सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) मध्ये एमबीएसाठी प्रवेश.

IIM कॉम्प्युटर बेस्ड ‘कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ (CAT २०२१)’ दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी ३ सत्रांमध्ये घेणार आहे.

देशभरातील अहमदाबाद, अमृतसर, बंगलोर, बोधगया, कलकत्ता, इंदौर, जम्मू, काशिपूर, कोझिकोडे, लखनौ, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबळपूर, शिलाँग, सिरमौर, तिरूचिरापल्ली, उदयपूर, विशाखापट्टणम् येथील IIMs मधील विविध पोस्ट ग्रॅज्युएट आणि फेलो प्रोग्राम्ससाठी प्रवेशाकरिता CAT २०२१ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.

CAT २०२१ मधील स्कोअरवर आधारित IIMs मधील पुढील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स इन मॅनेजमेंट (PGP); एमबीए(IIM अमृतसर  / कलकत्ता / जम्मू / काशिपूर / संबलपूर / सिरमौर / उदयपूर); पी.जी.पी. (IIM अहमदाबाद / बंगलोर / बोधगया / इंदौर / कोझिकोडे / लखनौ /  नागपूर / रायपूर / रांची / रोहतक / शिलाँग / तिरुचिरापल्ली / विशाखापट्टणम्) आणि इतर पोस्ट ग्रॅज्युएट कोस्रेसकरिता प्रवेश दिला जातो. सर्व IIMs मधे फेलो प्रोग्राम्स इन मॅनेजमेंट (FPM) (Doctoral) साठी प्रवेश दिला जातो.

सहभागी IIMs कडून PGP प्रोग्राम्सव्यतिरिक्त इतर प्रोग्राम्ससाठी वेगवेगळी जाहिरात काढली जाईल.

पुढील राज्यांतील Non-IIM  मेंबर इन्स्टिटय़ूशन्समधील मॅनेजमेंट प्रोग्राम्सकरिता प्रवेशासाठी CAT २०२१ चा स्कोअर ग्राह्य़ धरला जातो. आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम, हरयाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, ओरिसा, उत्तराखंड, चंदिगड, कर्नाटक, पंजाब, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश, तामिळनाडू.

CAT २०२१ करिता पात्रता – ५०%गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (अजा / अज / दिव्यांग उमेदवारांसाठी ४५%गुण) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. जर असे उमेदवार प्रवेशासाठी निवडले गेल्यास त्यांना शैक्षणिक संस्थेचे प्रिन्सिपल किंवा युनिव्हर्सटिीमधील रजिस्ट्रार यांजकडून उमेदवाराने पदवी प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता केलेली आहे, असे सर्टिफिकेट सादर करावे लागेल आणि पात्रता पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा (मार्कशीट आणि सर्टिफिकेट) दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

परीक्षा पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड् ऑनलाइन लेखी परीक्षा एकूण ३०० गुणांसाठी – ३ सेक्शन्स.

सेक्शन १ – Verbal Ability and Reading Comprehension (VARC) – ३४ प्रश्न.

सेक्शन २ –   Data Interpretation and Logical Reasoning (DILR) – ३२ प्रश्न.

सेक्शन ३ – Quantitative Ability (QA) – ३४ प्रश्न.

प्रत्येक सेक्शनसाठी ४० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. एकूण कालावधी – २ तास. प्रत्येक सेक्शनमधील सर्वच प्रश्न MCQ टाइप नसतील. काही प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना टाइप करावी लागतील. MCQ टाइप प्रश्नांसाठी बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील आणि चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केले जाईल.

रजिस्ट्रेशन फी – रु. २,२०० / – (अजा / अज / दिव्यांग उमेदवारांसाठी रु. १,१०० / – संबंधित सर्टििफकेट अपलोड करणे आवश्यक).

अ‍ॅडमिट कार्ड उमेदवारांना दि. २७ ऑक्टोबर २०२१ पासून संके तस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा केंद्र – अमरावती, जळगाव, नागपूर, पुणे, सोलापूर, नवी मुंबई, अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, रायगड, ठाणे, वसई, औरंगाबाद इ. १५८ केंद्रांवर CAT २०२१ परीक्षा घेतली जाईल.

CAT २०२१ चा स्कोअर CAT संकेतस्थळावर जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर केला जाईल. CAT २०२१ स्कोअर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच ग्राह्य़ धरण्यात येईल. पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित IIM च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रवेश प्रक्रिया – प्रत्येक IIM आपल्या स्वत:च्या पात्रतेच्या अटी ठेवू शकते. (शैक्षणिक अर्हता किमान गुणवत्ता) आणि वेगवेगळी निवड पद्धती ठरवू शकते. अधिक माहितीसाठी संबंधित IIM च्या संकेतस्थळावर जावे. CAT २०२१ साठी  http://www.iimcat.ac.in या  संके तस्थळावर रजिस्ट्रेशन करून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवावे. CAT २०२१ संकेतस्थळावर  लॉगइन करून ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरावा. अर्ज भरताना  मुलाखतीचे केंद्र (शहर) निवडावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल.

ऑनलाइन अर्ज  http://www.iimcat.ac.in  या संकेतस्थळावर स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे

१५ सप्टेंबर २०२१ (१७.०० वाजे)पर्यंत.

हेल्प डेस्क नंबर १८००२१०१०८८.

