केतन पाटील

विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखात आपण IAS आणि IPS या दोन सेवांची ओळख करून  घेतली. आजच्या लेखात आपण आणखी काही सेवांची ओळख करून घेऊ या.

भारतीय विदेश सेवा (Indian Foreign Services -IFS) – गट अ सेवाअंतर्गत प्रतिष्ठेची असलेली ही सेवा भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील सेवा आहे. कार सेवेद्वारे भारतीय अधिकाऱ्यांना परराष्ट्रात भारताचे नागरिक, विचार, सांस्कृतिक संबंध, आर्थिक व राजकीय संबंधांना/हितांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे लागते. कार अधिकाऱ्यांना परराष्ट्रात उच्चायुक्त, राजदूत, भारताच्या उच्चायुक्तामधील कायमस्वरूपी प्रतिनिधी, परदेश सचिव म्हणून नियुक्ती मिळू शकते. या सेवेचे व्यापक स्वरूप पाहता या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा असावी असा एक मतप्रवाह आहे.

भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा सेवा (Indian Audit & Accounts Service – IA&AS) – या सेवेचे प्रशिक्षण सिमला येथे होते. या सेवेचे प्रमुख काम देशाचा आर्थिक ताळेबंद पाहणे, जपणे व त्यातील तुटींवर काम करणे हे असते. भारताचे महालेखापाल यांच्या अखत्यारीत या सेवेचा समावेश असतो. सरकारी कार्यालये, राज्य सरकार, केंद्र सरकार व सार्वजनिक हिताच्या सरकारी आस्थापने यांचा ताळेबंद पाहणे हे या सेवेचे मुख्य कार्य असते.

भारतीय सनदी लेखा सेवा (Indian Civil Accounts Service – ICAS) – गट अ मधील ही सेवा केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत येते. प्रशिक्षण कार्यक्रम हा ठकाट व ठअऊळ नागपूर येथे होतो. वित्त लेखानियंत्रक हे प्रमुख सनदी अधिकारी असतात.

भारतीय कॉर्पोरेट कायदे सेवा (Indian Corporate Law Service – ICLS) – १९९१नंतरच्या उदारीकरण धोरणानंतर उद्योग आणि व्यवसाय वाढले तसेच त्यासाठी नियमन व प्रशासनिक व्यवस्था गरजेची बनली. त्यामुळे या सेवांचा प्रमुख हा Corporate Affairs मध्ये येतो. मानेसर, हरयाणा येथे या सेवेसाठी प्रशिक्षण दिले जाते. भारतातील Corporate क्षेत्रामध्ये नियमन हा मुख्य लक्ष्यगट आहे.

भारतीय संरक्षण लेखा सेवा (Indian Defence Accounts Service – IDAS) – ही सेवा संरक्षण मंत्रालयांतर्गत येते. या सेवेचे प्रशिक्षण बंगळूरु, पुणे, लखनौ, मेरठ, कोलकाता येथे दिले जाते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ऊफऊड व शस्त्रागार कारखाने यांचे लेखाविषयक सेवांसाठी आर्थिक ताळेबंद तपासणे याविषयक काम केले जाते. या सेवेचे प्रमुख संरक्षण लेखा महानियंत्रक असतात.

भारतीय सुरक्षा संपदा सेवा (Indian Defence Estates Service – IDES) – नवी दिल्ली येथे या सेवांमधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते. छावणी परिसर व संरक्षण विभागाच्या मालमत्तांच्या नियमनासाठी, व्यवस्थापनासाठी ही सेवा कार्यरत आहे.

भारतीय माहिती सेवा (Indian Information Service – IIS) – या सेवेत भारत सरकारच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाची जबाबदारी पार पाडली जाते. सरकार व जनता यांच्यातील संवादाचा भाग म्हणून या सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा माहिती व सूचना प्रसारण विभागाअंतर्गत येते.

