News Flash

अझीम प्रेमजी विद्यापीठाचे विशेष अभ्यासक्रम

२८ जानेवारी २०१६ पूर्वी आपले अर्ज सादर करावे लागतील.

अझीम प्रेमजी विद्यापीठाचे विशेष अभ्यासक्रम

अझीम प्रेमजी विद्यापीठाने एमए इन एज्युकेशन, एमए इन डेव्हलपमेंट आणि एमए इन पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड गव्हर्नन्स हे दोन वर्षे कालावधीचे पदव्युत्तर निवासी शिक्षणक्रम सुरू केले आहेत. २०१६-१८ या वर्षांच्या तुकडीसाठी वरील शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू झाले असून, त्यासाठी २८ जानेवारी २०१६ पूर्वी आपले अर्ज सादर करावे लागतील.
वरील शिक्षणक्रमांमधून, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व अध्यापन पद्धती : पूर्व प्राथमिक शिक्षण, शैक्षणिक संस्था- नेतृत्व आणि व्यवस्थापन, आरोग्य आणि समतोल आहार, कायदा आणि राज्य/ प्रशासकीय कारभार, उपजीविका, सार्वजनिक धोरणे, पर्यावरण, शाश्वत विकास यांसारख्या अनेक समाजोपयोगी विषयांचा सखोल अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होईल. वर्गातील शिक्षणासोबतच विविध समाजघटकांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यावर या अभ्यासक्रमाचा भर राहील.

प्रवेशपरीक्षा व मुलाखत
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरता विद्यापीठाच्या वतीने रविवार, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी देशभरातील ३५ हून अधिक केंद्रांवर प्रवेशपूर्व लेखी परीक्षा घेण्यात येईल. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर आणि या वर्षी कोणत्याही पदवी- परीक्षेच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अर्ज
करता येईल.

शिष्यवृत्ती व आर्थिक साहाय्य
ग्रामीण अथवा शहरी भागातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा वंचित गटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या वतीने अंशत: अथवा संपूर्ण शिष्यवृत्ती देण्याची, किंवा अल्पशा दराने बँकेचे कर्ज मिळवून देण्याची योजनाही कार्यान्वित झाली आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे शिक्षण, विकास तसेच इतर क्षेत्रांतही काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमाण
सुमारे ९० टक्के आहे.

प्रवेश प्रक्रिया
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज पाठविण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी- azimpremjiuniversity.edu.in/ SitePages/ admission- programme- pg- application- process.aspx या संकेतस्थळाला भेट द्या. टोल फ्री क्र. १८००२६६२००१. पत्ता- अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, पिक्सेल पार्क, बी ब्लॉक, पीइएस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस, इलेक्ट्रॉनिक सिटी, होसर रोड, बंगळुरू- ५६०१००

अधिक माहिती
ईमेल : admissions@apu.edu.in
वेबसाइट : www.azimpremjiuniversity.edu.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:06 am

Web Title: information about azim premji university special courses
Next Stories
1 ‘सीएसआयआर’मधील संशोधनपर संधी
2 क्षमता व आवडीनुसार करिअरची निवड करा..
3 तणावरहित वातावरण गरजेचे!
Just Now!
X