सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

man arrested for demand to Send nude photos otherwise threaten to kill
नग्न फोटो पाठव, अन्यथा ठार करण्याची धमकी देणाऱ्यास अटक
RITES Limited hiring 2024
RITES Limited recruitment 2024 : RITES लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या अधिक माहिती…
ZP Pune Bharti 2024 Zilla Parishad Pune conducted new recruitment
ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज…
ITAT Mumbai Recruitment 2024 job in income tax mumbai
ITAT Mumbai Recruitment 2024 : मुंबईत ‘आयकर’ विभागात नोकरीची संधी! पाहा भरतीची माहिती

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित एकूण १३,५७० विविध पदांच्या भरतीसाठी मार्च, २०१९ मध्ये शासनाच्या महाआयटीमार्फत महापोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल बंद झाल्याने सदरची निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील माहे मार्च, २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीमधील नमूद सर्व रिक्त पदांची भरती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

रिक्त पदांसाठी आवश्यक पात्रता –

(१) औषध निर्माता – पात्रता – बी.फार्मसी किंवा डी.फार्मसी.

(२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – बी.एस्सी. (विज्ञान).

(३) आरोग्यसेवक – पात्रता – १० वी (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव.)

(४) आरोग्यसेविका – पात्रता – साहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीसाठी पात्र.

(५) आरोग्य पर्यवेक्षक – बी.एस्सी. किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स.

वयोमर्यादा – दि. १६ एप्रिल २०१९ रोजी खुला गट – १८-३८ वर्षे (मागासवर्गीय – १८-४३ वर्षे, अपंग/प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/आíथकदृष्टय़ा दुर्बल घटक – १८-४३ वर्षे). (आरोग्यसेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी पदासाठी खुलागट ४५ वर्षेपर्यंत आणि आरोग्यसेविका पदासाठी खुलागट – ४० वर्षेपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत.)

परीक्षा शुल्क – मागासवर्गीय – रु. २५०/-, सर्वसाधारण प्रवर्ग – रु. ५००/- (माजी सनिकांना शुल्क माफ आहे.)

अर्ज कसा करावा याच्या सविस्तर सूचना http://www.maharddzp.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवार एकाच अर्जामध्ये पात्र असलेल्या सर्व पदांना अर्ज करू शकतो. (पदानुसार वेगळा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, परंतु प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल. सर्व पदांसाठीची परीक्षा ही एकाच वेळी सर्वत्र घेण्यात येणार आहे. उमेदवारास निवड केलेल्या प्रत्येक पदासाठी आपण अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदेची निवड करावी लागेल. एकापेक्षा अधिक लॉगइन आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवारांची पहिली यशस्वी नोंदणी ग्राह्य़ धरण्यात येईल. नोंदणीविषयी शंकासमाधानासाठी ०७२९२००६३०५ वर संपर्क साधावा.

ज्या उमेदवारांनी माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरिता एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांकरिता अर्ज सादर केले आहेत, त्यांना आता जिल्ह्य़ाचा विकल्प देणे आवश्यक नाही.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरिता उमेदवारांना एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमधील एक किंवा अधिक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा होती. तथापि, आता शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने सदरची आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती ही OMR Vendorमार्फत offline पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने उपरोक्त ५ संवर्गाची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देता येणार आहे. तथापि ५ संवर्गाच्या पदभरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या प्रत्येक संवर्गाची प्रश्नपत्रिका सर्व जिल्हा परिषदांसाठी संवर्गनिहाय सामायिक राहणार आहे. त्यामुळे सन २०१९ च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवाराने एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गाच्या परीक्षेसाठी एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदेमधून अर्ज भरलेले आहेत, त्या उमेदवारांचे सर्व ठिकाणी भरलेले अर्ज ग्राह्य़ धरले जातील. अशा उमेदवारांबाबत त्याने प्रत्यक्ष एकाच जिल्हा परिषदेअंतर्गत आयोजित परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा दिल्यानंतर सदर परीक्षेमध्ये त्याला प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे त्याने ज्या ज्या जिल्हा परिषदेतून सदर पदभरतीसाठी अर्ज भरला आहे, त्या त्या जिल्हा परिषदांच्या सदर पदांकरिताच्या तयार होणाऱ्या गुणवत्ता (प्रवर्गनिहाय) यादीमध्ये त्याचे नाव गुणवत्ता क्रमांकानुसार अंतर्भूत केले जाईल.

शासन निर्णय दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ नुसार दिव्यांगांचे गट देण्यात आल्याने व आरक्षण ४% करण्यात आल्याने काही पदांसाठी दिव्यांगांकरिता आरक्षण लागू केले आहे.

ग्रामविकास विभाग शासन शुद्धीपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र. ९९/आस्था-८ दि. २०.०८.२०२१ ला अनुसरून सर्व जिल्हा परिषदांनी संबंधित पदांचा सुधारित तपशील जाहिरातीमधून प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र. ९९/आस्था-८ दि. १ सप्टेंबर २०२१ जारी झाले आहे. सदरच्या शुद्धिपत्रकाने भरतीसंबंधीचे संभ्रम दूर केले आहेत.

तसेच नव्याने समाविष्ट झालेले दिव्यांग प्रवर्ग व खुल्या प्रवर्गात नव्याने वाढ झालेल्या रिक्त जागांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीनुसार परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराला विभागाच्या दि. २३.०७.२०१८ च्या शासन निर्णयानुसार एक किंवा एकपेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये पदांसाठी अर्ज करता येईल. तसेच एका उमेदवाराला एकास किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहील. परंतु, प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल. तसेच उमेदवाराने परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरिता जिल्हा परिषदेचा विकल्प देणे आवश्यक आहे. याबाबत http://www.maharddzp.com या संकेतस्थळावर जावून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे उमेदवारास प्रवेशपत्र पाठविण्यात येईल.

दिव्यांग व खुल्या प्रवर्गातील पदांसाठी  http://www.maharkddzp.com या  संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दि. आहे २१ सप्टेंबर २०२१ (२३.५९ वाजे)पर्यंत.

परीक्षेचे आयोजन १६ ऑक्टोबर व १७ ऑक्टोबर २०२१.

परीक्षा प्रवेशपत्र ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबपर्यंत डाऊनलोड करता येतील.