखा मिळाली नाही तरी निराश होण्याची गरज नाही.

शेवटी एवढेच सांगेन की, अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर कालही होते, आजही आहे आणि उद्याही असणार आहेच. विद्यार्थ्यांनी त्यामुळे उगाच घाबरून, गोंधळून न जाता आपली क्षमता, आवड, सोय या सगळ्यांचा विचार करून, पदवीनंतर पुढे आणखी शिक्षण घ्यायचे की थेट नोकरी करायची आहे, अशा सगळ्यांचा योग्य विचार करून अभियांत्रिकी शाखा निवडावी.

– vkvelankar@gmail.com