बँक ऑफ बरोडामध्ये ुमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये १५ जागा

अधिक तपशिलासाठी बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या २८ जागा

अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  www.upsc.gov.in अथवा  www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट: ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ८ संधी

संस्थेच्या ज्युनिअर रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये रिसर्च फेलोशिपच्या संधी आहेत. अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स विषयातील पदवीधर व जीएटीई पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी याच विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा-२८ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसह डायरेक्टर, डीआरडीई, सी. व्ही. रमण नगर, बंगळुरू- ५६००९३ या पत्त्यावर १६ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

इस्रोमध्ये संशोधक-अभियंत्यांच्या ७ जागा

उमेदवारांनी संगणक विज्ञान, एरोस्पेस इंजिनीअरिंग, भौतिकशास्त्र, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा पदव्युत्तर अर्हता उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा- ३५ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

नौदल- मुंबई येथे वाहनचालकांच्या ३ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांच्याकडे मध्यम-श्रेणी वाहनचालनाचा वैध परवाना असावा. वयोमर्यादा- ३२ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील भरलेले अर्ज आवश्यक  कागदपत्रांसह ऑफिसर कमांडिंग, ७५७ (१), टीपीटी पी-१ एएससी (सीआयव्ही जीटी), डॉ. होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई- ४००००५ या पत्त्यावर १६ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

तोफखाना मुख्यालय, देवळाली, नाशिक येथे कनिष्ठ कारकुनांच्या ४ जागा

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रताधारक असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा- ३० वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील भरलेले अर्ज दि कमांडंट, तोफखाना मुख्यालय, देवळाली, नाशिक- ४२२४०१ या पत्त्यावर १६ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

सैनिक छावणी, जबलपूर येथे कनिष्ठ लिपिकांच्या ३ जागा

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. इंग्रजी व हिंदी टंकलेखनाची पात्रता असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ मार्च २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा cauttboardjabalpur.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये उप-अभियंत्याच्या ५ जागा

वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘बीईएल’च्या www.bel-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्हची २२० पदे

(i) इंजिनीअरिंग सिव्हिल (५० पदे)

(ii) इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल (५० पदे)

(iii) इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी (२० पदे).

वरील पदांसाठी पात्रता-  संबंधित विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(iv) एअरपोर्ट ऑपरेशन्ससाठी पात्रता-  अ) विज्ञान शाखेतील पदवी.  ब) मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी.  क) हलकी वाहने चालवण्याचा परवाना. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण असावेत.

वयोमर्यादा-  २७ वष्रे (इमाव-  ३० वष्रे, अजा/अज-  ३२ वष्रे) ज्या उमेदवारांनी जाहिरात क्र. ०२/२०१२ नुसार अर्ज केला असेल, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. फक्त पत्ता, ई-  मेल आयडी यातील बदलांची ऑनलाइन माहिती द्यावी. परीक्षा शुल्क –  रु. ४००(अजा/ अज/महिला/ अपंग उमेदवारांना फी माफ). अर्ज करण्याच्या प्रक्रियेतील शंकांसाठी hrcell@aai.aero या ई-  मेलवर विचारणा करा. अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.aai.aero या संकेतस्थळावर १८ एप्रिल २०१६ ते १७ मे २०१६ पर्यंत करावेत.

भारत सरकार, भाभा अणुसंशोधन केंद्रमधील शिक्षणक्रम

‘डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स’ या एक वर्ष (ऑगस्ट २०१६ –  जुल २०१७) कालावधीच्या कोर्ससाठी अर्ज मागवत आहे. उपलब्ध जागा-  अप्रायोजित:  २५ जागा आणि प्रायोजित:

५ जागा. वयोमर्यादा- १ ऑगस्ट २०१६ रोजी २६ वष्रे (इमाव –  २९ वष्रे, अजा/अज –  ३१ वष्रे).

शैक्षणिक पात्रता-  एम्.एस्सी. (फिजिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. बी.एस्सी. फिजिक्स मुख्य विषयासह किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. जर ग्रेड पद्धती असेल तर विद्यापीठाकडून प्राप्त ग्रेडची गुणांच्या टक्केवारीत परिवर्तन करणारी योजना अर्जासोबत जोडावी अन्यथा अर्ज रद्द ठरवण्यात येईल.

