News Flash

नोकरीची संधी

पात्रता - १० वी उत्तीर्ण.

नोकरीची संधी

सुहास पाटील : suhassitaram@yahoo.com 

इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष उमेदवारांची ‘सेलर्स मॅट्रिक रिक्रूट (म्युझिशियन)‘ च्या एकूण ३३ पदांवर भरती. (बॅच नं. ०२/२०२१)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वय – उमेदवाराचा जन्म दि. १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यानचा असावा.

सांगीतिक पात्रता – गाण्यातील कौशल्य, भारतीय अथवा परदेशी वाद्यांवरील निपुणता (जसे की बोर्ड/स्ट्रिंग/विंड इन्स्ट्रुमेंट्स (जाझ, ड्रम्स सेट, ब्रास ड्रम, स्नेर ड्रम्स, सिंबल्स, नॉन क्रोमॅटिक इन्स्ट्रुमेंट्स))

संगीत क्षेत्रातील अनुभव – (ए) हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी शास्त्रीय संगीतामधील अनुभवाचे संगीत संस्थेकडील प्रमाणपत्र. (बी) विंड इन्स्ट्रुमेंटवरील वेस्टर्न म्युझिक वाजविणाऱ्या उमेदवारांनी ट्रीनीटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडन किंवा रॉयल स्कूल ऑफ म्युझिक, लंडन यांचेकडील किमान इनिशियल ग्रेडचे प्रमाणपत्र. (सी) इतर उमेदवारांनी विविध

स्पर्धांमधील सहभागाचे प्रमाणपत्र अथवा पुरस्कार.

शारीरिक मापदंड – उंची – किमान १५७ सें.मी. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. दृष्टी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा ६/६०, खराब डोळा ६/६०. चष्म्यासह – चांगला डोळा ६/९ आणि खराब डोळा ६/२४.

निवड पद्धती – अंदाजे ३०० उमेदवारांना सांगीतिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी (ढाळ) साठी बोलाविले जाईल. म्युझिक स्क्रीनिंग बोर्ड कॉल अप लेटरमध्ये दिलेल्या तारखेला घेतले जाईल. वय, शैक्षणिक पात्रता, संगीतविषयक प्रमाणपत्रे, सांगीतिक पात्रता आणि शारीरिक क्षमता यांची तपासणी केली जाईल. यातून उत्तीर्ण उमेदवारांना एनरोलमेंट मेडिकल एक्झाम द्यावी लागेल.

शारीरिक क्षमता चाचणी (पीएफ्टी) – ((अ) १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे, (ब) २०  उठा-बशा आणि (क)१० जोरबैठका).

म्युझिक स्क्रीनिंग बोर्डमधून आणि ढाळमधून उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि त्यांना म्युझिक स्क्रीनिंग बोर्डसाठी आयएनएस कुंजली, कुलाबा, मुंबई येथे पाठविले जाईल.

पात्र उमेदवारांना म्युझिकल स्क्रीनिंग टेस्टसाठी कॉल अप लेटर्स कम अ‍ॅडमिट कार्ड्स (सीएलएसीज) भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर सप्टेंबर २०२१ मध्ये उपलब्ध केली जातील.

ऑनलाइन अर्ज करताना स्कॅन करून अपलोड केलेल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (जसे की संगीत प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि रहिवासी प्रमाणपत्र) म्युझिक स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेला सादर करणे अनिवार्य आहे.

म्युझिक सिलेक्शन, शारीरिक क्षमता चाचणी (पीएफ्टी) आणि एनरोलमेंट मेडिकल एक्झामिनेशन यासाठी २-३ दिवस लागतील.

एनरोलमेंट मेडिकल एक्झामिनेशनमध्ये पर्मनंट/टेंपररी मेडिकली अनफिट झालेले उमेदवार मिलिटरी हॉस्पिटलकडे स्पेशालिस्ट रिव्ह्यू मागू शकतील. पर्मनंट मेडिकली अनफिट झालेले उमेदवार स्पेशालिस्ट ओपिनियनसाठी मिलिटरी हॉस्पिटलकडे रु. ४०/- (मिलिटरी रिसिव्हेबल ऑर्डर (एमआरओ) गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये २१ दिवसांच्या आत भरून अपिल करू शकतात.)

प्रशिक्षण – १५ आठवड्यांचा मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑक्टोबर २०२१ पासून आयएनएस चिल्का, ओडिसा येथे सुरू होईल. त्यानंतर २६ आठवड्यांच्या मिलिटरी म्युझिकमधील विशेष प्रशिक्षणासाठी मुंबई येथे पाठविले जाईल.

प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना रु. १४,६००/- दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना पे-मॅटिक्स लेव्हल-३ (रु. २१,७००/- अधिक मिलिटरी स्पेशल पे रु. ५,२००/- वर तैनात केले जाईल.) अंदाजे वेतन दरमहा रु. ३४,४३२/-.

रु. ५० लाखांचे विमा संरक्षण दिले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील गोष्टी तयार ठेवाव्यात. संगीत प्रमाणपत्र, १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, १० वीची मूळ गुणपत्रिका, आधार कार्ड, निळया रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.

ऑनलाइन अर्ज  www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२१ दरम्यान करावेत. (Registration > Log in with Registered Email ID > Click on Current Opportunities > Apply > upload documents)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अ‍ॅण्ड  फिनान्स (IIBF), मुंबई. IIBFच्या कॉर्पोरेट ऑफिस आणि इतर ऑफिसेसमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ च्या एकूण १० पदांची भरती.

पात्रता – कॉमर्स/इकॉनॉमिक्स/बिझनेस मॅनेजमेंट/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स विषयातील पदवी किमान सरासरी ६०%गुणांसह उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – (Desirable) IIBF चा बँकिंग अँड फिनान्स डिप्लोमा किंवा एम.कॉम./एम.ए. (इकॉनॉमिक्स)/एमबीए/सी.ए./ सीएमए/सीएस/सीएफए.

वयोमर्यादा – दि. ३० जून २०२१ रोजी २८ वर्षेपर्यंत.

वेतन – रु. ६,००,०००/- प्रती वर्ष.

निवड पद्धती – IIBF ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीसाठी उमेदवार शॉर्ट लिस्ट करू शकते.

ऑनलाइन परीक्षा दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकता या केंद्रांवर घेणार आहे. (रिर्झंनग – ५० प्रश्न, वेळ ४० मिनिटे; इंग्लिश भाषा- ४० प्रश्न, वेळ ३० मिनिटे;  क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, वेळ ४० मिनिटे; जनरल अवेअरनेस (विशेषत:

बँकिं गच्या संदर्भात) – ४० प्रश्न, वेळ ४० मिनिटे; कॉम्प्युटर नॉलेज – २० प्रश्न, वेळ १० मिनिटे. एकूण २०० प्रश्न, गुण २००, वेळ १४० मिनिटे. त्यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.)

कामाचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांना IIBFच्या मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकता येथील ऑफिसेसमध्ये नेमणूक दिली

जाईल.

ऑनलाइन अर्ज www.iibf.org.in  या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेली लिंक वापरून दि. ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत  करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 12:28 am

Web Title: job opportunities indian navy sailors matric recruits musician akp 94
Next Stories
1 अर्थव्यवस्था : गतिमान मुद्दे
2 नोकरीची संधी
3 आर्थिक विकास
Just Now!
X