भारतीय शस्त्रागार सेवा (Indian Ordinance Factories Service – IOFS) – ही सेवा संरक्षण मंत्रालयांतर्गत येते. शस्त्र निर्मिती कारखान्यांचे नियमन, व्यवस्थापन यासंबंधी कार्ये या सेवेला पार पाडावी लागतात. या सेवेचे प्रशिक्षण ठअऊढ येथे दिले जाते.

भारतीय दूरसंचार वित्त सेवा (Indian Communication Finance Service – ICFS)  – या सेवेला पूर्वी Indian Post & Telecommunication Accounts & Finance Service I (IP & TAFS) या नावाने ओळखले जात होते. या सेवेचे फरिदाबाद येथे प्रशिक्षण दिले जाते. या सेवेचे मुख्य कार्य हे पोस्ट खात्याचे ताळेबंद पाहणे आणि त्या खात्याच्या आर्थिक व्यवहारांचे नियमन करणे आहे.

भारतीय डाक सेवा (Indian Postal Service –  IPos) – या सेवेचे प्रशिक्षण गाझीयाबाद येथे दिले जाते. पोस्ट विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध कामांसाठी ही सेवा लाभकारक आहे. या सेवेद्वारे पत्रव्यवहार, पेन्शन तसेच नव्याने सुरू झालेल्या E-commerce सेवांचेही नियमन व व्यवस्थापन केले जाते.

भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (Indian Railway Personnel Service – IRPS) – या सेवेचे प्रशिक्षण हे मसुरी, नागपूर, वडोदरा या विविध शहरांमध्ये दिले जाते. रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे नियोजन व दैनंदिन व्यवहाराच्या नियंत्रणाची जबाबदारी या सेवेतील अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते.

भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (Indian Railway Traffic Service – IRTS) – वडोदरा येथे रेल्वे स्टाफ कॉलेजमध्ये व भारतीय रेल्वेची वाहतूक व्यवस्थापन संस्था लखनौ येथे प्रशिक्षण मिळते. रेल्वेसाठी महसूल मिळवणे, रेल्वे व जनता तसेच रेल्वे व उद्योग यातील दुवा म्हणून ही सेवा कार्य करते.

भारतीय राजस्व सेवा (Indian Revenue Service – IRS) – या सेवेचे प्रशिक्षण फरिदाबाद, मसुरी व नागपूर येथे दिले जाते. ही सेवा वित्त मंत्रालयांतर्गत येते. या सेवेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर (Direct & Indirect) गोळा करण्याचे काम करावे लागते.

भारतीय व्यापार सेवा (Indian Trade Service – ITS) – या सेवेचे प्रशिक्षण नवी दिल्ली येथे दिले जाते. या सेवेला आंतरराष्ट्रीय

व्यापार व उद्योग यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडावी लागते. ही सेवा वाणिज्य मंत्रालयांतर्गत येते.

रेल्वे सुरक्षा बल (Railway Protection Force – RPF) – रेल्वेची मालमत्ता जोपासणे, प्रवासी वाहतुकीत सुरक्षेची जबाबदारी व आपत्कालीन काळात मुख्य यंत्रणा म्हणून जबाबदारी पाहणे. लखनौ येथे प्रशिक्षण

मिळते.

गट ‘ब’ सेवा

Armed Forces Headquarters Civil Service – भारतीय सन्यास व त्यासंबंधी असलेल्या संघटनांना सामान्य स्वरूपाच्या/दैनंदिन प्रशासकीय सेवांचा लाभ देणारी सेवा.

ऊअठकउर – दिल्ली, अंदमान-निकोबार बेट यांच्यासाठीच्या नागरी सेवा.

ऊअठकढर – दिल्ली, अंदमान-निकोबार बेट, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली पोलीस सेवा.

Pondichery Civil Service and Pondicherry Police Service – पुदुचेरी सनदी नागरी व पोलीस सेवांसाठीसुद्धा UPSC द्वारे भरती केली जाते.