परीक्षा शुल्क-   रु. २०० (महिला/ अजा/ अज उमेदवारांना फी माफ). प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ९,३०० विद्यावेतन देण्यात येईल. (विद्यावेतन वाढीच्या विचाराधीन आहे.)

निवड पद्धती-  लेखी परीक्षेनंतर मुलाखत. लेखी परीक्षेतून फक्त मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. अंतिम निवड मुलाखतीमधील गुणांवर आधारीत असेल. ‘डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स’ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी इंटर्नशिप करून ‘रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (मेडिकल)’ परीक्षा द्यावी लागेल. आर.एस.ओ. (इंडस्ट्रियल) म्हणून काम करण्यासाठी इंटर्नशिप करण्याची आवश्यकता नाही. त्यांना फक्त ‘आर.एस.ओ. इंडस्ट्रियल’ परीक्षा द्यावी लागेल. अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती व अर्जाचे स्वरूप यासाठी www.barc.gov.in या संकेतस्थळावर किंवा होमी भाभा राष्ट्रीय संस्थेची वेबसाइट www.hbni.ac.in वर पाहा. अर्ज ऑफलाइन पद्धतीने २९ एप्रिल २०१६ पर्यंत स्वीकारले जातील.

राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) च्या परिमंडळांत तंत्रज्ञांची भरती

श्रेणी-  ४ (एकूण –  ४८८). रिक्त पदांची भरती. (पुणे परिमंडळ-  १४६ जागा, नाशिक-  ९१, नागपूर-  ११, कराड- १०२, वाशी-  १०५, अमरावती-  ३३).

शैक्षणिक अर्हता-  वीजतंत्र या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र (एमसीटीव्हीटी) प्रमाणपत्र.

वयोमर्यादा-  १८ ते ३३ वष्रे. (अजा/ अज- १८ – ३८ वष्रे, इमाव- १८ – ३६ वष्रे).

परीक्षा शुल्क- रु. ४०० (मागासवर्गीय रु. २००) ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.mahatransco.in या संकेतस्थळावर २१ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत.

सिडकोमध्ये वर्गातील खालील पदांची भरती.

(i) उद्यान साहाय्यक (३ जागा) पात्रता :  दहावी उत्तीर्ण  कृषी/उद्यानशास्त्रामधील पदविका ३

वर्षांचा अनुभव.

(ii) भूमापक (सव्‍‌र्हेअर) (२१ जागा). पात्रता:   दहावी उत्तीर्ण  आयटीआय (सव्‍‌र्हे) प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

(iii) मुख्य भूमापक (१ जागा). पात्रता :  दहावी उत्तीर्ण  शासकीय कमíशयल डिप्लोमाधारक  ३

वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : ३१ मार्च २०१६ रोजी ३३ वष्रेपर्यंत (मागासवर्गीय ३८ वर्षांपर्यंत).

परीक्षा शुल्क :  रु. ५००  (मागासवर्गीय रु. २५०). निवडपद्धती-  ऑनलाइन परीक्षा मे/जून २०१६ मध्ये घेण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २५ एप्रिल २०१६ पर्यंत करावा.

भारतीय हवाई दलाच्या विविध मेंटेनन्स कमांड युनिट्समध्ये एकूण २२६ ग्रुप-  सी सिव्हिलियन पदांची भरती

(कनिष्ठ लिपिक-  (एल्.डी.सी.), भांडार अधीक्षक, कारपेंटर, पेंटर, फायरमन, कुक, मल्टिटास्िंकग स्टाफ (एम्टीएस्), सफाईवाला इ. महाराष्ट्रातील रिक्त पदांची संख्या नागपूर (१२ पदे –  एम्टीएस् ६ पदे), पुणे (९ पदे –  एम्टीएस् ४ पदे), ओझर नाशिक (१७ पदे –  एम्टीएस् ७ पदे), देवळाली नाशिक (२५ पदे –  एम्टीएस् १५ पदे), मुंबई (३ पदे –   एम्टीएस् १ पद (अज)).

पात्रता- (i) एल्डीसी- बारावी उत्तीर्ण  ३५ श.प्र.मि. इंग्रजी किंवा ३० श.प्र.मि. िहदी टायिपग कॉम्प्युटरवर.

