महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विक्रीकर विभागातील कर साहाय्यक (गट ‘क’), विक्रीकर निरीक्षक (गट ’ब’ अराजपत्रित) आणि साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट ‘अ’ राजपत्रित) या तीन पदांकरता उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाते. कर साहाय्यक व विक्रीकर निरीक्षक या पदांकरता आयोगाद्वारे स्वतंत्र परीक्षेचे आयोजन केले जाते तर राज्यसेवा परीक्षेद्वारे साहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदाची निवडप्रक्रिया राबवली जाते. तिन्ही पदांच्या जबाबदाऱ्या व कामांचे स्वरूप यानुसार अभ्यासक्रमाची रचना व परीक्षेचे स्वरूप यांचा आकृतिबंध आखल्याचे आपल्याला दिसून येते.

आज आपण कर साहाय्यक परीक्षेची माहिती करून घेऊ.

महाराष्ट्र शासनाने २०१४ पासून विक्रीकर विभागातील कर साहाय्यक (गट ‘क’) या पदाकरता निवड प्रक्रिया राबवली आहे.

या परीक्षेसाठीची अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द (प्रति मिनीट). आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द (प्रति मिनीट).
  • अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असते.

Untitled-16

लेखी परीक्षेचे स्वरूप

लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य आणि बुक कीपिंग आणि अकाउन्टन्सी या विषयांच्या घटकांचा/उपघटकांचा समावेश होतो.

२०१४ च्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म विश्लेषण केल्यास मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता व अंकगणित, बुक कीपिंग आणि अकाउन्टन्सी या घटकांवर आयोगाने अधिक भर दिलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. वरील विश्लेषणावरून असे लक्षात येते की, हे घटक ‘पद निर्धारित करणारे घटक’ म्हणून अधोरेखित झालेले आहे. या चार घटकांवर मिळून २०१४ मध्ये १३१ आणि २०१५ मध्ये १२३ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यातूनच त्यांचे महत्त्व स्पष्ट होते.

विश्लेषणावरून असे दिसते की, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटना व वष्रे यांच्या जोडय़ा लावणे तसेच घटना कालानुक्रमाने लावणे, राज्यघटनेची तत्त्वे, कलम आणि तरतुदी, पंचायतराज, ७३व्या घटना दुरुस्ती यांच्या जोडय़ा लावणे आणि राज्य घटनेविषयी अभ्यासकांची मते यावर सामान्य तसेच बहुविधानात्मक प्रश्न विचारण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा भूगोल या घटकात महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, मृदा, खनिजे, नसíगक साधनसंपत्ती, पीक पद्धती, घाट व मार्ग यांच्यावर प्रश्न विचारले आहेत. बुक कीपिंग आणि अकाउन्टन्सी हा अभ्यासक्रम कर साहाय्यक या पदाच्या दैनंदिन कामाकाजाशी संबंधित असल्यामुळे या विषयाच्या संज्ञा, मूलभूत तत्त्वे, साहाय्यक पुस्तके या उपघटकांचा सूक्ष्म अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

अभ्यासाचे नियोजन

  • मराठी व इंग्रजी या घटकांचा अभ्यास व प्रश्नपत्रिकांचा सराव दररोज करावा.
  • बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यांना दररोज दिवसातून किमान २ तास द्यावेत.
  • बुक कीपिंग आणि अकाउन्टन्सी हा घटक नवीन असल्याने त्यातील संकल्पनांचा सखोल अभ्यास करावा.
  • रोज एक तास पेपर वाचून स्वत:चे टिपण तयार करावे.
  • इतर विषयांच्या अभ्यासाचे नियोजन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने करावे.
  • प्रश्नपत्रिकेचा सराव व विश्लेषणावर भर द्यावा.

संदर्भ साहित्यसूची

१. चालू घडामोडी – योजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे दैनिक.

२. मराठी –  सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे

मराठी व्याकरण – बाळासाहेब िशदे

३. इंग्रजी – English Grammer – Wren & Martin.

४.  बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित- आठवी, नववी, दहावी, एम.टी.एस.ची पुस्तके, क्वान्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड- आर.         एस. अगरवाल, रिझनिंग- आर. एस. अगरवाल.

५.  इतिहास- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर व बेल्हेकर.

महाराष्ट्राचा इतिहास- कठारे, गाठाळ

६. भूगोल-  महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, खतीब.

७. भारतीय राज्यघटना- इंडियन पॉलिटी- एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची अकरावी-

बारावीची पुस्तके.

८. बुक कीपिंग आणि अकाउन्टन्सी- अकरावी-बारावीची पुस्तके.

९. पंचवार्षकि योजना व आíथक सुधारणा- इंडियन इकोनॉमी- रमेश सिंग.

भारताचा व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल.

Untitled-17