News Flash

नवी संधी

अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

| August 24, 2015 01:01 am

भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी-इंजिनीअरिंगच्या
२५ जागा  
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी भारत डायनॅमिक लिमिटेडची ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ ऑगस्ट २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या  bdl.ap.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २८ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.
‘इस्रो’मध्ये सायन्टिस्ट/ इंजिनीअरिंगच्या १७ जागा
उमेदवारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एअरकंडिशनिंग अथवा आर्किटेक्चरल इंजिनीअरिंगमधील पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘इस्रो’च्या www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि या संकेतस्थळावर २४ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.
मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर येथे अकाऊंटंटच्या २० जागा
अधिक माहितीसाठी मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशनच्या www.mecl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि संकेतस्थळावर २५ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.
अ‍ॅटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्पोरेशन अ‍ॅण्ड रिसर्च, हैद्राबाद येथे  ७ जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३७ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४  जुलै २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली अ‍ॅटॉमिक मिनरल्स अ‍ॅण्ड रिसर्चची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह  असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आर), अ‍ॅटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्पोरेशन अ‍ॅण्ड रिसर्च, १-१०-१५३/१५६, एएमडी कॉम्प्लेक्स, बेगमपेठ, हैद्राबाद- ५०००१६, तेलंगण या पत्त्यावर २५ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
इंडियन ब्युरो ऑफ माइन्समध्ये सीनिअर जिऑलॉजिस्टच्या ७ जागा
उमेदवारांनी जिऑलॉजी अथवा अप्लाईड जिऑलॉजीमध्ये एमएस्सी केलेले असावे. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ ऑगस्ट २०१५ या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. अथवा आयोगाच्या  www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या संकेतस्थळावर २७ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.
ऑर्डनन्स डेपो, तळेगाव येथे सुपरिटेंडन्ट स्टोर्सच्या १० जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर, इंजिनीअरिंगमधील पदवीधारक अथवा मटेरियल मॅनेजमेंटमधील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४  ऑगस्ट २०१५च्या अंकातील ऑर्डनन्स डेपो, तळेगावची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील भरलेले अर्ज कमांडंट, ऑर्डनन्स डेपो, तळेगाव-दाभाडे,
पुणे- ४१०५०६ या पत्त्यावर २८ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

ईस्टर्न नेव्हल कमांड, विशाखापट्टणम येथे स्टोअर-कीपरच्या १८४ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांना संबंधित कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४  जुलै २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली ईस्टर्न नेव्हल कमांडची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील  भरलेले अर्ज दि मटेरियल्स सुपरिटेंडंट, मटेरियल्स ऑर्गनायझेशन, कंचरपालेम पोस्ट, ९- आयएसआरडी एरिया, नवशक्ती नगर, विशाखापट्टणम- ५३०००८,
आंध्र प्रदेश या पत्त्यावर ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
 सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युएल रिसर्च, धनबाद येथे सीनियर सायंटिस्टच्या १८ जागा  
उमेदवार केमिस्ट्री, ऑर्गेनिक, फिजिकल, अप्लाईड केमिस्ट्री, कोल सायन्सेस यांसारख्या विषयातील एमएस्सी-पीएच.डी. असावेत.
वयोगट ३२ ते ३७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ ऑगस्ट २०१५च्या अंकातील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युएल रिसर्चची जाहिरात पाहावी. अर्ज सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युएल रिसर्च, बारवा रोड,
धनबाद- ८२६०१५, झारखंड या पत्त्यावर  ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
सशस्त्र सीमा दलात असिस्टंट कमांडंट-व्हेटर्नरीच्या ८ जागा
उमेदवारांनी व्हेटर्नरी सायन्स अथवा अ‍ॅनिमल हजबेंडरी या विषयातील पदवी घेतलेली असावी.
ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत.
वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाच्या नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४  ऑगस्ट २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इन्स्पेक्टर जनरल (पर्सोनेल), फोर्स हेडक्वॉर्टर, ईस्ट ब्लॉक- ५, आर. के. पुरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2015 1:01 am

Web Title: job opportunities 4
टॅग : Job
Next Stories
1 यूपीएससी मुख्यपरीक्षा : लेखनक्षमतेचा विकास
2 विज्ञान व तंत्रज्ञान विकास
3 वित्तीय व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास
Just Now!
X