या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची प्रवेश प्रक्रियाविषयक जाहिरात पाहावी अथवा आयआयएमच्या हेल्प डेस्कशी १८००२६६०२०६ क्रमांकावर संपर्क साधावा. http://www.iimcat.ac.inया संकेतस्थळालाही भेट देता येईल.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमच्या अहमदाबाद, अमृतसर, बंगळुरू, बौद्ध, गया, कोलकाता, इंदूर, काशीपूर, कोझिकोडे, लखनऊ, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबलपूर, शिलाँग, शिरपूर, त्रिचरापल्ली, उदयपूर व विशाखापट्टणम येथील शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश चाचणी (कॅट : २०१५) या प्रवेश पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड परीक्षा
पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा देशांतर्गत १३६ शहरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रवेश परीक्षा केंद्रांवर २९ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. या सामायिक प्रवेश चाचणीमध्ये निर्धारित गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलविण्यात येऊन त्याआधारे त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या संबंधित शाखेतील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क
प्रवेशअर्जासह भरायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी १,६०० रु. तर राखीव गटातील उमेदवारांनी ८०० रु. भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२२ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.