सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com

बारावी/आयटीआय/डिप्लोमा/बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांची स्टायपेंडिअरी ट्रेनी पदावर भरती.
भारत सरकार, भाभा अणू संशोधन केंद्र (इअफउ), न्यूक्लियर रिसायकल बोर्ड (ठफइ).
(क) तारापूर व कल्पक्कम येथील प्लांट्समधे ‘स्टायपेंडिअरी ट्रेनी‘ च्या एकूण १५६ पदांची भरती आणि कल्पक्कम प्लांटमध्ये ४ पदांची सरळ सेवा भरती.
(१) स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-क (ग्रुप-बी) – एकूण ५० पदे (अजा – ३, अज – ८, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – २, खुला – २३).
विद्याशाखेनुसार रिक्त पदांचा तपशील –
१.१ मेकॅनिकल – १३ पदे (अजा – १, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ६).
१.२ इलेक्ट्रिकल – ६ पदे ( अज – १, इमाव – २, खुला – ३).
१.३ केमिकल – ७ पदे (अज – १, इमाव – २, खुला – ४).
१.४ सिव्हिल – १३ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ५).
१.५ इलेक्ट्रॉनिक्स – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
१.६ इन्स्ट्रुमेंटेशन – ४ पदे (अज – १, इमाव – २, खुला – १).
१.७ केमिस्ट्री – ४ पदे (अज – १, इमाव – १, खुला – २).
पात्रता – (दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी) पद क्र. १.१ ते १.६ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा (किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण) उत्तीर्ण. (पद क्र. १.५ इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा पात्रताधारकसुद्धा पात्र आहेत.)
(पद क्र. १.६ इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा पात्रताधारकसुद्धा पात्र आहेत.)
पद क्र. १.७ केमिस्ट्रीसाठी – बी.एस्सी. (केमिस्ट्री मुख्य विषय व फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स सबसिडिअरी विषयांसह) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.
(२) स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-कक (ग्रुप-सी) – एकूण १०६ पदे (अजा – १, अज – ८, इमाव – २९, ईडब्ल्यूएस् – ७, खुला – ६१).
२.१ प्लांट ऑपरेटर – १५ पदे (अज – ३, इमाव – २, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – ७).
पात्रता – १२ वी (विज्ञान – केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण).
२.२ एसी मेकॅनिक – १ पद (इमाव).
२.३ फिटर – ४५ पदे (अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – २५).
२.४ वेल्डर – ५ पदे (इमाव – २, खुला – ३).
२.५ इलेक्ट्रिशियन – ६ पदे (अज – १, इमाव – २, खुला – ३).
२.६ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ११ पदे (इमाव – ४, खुला – ७).
२.७ मशिनिस्ट – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
२.८ इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – १३ पदे (इमाव – ५, खुला – ८).
२.९ वेल्डर (ॅटअह & ॅळअह) – १ पद (खुला).
२.१० मेकॅनिक डिझेल – ३ पदे (खुला).
२.११ मशिनिस्ट ग्राइंडर – २ पदे (खुला).
पात्रता – पद क्र. २.२ ते २.११ साठी १० वी विज्ञान विषय घेऊन किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील २ र्वष कालावधीचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा २ र्वष कालावधीची अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (ठअउ) उत्तीर्ण.
(आयटीआय कोर्स १ वर्ष कालावधीचा असल्यास उमेदवाराकडे १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक किंवा अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (ठअउ) उत्तीर्ण.)
२.१२ लॅबोरेटरी असिस्टंट – १ पद (अजा).
पात्रता – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण किंवा एस्एस्सी (विज्ञान आणि मॅथ्स विषयांसह) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि लॅबोरेटरी असिस्टंट ट्रेडमधील आयटीआय/ठअउ उत्तीर्ण.
वयोमर्यादा – (दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी)
कॅटेगरी-क पदांसाठी १८ ते २४ वर्षे,
कॅटेगरी-कक पदांसाठी १८ ते २२ वर्षे,
कॅटेगरी-कक पदांकरिता विधवा/परित्यक्ता/ कायद्याने विभक्त महिलांसाठी ३५/३८/४० वर्षे.
कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे.
(अजा/अज/इमाव उमेदवारांना खुला / ईडब्ल्यूएस् गटातील पदांसाठी अर्ज करताना वयोमर्यादेत सूट मिळणार नाही.)
शारीरिक मापदंड – उंची – किमान १६० सें.मी., वजन – किमान ४५.५ कि.ग्रॅ. उमेदवार मेडिकली फिट असल्यास शारीरिक मापदंडामध्ये सूट मिळू शकेल.
प्रशिक्षण कालावधी – स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-क व कॅटेगरी-कक पदांसाठी २ वर्षे.
स्टायपेंड – स्टायपेंडिअरी ट्रेनी कॅटेगरी-क पदांसाठी प्रशिक्षण दरम्यान दरमहा रु. १६,०००/- (पहिल्या वर्षी) आणि रु. १८,०००/- (दुसऱ्या वर्षी).
कॅटेगरी-कक पदांसाठी दरमहा रु. १०,५००/- (पहिल्या वर्षी) आणि रु. १२,५००/- (दुसऱ्या वर्षी).
निवड पद्धती – कॅटेगरी-क पदांसाठी – ४० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असलेली १ तास कालावधीची लेखी परीक्षा. (प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.)
लेखी परीक्षेसाठी डिप्लोमा / बी.एस्सी. स्तरावरील विषयांवर आधारित विचारले जातील.
