25 March 2019

News Flash

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीचा अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, रायबरेली येथे उपलब्ध असणाऱ्या वैमानिक प्रशिक्षण व बीएस्सी (एव्हिएशन) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात

| September 29, 2014 07:13 am

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीचा अभ्यासक्रम
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, रायबरेली येथे उपलब्ध असणाऱ्या वैमानिक प्रशिक्षण व बीएस्सी (एव्हिएशन) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. 

जागांची संख्या व तपशील : अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांची संख्या १०० असून त्यापैकी १५ जागा अनुसूचित जातीच्या, ८ जागा अनुसूचित जमातीच्या तर २७ जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असून ५० जागा सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, विज्ञान हे विषय घेऊन व ५५ टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय कमीत कमी १७ वर्षे असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १९ ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना तोंडी परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीच्या नावे असणारा आणि रायबरेली येथे देय असलेला सहा हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी’च्या नावे पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीच्या www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, फुरसतगंज हवाईपट्टी, रायबरेली, उत्तर प्रदेश- २२९३०२ या पत्त्यावर ७ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

First Published on September 29, 2014 7:13 am

Web Title: indira gandhi rashtriya uran akademi