30 October 2020

News Flash

नोकरीची संधी

RDAI ची स्क्रूटिनी कमिटी अर्जाची छाननी करून इंटरव्ह्य़ूसाठी उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करेल.

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

* भारतीय बीमा विनियामक और विकास प्राधिकरण (इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया

(IRDAI)) (जाहिरात क्र. IRDAI/HR/INTERNSHIP/2020

दि. ३ मार्च २०२०)

नामांकीत विद्यापीठांतून पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा रिसर्च कोस्रेस करणाऱ्या उमेदवारांना कफऊअक मध्ये मे, २०२० पासून २ / ३ महिन्यांसाठी इंटर्नशीप करण्याची संधी.

पात्रता –

(ए) ५ वर्षांचा इंटिग्रेटेड लॉ कोर्स करणारे चौथ्या वर्षांतील विद्यार्थी किंवा

(बी) पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षांत शिकणारे पदवीधर उमेदवार किंवा

(सी) १ वर्ष कालावधीची पदव्युत्तर पदवी शिकणारे विद्यार्थी किंवा

(डी) पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी जे इन्श्युरन्स / इकॉनॉमिक्स / फायनान्स/मॅनेजमेंटमध्ये पूर्ण वेळ रिसर्च करत आहेत.

इंटर्नशीप ही फक्त इन्श्युरन्समधील प्रोजेक्ट / ट्रेनिंग करण्यासाठी दिली जाईल. इंटर्नशिपचा किमान कालावधी असेल. २ महिन्यांचा जो जास्तीत जास्त ३ महिन्यांचा असू शकतो.

निवड पद्धती – IRDAI ची स्क्रूटिनी कमिटी अर्जाची छाननी करून इंटरव्ह्य़ूसाठी उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करेल. शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना पर्सोनेल इंटरव्ह्य़ू द्यावा लागेल.जे उमेदवार इंटर्नशिपसाठी निवडले जातील त्यांनाच तसे कळविण्यात येईल. इंटर्नशिप IRDAI च्या हैद्राबाद येथील हेड ऑफिसमध्ये मे, २०२० पासून सुरू होईल. उमेदवारांना ऑफिस स्पेस, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर सपोर्ट फॅसिलिटीज दिल्या जातील.

स्टायपेंड – इंटर्नसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना इंटर्नशिपसाठी जाण्यायेण्याचे IIAC चे भाडे परत केले जाईल. इंटर्सना स्वत:ची राहण्याची सोय करावी लागेल.

इंटर्नशिपसाठी दिलेल्या डिपार्टमेंटचे सुपरवायिझग ऑफिसर प्रोजेक्टवर प्रोजेक्ट गाइड म्हणून देखरेख करतील. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर इंटर्नर्सना IRDAI मधील HODS प्रोजेक्टवर प्रेझेंटेशन द्यावे लागेल. एकूण इंटर्न्‍स साधारणत: १० पर्यंत असतील. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज (‘अ‍ॅप्लिकेशन फॉर इंटर्नशिप’ असे लिफाफ्यावर ठळक अक्षरांत लिहावे.) (पुरस्कृत करणाऱ्या संस्थेमार्फत सर्टफिाय केलेले असेल)

पुढील पत्त्यावर दि. २४ मार्च २०२०

(१७.०० वाजे)पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत किंवा  internship@irdai.gov.in यावर मेल करावेत.

The Executive Director (Gen), Insurance Regulatory and Development Authority of India, Survey No. 115/1, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:47 am

Web Title: job opportunities in india job vacancies in india zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारताचा इतिहास
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी
Just Now!
X