सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
सिनियर मॅनेजर (JAG), मेल मोटार सर्व्हिस यांचे कार्यालय, वरळी, मुंबई (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट) (Advt. No. DMS-B/2-8/DriverRectt/xxi/2020/57)‘स्टाफ कार ड्रायव्हरच्या एकूण १६ पदांची भरती.

(अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८)

पात्रता – (दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी) (i) १० वी उत्तीर्ण. (ii) हलके आणि अवजड वाहन (LMV & HMV) चालविण्याचा परवाना. (iii) मोटार मेकॅनिझमचे ज्ञान. (iv) हलके व अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – होम गार्ड किंवा सिव्हील वॉलेंटियरचा ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे. (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे, सरकारी कर्मचारी – ४० वर्षे)

निवड पद्धती – उमेदवारांची निवड वाहन चालवण्याची चाचणी घेऊन केली जाईल (हलके व अवजड वाहन चालविणे).  वाहन चालवण्याच्या चाचणीचा दिनांक, ठिकाण पात्र उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.

वेतन – ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे लेव्हल-२ वर अंदाजे वेतन रु. ३०,०००/- दरमहा.

प्रोबेशन – कालावधी २ वर्षांचा असेल.

अर्जाचा विहित नमुना http://www.indiapost.gov.inया संकेतस्थळावर ‘opportunities’ लिंकवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसोबत (i) वयाचा पुरावा, (ii) शैक्षणिक अर्हता, (iii) ड्रायिव्हग लायसन्स, (iv) वाहन चालविण्याचा अनुभवाचा दाखला, (५) जातीचा दाखला, (vi) इमावसाठी नॉन-क्रिमी लेयर दाखला इ. जोडून पुढील पत्त्यावर दि. ९ ऑगस्ट २०२१ (१७.०० वाजे)पर्यंत पोहोचतील असे स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टाने पाठवावेत.

The Senior Manager (JAG), Mail Motor Services, 134-A, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 018.

जीएआयएल(इंडिया) लिमिटेड (GAIL (I) Ltd.), (एम महारत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग).

पुढील २२० पदांची भरती.

(क) ग्रेड-ई-२, वेतन श्रेणी – रु. ६०,०००/- – १,८०,०००/-, वयोमर्यादा – २८ वर्षे.

(१) सीनियर इंजिनीअर (केमिकल) – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस- १, खुला – ३).

(२) सीनियर इंजिनीअर (मेकॅनिकल) – ५१ पदे (अजा – ८, अज – १, इमाव – १४, ईडब्ल्यूएस- ५, खुला – २०).

(३) सीनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – २६ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस- ३, खुला – १०).

(४) सीनियर इंजिनीअर (इन्स्ट्रमेंटेशन) – ३ पदे (अजा – १, खुला – २).

(५) सीनियर इंजिनीअर (सिव्हिल) – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस- २, खुला – ६).

(६) सीनियर इंजिनीअर (GAILTEL TC/TM) (इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन) – १० पदे (अजा – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस- १, खुला – ४).

(७) सीनियर इंजिनीअर (एन्व्हायरन्मेंट इंजिनीअरिंग) – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

(८) सीनियर ऑफिसर (सी अँड पी) – १० पदे (एम.बी.ए. (मटेरियल्स मॅनेजमेंट) पात्रताधारकांना प्राधान्य) (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस- १, खुला – ४).

(९) सीनियर इंजिनीअर (बीआयएस) (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) – ९ पदे (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस- १, खुला – ३).

पात्रता – पद क्र. १ ते ९ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण.

(१०) सीनियर इंजिनीअर (बॉयलर ऑपरेशन) (केमिकल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३).

पात्रता – केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण आणि बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर प्रोफिशियन्सी सर्टििफकेट.

(११) सीनियर ऑफिसर (ई अँड पी) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

पात्रता -केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/पेट्रोलियम/मायिनग इंजिनीअरिंग पदवी ६०%गुणांसह उत्तीर्ण.

(१२) सीनियर ऑफिसर (फायर अँड सेफ्टी) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस- १, खुला – ४).

पात्रता – फायर/फायर अँड सेफ्टी इंजिनीअरिंग पदवी ६०%गुणांसह उत्तीर्ण. (१ वर्षांचा इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमाधारकांना प्राधान्य दिले जाईल.)

(१३) सीनियर ऑफिसर (मार्केटिंग) – ८ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ३, खुला – १).

पात्रता – इंजिनीअरिंग पदवी किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण आणि एमबीए (मार्केटिंग/ऑइल अँड गॅस/पेट्रोलियम अँड एनर्जी/ एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर/इंटरनॅशनल बिझनेस) किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण.

(१४) सीनियर ऑफिसर (एचआर) – १८ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस- १, खुला – ७).

पात्रता – पदवी किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण आणि एमबीए/एमएसडब्ल्यू (पर्सोनेल मॅनेजमेंट/आयआर/एचआर स्पेशलायझेशनसह किमान ६५%गुण).

