सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), मुंबई रिफायनरी, माहुल, मुंबई येथे अ‍ॅप्रेंटिसशिप (अमेंडमेंट) अ‍ॅक्ट १९७३ अंतर्गत एकूण ८७ अ‍ॅप्रेंटिसेसची भरती.

(I)कॅटेगरी – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस –

एकूण ४२ पदे.

अ‍ॅप्रेंटिसशिप कालावधी १ वर्ष.

स्टायपेंड – दरमहा रु. २५,०००/-.

(१)  केमिकल इंजिनीअरिंग – ११ पदे.

(२) सिव्हिल इंजिनीअरिंग – ८ पदे.

(३) इलेक्ट्रिकल – ५ पदे.

(४) इन्फो/टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स

– ३ पदे.

(५) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग – २ पदे.

(६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १३ पदे.

पात्रता – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस – संबंधित विषयातील फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग पदवी किमान ६.३ CGPA गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग – ५.३ CGPA)

(II) कॅटेगरी – टेक्निशियन (अ‍ॅप्रेंटिसेस) – एकूण ४५ पदे.

अ‍ॅप्रेंटिसशिप कालावधी १ वर्ष. स्टायपेंड – दरमहा रु. १८,०००/-.

(१) केमिकल इंजिनीअरिंग – ५ पदे.

(२) सिव्हिल – ७ पदे.

(३) इलेक्ट्रिकल – ८ पदे.

(४) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग – ८ पदे.

(५) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १७ पदे.

पात्रता – टेक्निशियन (डिप्लोमा) अ‍ॅप्रेंटिसेस – संबंधित विषयातील फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग – ५०% गुण)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि पालघर येथील रहिवासी उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अजा/अज/इमाव/दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले संबंधित दाखले सादर करणे अनिवार्य आहे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी कोविड-१९ची लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे. (इमाव – ३० वर्षे, दिव्यांग – ३७ वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे)

निवड पद्धती – उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांनुसार कॅटेगरी (खुला/ इमाव/ अजा/ अज) निहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. नंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

पहिली पायरी- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NATS पोर्टल  http://www.mhrdnats.gov.in वर आपले नाव रजिस्टर/एनरोल करावे. Click Enroll > Complete the application form > A unique Enrolment number will be generated ि रजिस्ट्रेशननंतर एनरोलमेंट व्हेरिफिकेशनकरिता एक दिवस थांबावे

लागेल.

त्यानंतर दुसरी पायरी –  Login > Establishment Request menu >find Establishment > upload resume > choose Establishment Name – Bharat Petroleum Corporation Ltd., Mumbai, Refinery  शोधून ऑनलाइन अर्ज करावा.

NATSपोर्टलवर एनरोलमेंट करण्याचा अंतिम दि. २१ सप्टेंबर २०२१. BPCL, मुंबई रिफायनरीकरिता अर्ज करण्याचा अंतिम दि. २४ सप्टेंबर २०२१.

NATS पोर्टलवरील एनरोलमेंट संबंधित शंकासमाधानासाठी morenr@bharatpetroleum.in

या ई-मेलवर संपर्क साधावा.

फोन नं. ०२२-२५५३३५३२.