अंतिम निवड मुलाखतीमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. (लेखी परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)
कॅटेगरी-कक पदांसाठी – निवड पद्धतीमध्ये ३ पायऱ्या असतील.
पहिली पायरी १ – पूर्वपरीक्षा- १ तास कालावधीची वस्तुनिष्ठ ५० प्रश्न असलेली लेखी परीक्षा (गणित – २० प्रश्न, विज्ञान – २० प्रश्न, सामान्यज्ञान – १० गुण) प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण वजा दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. (लेखी परीक्षेत पात्रतेसाठी खुला गट किमान ४०% गुण, राखीव गट किमान ३०% गुण आवश्यक)
दुसरी पायरी २ – प्रगत परीक्षा – पहिल्या पायरीमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना दुसऱ्या पायरीवर प्रगत परीक्षा द्यावी लागेल. यात २ तासांच्या कालावधीसाठी संबंधित ट्रेडवरील ५० वस्तुनिष्ठ पद्धतीच्या प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल.
पात्रतेसाठी किमान गुण खुला गट – ३०% व राखीव गटांसाठी २०% गुण आवश्यक.
तिसरी पायरी -३ – कौशल्य चाचणी- दुसऱ्या पायरीमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची (रिक्त पदांच्या ४ ते ५ पट) ॅ/ठ ॠ ुं२्र२ कौशल्य चाचणी घेतली जाईल. कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची दुसऱ्या पायरीवरील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण – निवडलेल्या उमेदवारांना संबंधित विद्याशाखा/ट्रेडमधील विविध अंगांवर आधारित प्रशिक्षण ठफइ च्या तारापूर/कल्पक्कम प्लांट्समध्ये दिले जाईल.
नियुक्ती – प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर
कॅटेगरी-क ट्रेनीजना सायंटिफिक असिस्टंट-सी पदावर (पे-लेव्हल – ७ मूळ वेतन रु. ४४,९००/) नियुक्त केले जाईल. अंदाजे वेतन दरमहा
रु. ६४,०००/-.
कॅटेगरी-कक ट्रेनिजना टेक्निशियन-बी पदावर (पे-लेव्हल – ३ मूळ वेतन रु. २१,७००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ३३,०००/- किंवा टेक्निशियन-सी पदावर (पे-लेव्हल – ४ मूळ वेतन रु. २५,५००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/) नियुक्त केले जाईल.
(कक) ठफइ, कल्पक्कम येथे ४ पदांची डायरेक्ट रिक्रूटमेंट पद्धतीने भरती.
(१) ढ२३ ठ. ऊफ/०१ – टेक्निशियन-सी (बॉयलर अटेंडंट) – ३ पदे (खुला).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट.
(२) ढ२३ ठ. ऊफ/०२ – टेक्निशियन-बी (पेंटर) – १ पद (अपंग कॅटेगरी एचएचसाठी राखीव).
पात्रता – १० वी किमान ६०% सरासरी गुणांसह उत्तीर्ण आणि किमान २ र्वष कालावधीचा पेंटर ट्रेडमधील आयटीआय/ठअउ सर्टिफिकेट. (१ वर्षांचा आयटीआय कोर्स असल्यास १ वर्षांचा अनुभव आवश्यक)
वयोमर्यादा – दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी (१८ ते २५ वर्षे) (अपंग – १८ ते ३५ वर्षे).
दरमहा वेतन –
टेक्निशियन-सी (पे-लेव्हल – ४ अंदाजे वेतन रु. ३७,०००/-).
टेक्निशियन-बी (पे-लेव्हल – ३ अंदाजे वेतन दरमहा रु. ३३,०००/-).
अर्जाचे शुल्क – ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. कॅटेगरी-क पदांसाठी रु. १५०/-, कॅटेगरी-कक पदांसाठी रु. १००/-. (अजा / अज /अपंग /माजी सैनिक/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)
अजा/अजच्या उमेदवारांजवळ जातीचा दाखला जाहिरातीमध्ये दिलेल्या अनेक्श्चर-१ प्रमाणे असावा.
इमाव उमेदवारांजवळ जातीचा दाखला जाहिरातीमध्ये दिलेल्या अनेक्श्चर-३ प्रमाणे (दि. ३१ जानेवारी २०२१ पूर्वी मिळविला) असावा. शिवाय त्यांनी अनेक्श्चर-२ मध्ये सेल्फ डिक्लेरेशन द्यावयाचे आहे. (संकेतस्थळ recruitment.barc.gov.in )
शंकासमाधानासाठी फोन नं. ०२२-२५५९७८५५/२५५९७९१५/२५५९७९८३.
अजा/अजच्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी येण्या-जाण्याचे भाडे दिले जाईल. त्यासाठी ळअ उ’ं्रेो१े (अनेक्श्चर-६) वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचे असल्यास वेगवेगळे अर्ज शुल्कासहीत भरावेत.
ऑनलाइन अर्ज १ीू१४्र३ेील्ल३.ुं१ू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरील ऌ६ ३ अस्र्स्र्’८ मध्ये दिलेल्या सूचना वाचून मगच करावे. अर्जाच्या शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अगोदर ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. जोवर फी भरली जात नाही, तोवर असा अर्ज अपूर्ण समजला जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा
दि. ३१ जानेवारी २०२१ आहे.
सविस्तर जाहिरात http://www.barc.gov.in किंवा http://www.recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.