महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात जिल्हा व्यवस्थापक/ फिल्ड ऑफिसरच्या ८ जागा
अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची जाहिरात पाहावी अथवा महामंडळाच्या http://www.mahabaj.com Job List या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज भवन, कृषीनगर, अकोला- ४४४१०४ या पत्त्यावर १७ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालय- संरक्षण उत्पादन विभागात वरिष्ठ संशोधन अधिकारी (मेकॅनिकल) च्या ९ जागा
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. त्यांना मेकॅनिकल उत्पादन- दर्जा नियंत्रण विषय कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ नोव्हेंबर- ४ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १७ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

संरक्षण मंत्रालयाच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी- अंबरनाथ येथे कुशल कामगारांच्या ५९ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. संबंधित ट्रेडमधील कौशल्य प्राप्त केलेले असावे. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २८ नोव्हेंबर-
४ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ- ४२१५०२, जि. ठाणे या पत्त्यावर  १८ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, चेन्नई येथे असिस्टंट- फायनान्सच्या ११ जागा
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, चेन्नईची जाहिरात पाहावी http://www.imu.edu.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १८ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हैद्राबाद येथे कनिष्ठ संशोधकांसाठी ४ जागा
अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इस्रो, हैद्राबादची
जाहिरात पाहावी अथवा इस्रोच्या http://www.nrsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १८ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

अर्थ मंत्रालयांतर्गत राजस्व विभागात स्टेनोग्राफरच्या ११ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व स्टेनोग्राफीमधील अर्हताप्राप्त असावेत. त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असावा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कमिशनर कस्टम्स अ‍ॅण्ड सेंट्रल एक्साइजची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमिशनर कस्टम्स अ‍ॅण्ड सेंट्रल एक्साइज सेटलमेंट कमिशन, अ‍ॅडिशनल बेंच, सी- २८, उत्पादन शुल्क भवन, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर
२० डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

दक्षिण-मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी २१ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या ७ ते १३ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट अ‍ॅण्ड एचक्यू) रूम नं. ४१६, चौथा मजला, रेल निलयम, सिकंदराबाद- ५०००७१, तेलंगणा या पत्त्यावर २१ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

स्पोर्ट्स अ‍ॅथॉरटी ऑफ इंडियामध्ये विहित विषयातील रिसर्च फेलोशिपच्या ८९ संधी
अधिक माहितीसाठी स्पोर्ट्स
अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या http://www.sportauthoratyofindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर (पर्सोनेल अ‍ॅण्ड कोचिंग), स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, हेड ऑफिस, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्स, इस्ट गेस्ट, लोधी रोड,
नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर २१ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.