इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन : २०१३
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिस व इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन- २०१३ या स्पर्धा परीक्षेअंतर्गत पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा निवड करावयाच्या जागांची संख्या ६६ असून त्यामध्ये इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिसेस अंतर्गत ३० व इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिसेस अंतर्गत ३६ याप्रमाणे उपलब्ध जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी अर्थशास्त्र, अप्लाईड इकॉनॉमिक, बिझनेस इकॉनॉमिक, इकॉनॉमिट्रिक्स, सांख्यिकी, गणित, अप्लाईड स्टॅटिस्टिक यासारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटांच्या उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ९ नोव्हेंबर २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई केंद्राचा समावेश असेल.
निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत २०० रु. रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑगस्ट २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१३.
अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी यासारख्या वा संबंधित विषयातील ज्या पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत अधिकारी पदावर आपले करिअर सुरू करायचे असल्यास त्यांनी या स्पर्धा परीक्षेचा अवश्य लाभ घ्यावा.