News Flash

कौशल्य प्राप्त करण्यासाठी..

कोणत्याही कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी साधे आणि उपयुक्त समीकरण आहे. प्रथमत: कौशल्य क्षेत्राशी संबंधित विषयावर नेमाने वाचन करा.

| November 11, 2013 07:31 am

कोणत्याही कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी साधे आणि उपयुक्त समीकरण आहे. प्रथमत: कौशल्य क्षेत्राशी संबंधित विषयावर नेमाने वाचन करा.  तुम्ही संबंधित विषयाबाबत जितके जास्त वाचता आणि शिकता, तितके तुम्हाला काम उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास वाटतो.
त्या संबंधातील विषयावर बेतलेली चर्चासत्रे आणि कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला जेव्हा त्या विषयावर काम करण्याची संधी पहिल्यांदा उपलब्ध होईल, तेव्हा तुम्ही जे शिकला आहात त्याचा उपयोग करा. तुम्ही जेव्हा एखादी चांगली कल्पना ऐकाल, तेव्हा त्यावर कृती करा. जी व्यक्ती शंभर कल्पना ऐकून त्यातील एकाही कल्पनेवर आधारित कृती करत नाही, त्यापेक्षा जी व्यक्ती एक कल्पना जाणून घेत त्यानुसार कृती करते, ती त्याला पुढे नेते.
तुम्ही जे शिकत आहात त्याचा जितका जास्त सराव कराल, तितक्या अधिक वेगाने तुम्ही त्या क्षेत्रात जास्त सक्षम आणि कुशल बनाल. तुम्ही जितका जास्त सराव कराल, तितका तुमच्यात जास्त आत्मविश्वास विकसित होईल. त्या कौशल्यात कुठेतरी आपण कमी पडतोय, या भावनेवर तुम्ही अधिक वेगाने मात कराल आणि अधिक वेगाने त्यावर प्रभुत्व मिळवाल. एकदा तुम्ही ही कौशल्ये आत्मसात केलीत की ती तुमच्या उर्वरित कारकीर्दपर्यंत तुमच्यापाशी राहतील.
तुमच्या संबंधित क्षेत्रातील सर्वोच्च दहा टक्क्यांतील लोकांमध्ये समाविष्ट होण्याचा संकल्प करा. त्यांनी विकसित केलेले विशिष्ट ज्ञान आणि कौशल्ये निश्चित करा आणि ती स्वत:मध्ये विकसित करण्याचा संकल्प करा. फक्त तुम्ही ते एक ध्येय म्हणून परिश्रमाने काम केलं तर त्याला कोणतीही मर्यादा नाही.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2013 7:31 am

Web Title: how to get skill
टॅग : Feel Good
Next Stories
1 एमपीएससी (पूर्वपरीक्षा) मिशन २०१४
2 केस स्टडी एक समग्र आढावा
3 अकाऊंटंट जनरल कार्यालय- उत्तराखंड येथे खेळाडूंसाठी ४ जागा
Just Now!
X