सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

कोल इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा एक उपक्रम/महारत्न कंपनी) (जाहिरात क्र. ०१/२०१९) ‘मॅनेजमेंट ट्रेनी’च्या एकूण १,३२६ पदांची भरती.

(१) मायिनग – २८८ पदे.

(२) इलेक्ट्रिकल – २१८, पदे.

(३) मेकॅनिकल – २५८ पदे.

(४) सिव्हिल – ६८ पदे.

पात्रता – पद क्र. १ ते ४ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(५) कोल प्रीपरेशन – २८ पदे.

पात्रता – केमिकल/मिनरल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(६) सिस्टीम्स – ४६ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक . (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/आयटी किंवा एम.सी.ए. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण)

(७) मटेरियल्स मॅनेजमेंट – २८ पदे.

पात्रता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी आणि एमबीए/पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(८) फायनान्स अँड अकाऊंट्स – २५४ पदे.

पात्रता – सीए/आयसीडब्ल्यूए.

(९) पर्सोनेल अँड एचआर – ८९ पदे.

पात्रता – पदवी आणि एमबीए (HR/IR/PM) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(१०) मार्केटिंग अँड सेल्स – २३ पदे.

पात्रता – पदवी आणि पूर्ण वेळ एमबीए (मार्केटिंग) उत्तीर्ण किमान ६०% गुण.

(११) कम्युनिटी डेव्हलपमेंट – २६ पदे. पात्रता – (कम्युनिटी डेव्हलपमेंट/रूरल मॅनेजमेंट इ. मधील पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा एमएसडब्ल्यू इ. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.) (एकूण १०७ पदे विकलांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.)

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०२० रोजी

३० वर्षेपर्यंत. (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, विकलांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत)

ऑनलाइन अर्ज http://www.coalindia.in  या संकेतस्थळावर दि. १९ जानेवारी २०२०

(२३.०० वाजे)पर्यंत करावेत.

शंका-समाधानासाठी संपर्क करा

०२२-६८२०२७१५ सोमवार ते शनिवार

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

ई-मेल आयडी – supportmtrectt.cil@coalindia.in