श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण ४२ प्रश्न विचारण्यात आले आहेत. परीक्षेचा विचार करता हा घटक अधिकच महत्त्वपूर्ण बनत आहे; कारण या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेसाठीसुद्धा करावी लागते.

Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..

*     घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन

या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती यापासून सुरुवात करावी लागते. ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करून घ्यावे. संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान याच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़े तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे तसेच ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणत्या व्यक्तीने अथवा राजाने ती निर्माण केली होती; इत्यादी पलूंविषयी सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी आपल्याला करता येईल.

मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. उदाहरणार्थ स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघू चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

*     गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

*   २०११मध्ये प्रश्न होता..

जैन तत्त्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते?

पर्याय होते –

१)वैश्विक कायदा, २)वैश्विक सत्य, ३)वैश्विक श्रद्धा आणि ४)वैश्विक आत्मा

*   २०१२ च्या परीक्षेत प्रश्न होता..

भूमिस्पर्श मुद्रा या हस्तमुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शविते?

*   २०१३ मध्ये प्रश्न होता..

बौद्ध धर्माशी संबंधित शिल्प लेणी, स्तूप आणि इतर विहारे असे संबोधले जाते, या दोन्हीमध्ये काय फरक आहे?

*   २०१४ मध्ये प्रश्न होते..

भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचयतन संज्ञा कशाशी संबंधित आहे?    आणि

भारताच्या संस्कृती आणि परंपरासंदर्भात कालरीपयत्तू (ङं’ं१्रस्र्ं८ं३३४) काय आहे?

*   २०१५ मध्ये दोन प्रश्न होते..

१)कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते? आणि

२)अलीकडेच खालीलपकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

*   २०१६ मध्ये बौद्ध धर्मातील बोधिसत्त्व या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता.

*   २०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातीद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्यमंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

*   २०१८ मध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, राजस्थानी चित्रकला, त्यागराज (व्यक्तिविशेष)  इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या व्यतिरिक्त भारतीय षड्द्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तिशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा, यावरदेखील प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या विषयावर आलेल्या प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. बहुतांश प्रश्न हे संकल्पनांवर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़े इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे.

 *     संदर्भ साहित्य

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part -I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे.

तसेच १२वीचे Themes in Indian History part- I  आणि II  व प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील जुन्या एनसीईआरटी पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा.

विद्यार्थ्यांनी आपली आपण टिप्पणे काढणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीतकमी वेळात या विषयाची तयारी करता येऊ शकेल.