इस्रोमध्ये कुशल कामगारांसाठी ५ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकातील इस्रोची जाहिरात पाहावी अथवा www.iprc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने  २२ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी अ‍ॅशुरन्स नाशिक व भंडारा येथे कनिष्ठ कारकुनांच्या ६ जागा

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनासाठी ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनासाठी ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २६ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.dgaeroqa.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डीजीबी, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एरोनॉटिक क्वालिटी अ‍ॅशुरन्सद्वारा एचएएल, ओझर, नाशिक – ४२२२०७ या पत्त्यावर  २३ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर ज्यूट अ‍ॅण्ड अलाइड फायबर, कोलकाता येथे तंत्रज्ञांच्या ८ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.crijat.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर ज्यूट अ‍ॅण्ड अलाइड फायबर्स, बराकपोर, कोलकाता- ७००१२० या पत्त्यावर २३ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पाइसेस रिसर्च, कोझिकोड येथे सहायक तंत्रज्ञांच्या ४ जागा

उमेदवार विज्ञान, कृषी विज्ञान विषयातील पदवीधर असावेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.spices.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन  इन्स्टिटय़ूट ऑफ स्पाइसेस रिसर्च, मरिकन्न पोस्ट ऑफिस, कोझिकोड- ६७३०१२ या पत्त्यावर २५ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १० जागा

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज चेअरमन, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, साऊथ ईस्टर्न रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकाता- ७०००४३ या पत्त्यावर २५ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था, टोंक येथे तंत्रज्ञांच्या ७ जागा

अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या

२ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.cswri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आयसीएआर- सेंट्रल शिप अ‍ॅण्ड वुल रिसर्च इन्स्टिटय़ूट अविकानगर, जि. टोंक, राजस्थान- ३०४५०१ या पत्त्यावर २१ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.