07 April 2020

News Flash

संशोधन संस्थायण : पदार्थविज्ञानाचा शोध

हैदराबादजवळच्या बालापूरमध्ये इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅण्ड न्यू मटेरियल्स ही संस्था वसली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रथमेश आडविलकर

इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅण्ड न्यू मटेरियल्स, हैदराबाद

हैदराबादजवळच्या बालापूरमध्ये इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅण्ड न्यू मटेरियल्स ही संस्था वसली आहे. धातुशास्त्र आणि पदार्थविज्ञान या विषयांमध्ये संशोधन करणारी ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. ही एक स्वायत्त संशोधन संस्था असून ती सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.

*  संस्थेविषयी

इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅण्ड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) या संस्थेची स्थापना १९९७ साली झाली. संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथील ९५ एकर परिसरात पसरलेले असून इतर दोन विस्तार केंद्रे चेन्नई आणि गुरगांव येथे आहेत. उच्च कार्यक्षमता असलेल्या सामग्री आणि प्रक्रियांचा विकास करणे आणि भारतीय उद्योगक्षेत्राला तंत्रज्ञान हस्तांतरण करणे या हेतूने एआरसीआय संशोधन करते. देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर संस्थेने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. एआरसीआयचे सर्व संशोधन उपक्रम संस्थेने निर्माण केलेल्या एकूण अकरा संशोधन केंद्रांद्वारे राबविले जातात. एआरसीआयने आतापर्यंत विविध प्रकारची एकूण पंधरा तंत्रज्ञान यशस्वीरीत्या सत्तावीस आस्थापनांना हस्तांतरित केले आहेत आणि काही इतर तंत्रज्ञान हस्तांतरणांतर्गत आहेत. संस्थेच्या या नानाविध क्षेत्रांतील संशोधनाचा फायदा ऊर्जा, वाहतूक व वैद्यकीय क्षेत्रांपासून वीज, अवकाश, उत्पादन व औद्योगिक क्षेत्राला होत आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्सपासून ते अल्टरनेटीव्ह एनर्जीसारख्या पदार्थविज्ञान शाखेशी संबंधित संशोधन क्षेत्रातील एक उत्कृष्ट संशोधन केंद्र ही संस्था म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आली आहे. ‘सिंथेसिस अ‍ॅण्ड फॅब्रिकेशन, प्रोसेसिंग, फिनिशिंग आणि कॅरॅक्टरायझेशन’ यांसारख्या संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांनी ही संस्था सज्ज आहे. म्हणूनच ही तिच्या क्षेत्रातील देशातील उच्चस्तरीय संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची एक प्रगत प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते.

*  संशोधनातील योगदान 

एआरसीआय ही पदार्थविज्ञान शाखेशी संबंधित संशोधन विषयांमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे.

संस्थेच्या संशोधनाच्या विषयांमध्ये सिरॅमिक्स, अल्टरनेटीव्ह एनर्जी, सरफेस इंजिनीयिरग, ऑटोमोटिव्ह एनर्जी मटेरियल्स, सोलर एनर्जी मटेरियल्स, नॅनोमटेरियल्स, इंजिनीयिरग  कोटिंग, सिरॅमिक प्रोसेसिंग, लेसर प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स, फ्युएल सेल टेक्नोलॉजी, नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स, कार्बन मटेरियल्स, सोल-जेल कोटिंग्ज, मटेरियल्स कॅरॅक्टरायझेशन या प्रमुख विषयांचा समावेश आहे. संस्थेच्या संशोधनातील एकूण वाटचालीमध्ये येथील सेंटर फॉर टेक्नोलॉजी अ‍ॅक्विझिशन अ‍ॅण्ड ट्रान्स्फर, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेन्टेशन, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड सिव्हिल मेन्टेनन्स, टेक्निकल इन्फम्रेशन सेंटर आणि सेंटर फॉर आयटी सíव्हसेस या तांत्रिक विभागांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे.

एआरसीआय अमेरिकेतील अप्लाइड मटेरियल्स, बॅलार्ड पॉवरसिस्टम्स, नॅनो मेकॅनिक्स, कॉìनग इनकॉर्पोरेटेड आणि बोइंग या कंपन्यांबरोबर, बेल्जियममधील अ‍ॅडव्हान्स्ड मेकॅनिकल ऑप्टिकल सिस्टम्स, ऑस्ट्रेलियातील डेकीन विद्यापीठ, जर्मनीतील फ्रानहॉफर इन्स्टिटय़ूट, स्वीडनमधील होगन्स एबी, फ्रान्समधील एमपीए इंडस्ट्री तसेच युक्रेन, रशिया, जपान, कॅनडा इत्यादी देशांमधील अनेक खासगी कंपन्या, विद्यापीठे व संशोधन संस्थाबरोबर भागीदारीमध्ये संशोधन करत आहे. एआरसीआय फक्त परदेशातील नव्हे तर देशातील अनेक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांना आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सहकार्य करते. भारतातही एआरसीआय  एबीबी लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांसारख्या खासगी व शासकीय कंपन्यांसोबत संशोधन करते. तर आंध्र विद्यापीठ, मुंबई, कानपूर, मद्रास, खरगपूर येथील आयआयटीसारख्या प्रथितयश शैक्षणिक संस्थांबरोबर भागीदारीमध्ये संशोधन करत आहे.

* विद्यार्थ्यांसाठी संधी

आयआयटी मुंबई आणि मद्रास यांच्या सहकार्याने एआरसीआय शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम राबवते. आयआयटीच्या प्रवेशप्रक्रियेद्वारे उत्तीर्ण होऊन विद्यार्थी एआरसीआय संस्थेमध्ये पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. याव्यतिरिक्त दर वर्षी संस्था गुणवत्ताप्राप्त अनेक महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान ४५ तर कमाल ६० दिवसांचे समर ट्रेनिंग आयोजित करते.

*   संपर्क

इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अ‍ॅण्ड न्यू मटेरियल्स,

बालापूर पी.ओ., हैदराबाद, तेलंगाणा -५००००५

दूरध्वनी   +९१-४०- २४४५२२००-३०

ई-मेल – info@arci.res.in

संकेतस्थळ – https://www.arci.res.in/

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2018 3:08 am

Web Title: international advanced research center for powder metallurgy and new materials
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : केंद्र शासनाचे संलग्न आरोग्य सेवा
2 उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे
3 मुक्त शिक्षणाचा राजमार्ग इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली
Just Now!
X