prashasan3मागील लेखामध्ये आपण नागरी सेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप, व्याप्ती व रणनीतीविषयी चर्चा केली. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील इतिहास व संस्कृती आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ या अभ्यासघटकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. नागरी सेवा परीक्षेमध्ये इतिहासाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अगदी जुन्या पॅटर्नमध्येही इतिहास हा महत्त्वपूर्ण घटक होता व आजही त्याचे महत्त्व कमी-अधिक फरकाने अबाधित आहे. इतिहासाचे स्वरूप विस्तृत असल्याने अभ्यासाची सुरुवात करताना इतिहासाचा आवाका समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
भारतीय इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळ आदी घटकांचा समावेश होतो. या घटकांचे आकलन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजू लक्षात घ्याव्या लागतात. परिणामी, इतिहासाचा विस्तृत पट लक्षात घेता गतवर्षांतील प्रश्नांचे विश्लेषण करून अधिक महत्त्वाच्या घटकाचा प्राधान्यक्रमाने अभ्यास करावा. उर्वरित घटक ‘ऑप्शन’ला न सोडता महत्त्वपूर्ण घटकांच्या तयारीनंतर त्यांचा विचार करावा. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये प्रागतिहासिक भारत, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, मौर्य कालखंड, गुप्त युग आदी घटक, मध्ययुगीन काळामध्ये भारतातील इस्लाम, भक्ती चळवळ, युरोपियनांचे आगमन, सुलतानशाही, विजयनगर साम्राज्य, मुघल, आधुनिक भारतामध्ये १८५७ चा उठाव, काँग्रेसची स्थापना जहाल, मवाळ, मुस्लीम लीग, गांधीजींचा कालखंड, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, ‘चले जाव’ चळवळ, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, माऊंटबॅटन प्लॅन, फाळणी, संविधान निर्मिती इत्यादी महत्त्वपूर्ण घटनांबरोबरच शेतकरी, आदिवासी, धर्म व समाज सुधारणा, महिला कामगार आदी चळवळींचा प्रामुख्याने विचार करावा. उपरोक्त घटकांचा आवश्यक अभ्यास करून प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील संस्कृतीविषयक पलू चित्रकला, स्थापत्य, मूर्तिकला आदी दृश्य कला; संगीत, नृत्य, रंगभूमी या सादरीकरण कला, त्याचप्रमाणे बौद्ध, जैन, िहदू, इस्लाम, शीख व पारशी इ. भारतातील प्रमुख धर्माशी संबंधित ठिकाणे, वैशिष्टय़े, तत्त्वज्ञान, तत्त्ववेत्ते इ.चा सखोल अभ्यास करावा. प्राचीन व मध्ययुगीन इतिहास व संस्कृती यांच्यामध्ये फार निकटचा संबंध आहे. त्यामुळे आपला अभ्यास फक्त राजकीय इतिहासापुरता मर्यादित असता कामा नये. ज्याप्रमाणे अशोका व मौर्य साम्राज्याचा अभ्यास बौद्ध धर्माला वगळून करता येणार नाही तसेच मुघलांचा अभ्यास करताना मुघल चित्रकला, वास्तुकला इत्यादींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबरोबरच इतिहासाच्या प्रत्येक कालखंडातील सामाजिक व आíथक पलूंचे अध्ययनही महत्त्वपूर्ण ठरते.
भारतीय इतिहास व संस्कृती आणि राष्ट्रीय चळवळ या घटकावर २०११ पासून प्रत्येक वर्षी सुमारे २० प्रश्न विचारले गेले आहेत. जुन्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासावरील प्रश्नांमध्ये यूपीएससीचा भर प्रामुख्याने राष्ट्रीय चळवळीवर होता, पण गेल्या चार वर्षांपासून प्रश्न विचारण्याचा कल पाहता प्राचीन भारत आणि संस्कृतीसंबंधित घटकावर अधिक प्रश्न विचारले जात आहेत. या तुलनेत मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत या घटकावर कमी प्रश्न विचारले गेले आहेत. पण यूपीएससीचे बदलते स्वरूप पाहता हा कल कधीही बदलू शकतो. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास सर्वागीण करण्यावर भर द्यावा. कारण याचा फायदा अप्रत्यक्षपणे मुख्य परीक्षेतील ‘भारतीय वारसा आणि संस्कृती’ या घटकासाठी उपयुक्त ठरतो. २०१४ तील पेपरमध्ये १४ प्रश्न इतिहास व संस्कृती या घटकावर विचारलेले होते व सहा राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होते.
परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप बहुविधानी व संकल्पनात्मक असल्याने दिलेल्या पर्यायातील सर्व उत्तरे ओळखीची असण्याची शक्यता फार कमी असते. परिणामी, इतिहासाचा अभ्यास सखोल व ज्ञानाधिष्ठित असणे आवश्यक ठरते. यामध्ये प्रमाणित व मोजक्या संदर्भग्रंथांची निवड अपरिहार्य असते. कारण इतिहासाचे पारंपरिक व विस्तृत स्वरूप लक्षात घेता बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणावर पुस्तके व गाईड यांची रेलचेल असल्याने बरेच विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात.
सर्वप्रथम भारतीय इतिहासाची रूपरेखा स्पष्ट होण्यासाठी एनसीईआरटीची जुन्या अभ्यासक्रमाची प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत अनुक्रमे आर. एस. शर्मा, सतीशचंद्र व बिपन चंद्र लिखित क्रमिक पुस्तकांचे सखोल अध्ययन करावे. अशा पद्धतीने इतिहासाचा आवाका आल्यानंतर ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’- बिपन चंद्र, ‘आधुनिक भारताचा इतिहास’- ग्रोवर अँड ग्रोवर, ‘प्राचीन भारत’- डी. एन. झा आदी संदर्भग्रंथ पुढील वाचनाकरता वापरावेत. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृती या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या लक्षात घेता पारंपरिक संदर्भ स्रोत अपुरे आहेत. याकरिता आपल्याला इतर स्रोतांचाही आधार घेणे आवश्यक आहे. यामध्ये ASI, CCRT, साहित्य अकादमी, संस्कृती मंत्रालय यांच्या वेबसाइटस्ना वेळोवेळी भेट देऊन संस्कृतीविषयक घटकांचे संकलन करावे. त्याचबरोबर ‘द िहदू’, ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या वृत्तपत्रांतील संस्कृतीविषयक सदरांचे अध्ययन करून विविध पुरस्कार, भाषा, साहित्य, कला, सण आदी घटकांविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवणे श्रेयस्कर ठरेल. २०१४ मध्ये ‘मंगनियार समुदाय, राजस्थान याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये मंगनियार समुदायाविषयी लेख प्रसिद्ध झाला होता.
याबरोबरच ‘इंडिया इयर बुक’मधील दुसऱ्या प्रकरणाचाही बारकाईने अभ्यास करावा. यातूनच २०१४ च्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘सत्यमेव जयते’ व ग्रेगरियन कॅलेंडरमधील चत्र महिना हे दोन प्रश्न विचारले गेले होते.
नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा संतुलितपणे विचार करावा लागतो. इतिहासावरील १५ ते २० प्रश्नांचे ‘वेटेज’ लक्षात घेता. इतिहासाची तयारी उपरोक्त बाबींपुरती मर्यादित ठेवावी. अभ्यासक्रमातील इतर घटकांकडे दुर्लक्ष करू नये. सध्या परीक्षेचे बदलते स्वरूप लक्षात घेता इतिहासासारखा पारंपरिक व स्थिर (Static) अभ्यासघटक एकदा चांगल्या पद्धतीने तयार केल्यास इतिहासामध्ये हमखास गुण प्राप्त होऊ शकतात. मात्र, आपला अभ्यास सखोल व ज्ञानाधिष्ठित असावा. घोकंपट्टीला अजिबात स्थान देऊ नये. याकरिता निवडक अभ्यास साहित्याची जास्तीत जास्त उजळणी हे सूत्र नेहमी लक्षात ठेवावे.     
admin@theuniqueacademy.com                                                                                                   

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?