(१५) सीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – २ पदे (अजा – १, अज – १).

पात्रता – पदवी किमान ६०%गुणांसह आणि (कम्युनिकेशन/अ‍ॅडव्हर्टाइजमेंट अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/पब्लिक रिलेशन्स/मास कम्युनिकेशन/जर्नालिझममधील मास्टर्स डिग्री/डिप्लोमा किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण)

(१६) सीनियर ऑफिसर (लॉ) – ४ पदे (अज – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता – पदवी किमान ६०%विषयांसह आणि कायदा विषयांतील पदवी किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण किंवा ५ वर्षांची कायदा विषयातील पदवी किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण. (कायदा विषयातील मास्टर्स डिग्री असल्यास प्राधान्य)

(१७) सीनियर ऑफिसर (एफ अँड ए) ५ पदे (अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस- १, खुला – २).

पात्रता – बी.कॉम. किंवा बी.ए. (ऑनर्स इन इकॉनॉमिक्स) किंवा बी.ए./बी.एस्सी. (ऑनर्स इन स्टॅटिस्टिक्स)/बी.ए./बी.एस्सी. (ऑनर्स इन मॅथ्स) किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण आणि एम.बी.ए. (फिनान्स) किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण.

पद क्र. १ ते १७ साठी संबंधित कामाचा १ वर्षांचा एक्झिक्युटिव्ह कामाचा अनुभव आवश्यक.

(II) ग्रेड-ई-१, वेतन श्रेणी – रु. ५०,०००/- – १,६०,०००/.

(१८) ऑफिसर (लॅबोरेटरी) – १० पदे (इमाव – ५, ईडब्ल्यूएस- १, खुला – ४).

पात्रता – एम.एस्सी. (केमिस्ट्री) किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – ३२ वर्षे.

(१९) ऑफिसर (सिक्युरिटी) – ५ पदे (इमाव – २, खुला – ३).

पात्रता – पदवी किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव. (इंडस्ट्रियल सिक्युरिटी डिप्लोमा असल्यास प्राधान्य) वयोमर्यादा – ४५ वर्षे.

(२०) ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) – ४ पदे (इमाव – २, खुला – २).

पात्रता –  एम.ए. (हिंदी) किमान ६०%गुणांसह उत्तीर्ण. (पदवीला एक विषय इंग्लिश अभ्यासलेला असावा.)

इष्ट पात्रता – हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा/डिग्री आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – ३५ वर्षे.

(III) ग्रेड-ई-३, वेतन श्रेणी – रु. ७०,०००/- – २,००,०००/. वयोमर्यादा – ३४ वर्षे.

(२१) मॅनेजर (मार्केटिंग – कमोडिटी रिस्क मॅनेजमेंट) – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता – बी.कॉम. किंवा बी.ए. (ऑनर्स इन इकॉनॉमिक्स) किंवा बी.ए./बी.एस्सी. (ऑनर्स इन मॅथ्स/स्टॅटिस्टिक्स) किंवा इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. (पदवीला किमान ६०%गुण आवश्यक) आणि एम.बी.ए. (फिनान्स) किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित एक्झिक्युटिव्ह कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(२२) मॅनेजर (मार्केटिंग – इंटरनॅशनल एलएनजी अँड शिपिंग) – ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ३).

पात्रता – इंजिनीअरिंग पदवी किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण आणि एमबीए (मार्केटिंग/ऑइल अँड गॅस/पेट्रोलियम अँड एनर्जी/ एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर/इंटरनॅशनल बिझनेस) किमान ६५%गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा एक्झिक्युटिव्ह पदावरील ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.

यातील काही पदे (एकूण – २०) दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहे.

गुणांच्या अटीमध्ये सूट – अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना गुणांत ५%ची सूट.

वयोमर्यादेत सूट (दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी) – अजा/अज – ५ वर्षे; इमाव – ३ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/दिव्यांग यांना शुल्क माफ आहे.) (याविषयीची माहिती careers.gail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) आपले शुल्क   https://formbuilder.ccavenue.com/live/gail-india-limited या URL वर भरावे.

निवड पद्धती – ग्रुप डिस्कशन आणि/किंवा मुलाखत (सीनियर ऑफिसर एफअँड एस आणि ऑफिसर (सिक्युरिटी पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत) (ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) पदासाठी भाषांतर चाचणी आणि मुलाखत).

ऑनलाइन अर्ज – अर्जाचे शुल्क भरल्यास आणि २ स्वयंसाक्षांकित छायाचित्रे आणि स्वाक्षरीझाल्यानंतरच अर्ज ग्राह्य़ धरण्यात

येईल.

ऑनलाइन अर्ज  www.gailonline.com या संकेतस्थळावर (Careers Section) दि. ५ ऑगस्ट २०२१ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.