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) (Special Recruitment Advertisement No.  ५५/२०२१) एम्प्लॉईज स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये ‘डेप्युटी डायरेक्टर’ ग्रुप-ए पदांची निवड पद्धतीने भरती.

एकूण रिक्त पदे १५१. (अजा – २३, अज – ९, इमाव – ३८, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ६६) (दिव्यांग – ४)

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेशन किंवा अकाऊंट्स किंवा मार्केटिंग किंवा पब्लिक रिलेशन्स किंवा इन्श्युरन्स किंवा रेव्हेन्यू किंवा टॅक्स संबंधित कामाचा गव्हर्नमेंट/पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग/स्वायत्ता संस्था (Autonomous Body)  मधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – एमबीए (फिनान्स) किंवा कायदा विषयातील पदवी किंवा CA/ICWA.

(अजा/अजचे योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनुभवाच्या अटीमध्ये सवलत दिली जाईल.)

वयोमर्यादा – ३५ वर्षे. (इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे, दिव्यांग – ४५ वर्षे)

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – १०, अंदाजे दरमहा वेतन रु. ९६,७३२/-.

प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा असेल.

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड् रिक्रूटमेंट टेस्ट (CSRT)/रिक्रूटमेंट टेस्ट (RT) मधील कामगिरीवर आधारित उमेदवार  मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. मुलाखत १०० गुणांसाठी घेतली जाईल.

रिक्रूटमेंट टेस्ट (RT) – ऑब्जेक्टिव्ह टाइप (MCQ) प्रश्न कालावधी २ तास. (पार्ट-ए – इंग्लिश व पार्ट-बी – जनरल अ‍ॅबिलिटी) सर्व प्रश्नांना समान गुण असतील.

चुकीच्या उत्तरांकरिता प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ इ.

अर्जाचे शुल्क – रु. २५/-. (अजा/अज/दिव्यांग/महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २ सप्टेंबर २०२१ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी टेलिफोन नं. ०११-२३३८५२७१/२३३८११२५/२३०९८५४३.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) (गृहमंत्रालय, भारत सरकार).

गुणवंत खेळाडूंची स्पोर्ट्स कोटा अंतर्गत काँस्टेबल (जनरल डय़ुटी) पदांवर भरती.

पुढील खेळ प्रकारात एकूण २६९ रिक्त पदांची भरती. वेतन – पे-लेव्हल – ३, अंदाजे वेतन दरमहा रु. २७,७७६/- अधिक इतर भत्ते.

(१) बॉक्सिंग – पुरुष – १०,         महिला – १०

(२) ज्युडो – पुरुष – ८,         महिला – ८

(३) स्वीमिंग – पुरुष – १२, महिला – ४

(४) क्रॉस कंट्री – पुरुष – २, महिला – २

(५) कबड्डी – पुरुष – १०

(६) वॉटर स्पोर्ट्स – पुरुष – १०, महिला – ६

(७) वुशू   (Wushu) – पुरुष – ११

(८) जिम्नॅस्टिक्स – पुरुष – ८

(९) हॉकी – पुरुष – ८

(१०) वेट लिफ्टिंग – पुरुष – ८, महिला – ९

(११) व्हॉलिबॉल – पुरुष – १०

(१२) रेस्लिंग- पुरुष – १२, महिला – १०

(१३) हँडबॉल – पुरुष – ८

(१४) बॉडी बिल्डिंग – पुरुष – ६

(१५) आर्चरी – पुरुष – ८, महिला – १२

(१६) तायक्वांडो – पुरुष – १०

(१७) अ‍ॅथलेटिक्स – पुरुष – २०, महिला – २५

(१८) इक्वे स्ट्रियन (हॉर्स रायडर) – पुरुष – २

(१९) शूटिंग – पुरुष – ३, महिला – ३

(२०) बास्केट बॉल – पुरुष – ६

(२१) फुटबॉल – पुरुष – ८

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे. (इमाव – २६ वर्षे, अजा/अज –

२८ वर्षे)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.); महिला – १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.) छाती – पुरुष – ८०-८५ सें.मी. (अज – ७६-८१ सें.मी.) वजन – मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वय यांच्या प्रमाणात.

दृष्टी – जवळची दृष्टी चांगला डोळा एन/६, खराब डोळा एन/९; चष्म्याशिवाय दूरची दृष्टी चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/९.

खेळातील प्रावीण्य – जे दि. १ सप्टेंबर २०१९ ते १४ सप्टेंबर २०१९ दरम्यान प्राप्त केलेले असावे.

वैयक्तिक खेळ – ऑलिम्पिक गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व किंवा नॅशनल गेम्स/नॅशनल स्कूल गेम्स/ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटि चँपियनशिप्समध्ये पदक विजेते खेळाडू.

टीम इव्हेंट्स – इंटरनॅशनल/नॅशनल गेम्स/ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सटिी स्पर्धामधील पदक विजेत्या संघातील सहभाग.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेसाठी ऑनलाइन अ‍ॅडमिट कार्ड जारी केले जाईल.

(१) कागदपत्र पडताळणी, (२) शारीरिक मापदंड चाचणी  (PST), ((३) विस्तृत वैद्यकीय चाचणी (DME).

अधिक माहितीसाठी  http://projects.bsf.gov.in/   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज  http://projects.bsf. gov.in/ या संकेतस्थळावर दि. १४ सप्टेंबर २०२१ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.