(ii) भांडार अधीक्षक- पदवी एक वर्षांचा संबंधित अनुभव असल्यास प्राधान्य.

(iii) सुतार/रंगारी- आयटीआय प्रमाणपत्र.

(iv) फायरमन- दहावी  फायर फायटिंग ट्रेिनग.

(v) कुक/एम्टीएस्/ सफाईवाला- दहावी उत्तीर्ण.

वयोमर्यादा-  एल्डीसी/फायरमनसाठी १८ ते २७ वष्रे, इतर पदांसाठी १८ ते २५ वष्रे. (इमाव ३ वष्रे, अजा/अज ५ वष्रे, कमाल वयोमर्यादा शिथिलतम). निवड पद्धती-  सामान्य बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांवर आधारित लेखी परीक्षा. त्यानंतर आवश्यक तिथे कौशल्य चाचणी. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नमुन्यानुसार २ मे २०१६ पर्यंत  पोहोचतील असे ज्या एअरफोर्स स्टेशनसाठी अर्ज करायचा आहे, त्या पत्त्यावर पाठवावेत.

कृषी व ग्रामीण विकास (नाबार्ड) नॅशनल बँकेत भरती

साहाय्यक व्यवस्थापक ग्रेड- ए (१०० पदे) आणि व्यवस्थापक ग्रेड- बी (१५ पदे). एकूण ११५ पदांची भरती. साहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘ए’.

पात्रता-  पदवी (कोणत्याही शाखेची) किमान ५० टक्के गुणांसह (सर्व सत्रे मिळून) उत्तीर्ण.

व्यवस्थापक ग्रेड बी-  पदव्युत्तर पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा एमबीए. ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा-  साहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए-  २१ ते ३० वष्रे; व्यवस्थापक ग्रेड बी-  २१-  ३५ वष्रे (कमाल वयोमर्यादा अजा/अज ५ वष्रे आणि इमाव ३ वष्रे शिथिलक्षम).

निवडपद्धती –  (्र) ऑनलाइन लेखी परीक्षा-  २०० गुण पहिल्या टप्प्यात पूर्वपरीक्षा. दुसऱ्या टप्प्यात  मुख्य परीक्षा (२०० गुण) आणि तिसऱ्या टप्प्यात  मुलाखत २५ गुण. अजा/अज/ इमाव/ अपंग उमेदवारांना नाबार्ड परीक्षा पूर्व प्रशिक्षण  विनामूल्य देणार आहे. त्यासाठी वेगळा अर्ज सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज-   नाबार्डची वेबसाइट ६६६.ल्लुंं१.ि१ॠ  संकेतस्थळावर  १३ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत.

सिडकोमध्ये अनुजाती/अनु.जमाती वर्गासाठी विशेष पद भरती.

(i) लिपिक टंकलेखक-  (अजा- ११,अज- ८). पात्रता –  दहावी उत्तीर्ण  इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि./मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

(ii) लेखा लिपिक –  (अजा- १०, अज- ४). पात्रता – बारावी (वाणिज्य) उत्तीर्ण  लेखा साहाय्यक (टॅली) प्रमाणपत्र.

(iii) लघुश्रेणी लघुलेखक (अजा- ११,

अज- ९). पात्रता-  दहावी उत्तीर्ण  १००/४० इंग्रजी/मराठी शॉर्टहँड स्पीड.

(iv) सुरक्षा रक्षक-  (अजा- २१, अज-  ४). पात्रता-  दहावी  प्रगत सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र /

(उंची-  १६५ सें.मी., वजन-  ५० कि.ग्रॅ.,

छाती- ८१- ८६ सें.मी.).

(v) वाहनचालक (अजा- ४, अज- ४). पात्रता-  दहावी  एलएमव्ही परवाना  ड्रायव्हर कम मेकॅनिक प्रमाणपत्र ३ वर्षांचा अनुभव.

(vi) शिपाई- (अजा-  ५, अज-  ६). पात्रता-  दहावी उत्तीर्ण. वयोमर्यादा-  १८-३३ वष्रे (मागासवर्गीय १८-३८ वष्रे). परीक्षा शुल्क- रु. २५०.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज २५ एप्रिल २०१६ पर्यंत www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावेत.