News Flash

गुप्तचर विभागात अधिकारीपदाच्या मोठय़ा संधी

जागांची संख्या व तपशील - एकूण उपलब्ध जागांची संख्या १३०० आहे.

गुप्तचर विभागात अधिकारीपदाच्या मोठय़ा संधी

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या गुप्तचर विभागात अधिकारीपदावर नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • जागांची संख्या व तपशील – एकूण उपलब्ध जागांची संख्या १३०० आहे. यापैकी ९५१ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत तर १८४ जागा इतर मागासवर्गीय, १०९ जागा अनुसूचित जातीच्या तर ५६ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहेत.
  • आवश्यक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे.
  • वयोमर्यादा – अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
  • निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यात महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. दोन तास
  • कालावधीच्या व १५० गुणांच्या या लेखी निवड परीक्षेत सामान्य ज्ञान, विश्लेषणपर कल, आकडेमोड, इंग्रजी भाषा, निबंध लेखन, इंग्रजी परिच्छेद लिखाण यांसारख्या विषयांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविण्याऱ्या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे शुल्क १०० रु. असून ते संगणकीय पद्धतीने अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट व डेबिटकार्डद्वारा भरता येईल.
  • वेतनश्रेणी व भत्ते – निवड झालेल्या उमेदवारांना केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत गुप्तचर विभागात अधिकारी म्हणून दरमहा ९३००- ३४८०० + ४२०० श्रेणीभत्ता या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. वरील वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – वरील संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ ऑगस्ट २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागाची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या mha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१७ आहे. ज्या पदवीधर उमेदवारांना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयात गुप्तचर अधिकारी म्हणून आपली कारकीर्द सुरू करायची असेल त्यांनी तातडीने अर्ज करावेत आणि या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:37 am

Web Title: intelligence department jobs recruitment
Next Stories
1 का? कुठे? कसे? : पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान
2 एमपीएससी मंत्र : अवकाश संशोधन उपयुक्त अभ्यास १
3 यूपीएससीची तयारी : जातींचे प्रश्न
Just Now!
X