‘आयआयटी’ म्हणजेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, कानपूर, खरगपूर, मद्रास, रुडकी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स-बंगळुरू येथे उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. टक्केवारीची अट अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी ५०% पर्यंत शिथिलक्षम.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना जॉइंट मॅनेजमेंट टेस्ट : जॅम- २०१४ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नांदेड व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १५०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत ‘चेअरमन जेएएम’ स्टेट बँक ऑफ इंडिया- आयआयटी- कानपूर यांच्या नावावर जमा करावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ ऑगस्ट ६ सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या दूरध्वनी क्र. ०५१२-२५९७४१२ किंवा http://gate.iitk.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याचा प्रकार व अंतिम तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज केल्यावर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज चेअरमन- जॅम २०१४,जीएटीई/ जॅम ऑफिस, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- कानपूर, कानपूर- २०८०१६ (उप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०१३.
ज्या बीएस्सी पात्रताधारक उमेदवारांना आयआयटीमधून पदव्युत्तर पदवी करून आपले करिअर करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.