News Flash

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगचा अभ्यासक्रम

अर्जदार विद्यार्थ्यांचे वय - ३० मे २०१८ रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगचा अभ्यासक्रम

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१८-२०२० या सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खालीलप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सूक्ष्म रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, कृषी, खाद्य विज्ञान, पॉलिमर सायन्स, औषधीशास्त्र, अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा – अर्जदार विद्यार्थ्यांचे वय – ३० मे २०१८ रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
  • निवड प्रक्रिया – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा १४ जून २०१८ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
  • वसतिगृहाची व्यवस्था – अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या मुंबई बाहेरील गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदारांनी ५०० रु. चा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग यांच्या नावे असलेला व मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iip-in.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज इंडियन इन्स्टिटय़ूट  ऑफ पॅकेजिंग ई- २, रोड नं. ८, एमआयडीसी एरिया, अंधेरी (पूर्व) मुंबई-  ४०० ०९३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जून २०१८ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 12:15 am

Web Title: indian institute of packaging
Next Stories
1 प्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)
2 सीसॅट सोप्या प्रश्नांचे विश्लेषण
3 अभ्यासक्रमातील वैविध्य अलिगढ मुस्लीम विद्यापीठ
Just Now!
X