प्रस्तुत लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या अभ्यासघटकामध्ये प्रामुख्याने भारताचे इतर देशांशी व आंतरराष्ट्रीय संघटनांशी असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, जगभरामध्ये मोठय़ा संख्येने असलेले परदेशस्थ भारतीय या विविध घटकांचा समावेश होतो. हा अभ्यासघटक समकालीन असल्याने भारताशी संबंधित आणि भारताच्या हितसंबंधांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या जगभरातील घडामोडींचा नियमितपणे मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते.
या घटकाच्या विस्तृत स्वरूपामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना त्यावर प्रभुत्व मिळवणे आवाक्याबाहेरचे वाटते. मात्र, इतर अभ्यासघटकांप्रमाणेच यातील स्थिर स्वरूपाचा भाग उदा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विकास- यामध्ये अलिप्ततावादी धोरण, पंचशील तत्त्वे, समाजवादाप्रति व सोव्हिएत रशियाशी असणारी जवळीक, ‘पूर्वेकडे पाहा’ धोरण, गुजरात सिद्धांत आदी बाबींचा समग्र आढावा घेऊन मागील काही दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले बदल, उदा. शीतयुद्ध, सोव्हिएत रशियाचे पतन, एक ध्रुवीय जग, ९/११ चा हल्ला व या बदलांचा प्रतिसाद म्हणून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेला बदल व अवलंबलेल्या विविध रणनीतींचे सूक्ष्म आकलन केल्यास आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकावर प्रभुत्व मिळवणे सुलभ होईल.
या अभ्यासघटकाची उकल करताना सर्वप्रथम ‘भारत व शेजारील देश यांतील संबंध’ या उपघटकाचा विचार करूयात. यामध्ये भारताचे चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांशी असणाऱ्या संबंधांचे अध्ययन करावे लागेल. भारताचे शेजारील देशांशी संबंध अभ्यासताना संबंधांचे महत्त्व, ऐतिहासिक पाश्र्वभूमी, आíथक संबंध व समकालीन मुद्दे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. उदा. भारत-पाकिस्तान या दोन देशांचे संबंधांचे अध्ययन करताना ऐतिहासिक पाश्र्वभूमी, आíथक संबंध व सीमावाद, दहशतवाद, काश्मीर प्रश्न, द्विपक्षीय चर्चा इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच भारत-बांगलादेश संबंध अभ्यासताना, भू-सीमा करार, पाणीवाटप विवाद, बेकायदेशीर स्थलांतर, आसाममधील िहसाचार या बाबींचा विचार करावा लागतो. या अभ्यासघटकातील दुसऱ्या उपघटकांमध्ये भारताचे द्विपक्षीय संबंध अभ्यासावे लागतील. उदा. भारताचे जपान, रशिया, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, आदी देशांबरोबरच्या संबंधांचे अध्ययन करावे. भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी पश्चिम आशिया आणि मध्य आशिया या प्रदेशातील देशांसोबतचे संबंध अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या प्रादेशिक गटांबरोबर असलेल्या संबंधांमध्ये सार्क, इब्सा, ब्रिक्स, बिम्स्टेक, असियान आदी प्रादेशिक गटांसोबतच्या संबंधांचा अभ्यास करावा, तसेच जागतिक व्यापार संघटना, जी-20, संयुक्त राष्ट्रसंघ, एशियन डेव्हलपमेंट बँक, ईस्ट एशिया समीट, अ‍ॅपेक ओईसीडी नाटो आदी आंतरराष्ट्रीय गटांसोबतच्या संबंधांविषयी तयारी करावी. उपरोक्त संबंध, सीमावाद, बौद्धिक संपदा अधिकार, जागतिक पर्यावरणीय वाटाघाटी, व्यापारविषयक वाटाघाटी व विवाद, दहशतवादाशी सामना, संरक्षण व सुरक्षाविषयक करार, जागतिक शांतता आदी बाबींच्या अनुषंगाने पाहणे महत्त्वपूर्ण ठरते. भारत व संयुक्त राष्ट्र संघ यांच्यातील संबंधांचा अभ्यास, भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील योगदान- उदा. शांतता मोहिमांमधील सहभाग, सुरक्षा परिषदेचा विस्तार व सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताचे प्रयत्न आदी बाबींच्या अनुंषगाने करावा.
विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर होणारा परिणाम, उदा. अमेरिका-इमिग्रेशन विधेयक, एच 1 ई व्हिसा, बौद्धिक संपदा अधिकार याबाबतची धोरणे, तसेच सौदी अरेबिया, चीन, इ. देशांच्या देशांतर्गत धोरणे भारतावर परिणाम करतात. विविध देशांमध्ये वास्तव्यास असणारे परदेशस्थ भारतीय नागरिक यासंबंधींच्या ओसीआय (डउक), पीआयओ (ढकड), अनिवासी भारतीय, नागरिकत्वासंबंधीचे मुद्दे इ. बाबींचे आकलन करावे. यानंतर भारतातील त्यांचे सांविधानिक अधिकार, वैधानिक तरतुदी, उदा. मतदानाचा अधिकार, ओसीआय व कार्डाचे संमीलीकरण आदी बाबी अभ्यासाव्यात. परदेशस्थ भारतीयांचे भारतासाठीचे योगदान, ते वास्तव्य करत असलेल्या देशातील समस्या, विविध घटना, घडामोडी, राजवटी, धोरणे कशा प्रकारे भारताच्या हितसंबंधांना प्रभावित करतात हे पाहणे संयुक्तिक ठरेल. परदेशस्थ भारतीय कामगारांच्या संरक्षणासाठी व कल्याणासाठी भारत सरकार राबवत असलेल्या योजना, ट्रक 2 डिप्लोमसीतील त्यांचा सहभाग आदी मुद्दे पाहणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संघटना, संस्था व फोरम कार्यरत आहेत. उदा. संयुक्त राष्ट्रसंघ व त्यातील युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आदी संस्था, त्यांची रचना, उद्दिष्टे पाहावीत. याबरोबर जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांसारख्या आíथक व व्यापारविषयक संघटना, त्यांची रचना आदींचे अध्ययन करावे.
परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या मूलभूत आकलनाकरता इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, या ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकाबरोबरच नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले इंडियाज फॉरेन पॉलिसी- व्ही. पी. दत्त, पॅक्स इंडिका- शशी थरूर व इंडियाज फॉरेन पॉलिसी चॅलेंज अँड स्टट्रेजी रिथिंकिंग- राजीव व सिक्री हे संदर्भग्रंथ उपयुक्त आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांविषयक मूलभूत आकलनाकरता बाजारात उपलब्ध कोणतेही एक गाइड पुरेसे ठरते.
समकालीन स्वरूपामुळे आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण या अभ्यासघटकांची तयारी नियमितपणे करावी लागते. याकरता दररोज वृत्तपत्रे, मासिके तसेच सरकारी संकेतस्थळांवर प्रसिद्ध होणारे या विषयाशी निगडित लेख वाचावेत. यासाठी दि िहदू, दि इंडियन एक्स्प्रेस आदी वर्तमानपत्रे उपयुक्त आहेत. दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक सी. राजामोहन यांचे लेख पाहावेत; याबरोबरच वर्ल्ड फोकस मासिक, परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ, परराष्ट्र मंत्रालयाचा वार्षकि अहवाल आदी स्रोत या अभ्यासघटकाशी निगडित चालू घडामोडींची तयारी करण्यास पुरेसे आहेत.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण