राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फटिलायझर्स लिमिटेड, मुंबई एकूण ३५ मॅनेजमेंट ट्रेनीपदांची भरती.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ५)

पात्रता –  बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज – ५५% गुण आवश्यक) आणि एमबीए (मार्केटिंग)

निवड पद्धती –  पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल. मुलाखत. ऑनलाइन टेस्टसाठी ८०% वेटेज आणि मुलाखतीसाठी २० % वेटेज दिले जाईल.

(२) मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) – २५ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ६, खुला – १३)

पात्रता – केमिकल डिसिप्लिनमधील बीई/बीटेक उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) पदवीच्या शेवटच्या दोन वर्षांत सरासरी किमान ५५% गुण आवश्यक. (अजा/अज – ५०%).

निवड पद्धती – गेट-२०१८ स्कोअरवर आधारित शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जाईल. ६०% वेटेज गेट-२०१८ स्कोअरला व ४०% वेटेज मुलाखतीस दिले जाईल.

कमाल वयोमर्यादा – दोन्ही पदांसाठी दि.१ एप्रिल २०१८ रोजी २५वष्रे (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे). १ वर्षांच्या ट्रेिनग दरम्यान दरमहा रु. ३०,०००/- स्टायपेंड दिले जाईल.  वेतन – दरमहा रु. ५०,०००/-. ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर ट्रेनी उमेदवारांना ई-१ ग्रेडवर सामावून घेतले जाईल. परीक्षा शुल्क – रु. ७००/-.

(अजा/अज यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.rcfltd.com या संकेतस्थळावर दि. १२ जून २०१८ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), सतीश धवन स्पेस सेंटर शार, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश (जाहिरात क्र. SDSCSHAR/RMT/०३/२०१८) मध्ये पुढील पदांची भरती.

(१) प्रायमरी टीचर – ६ पदे

(अज – १, इमाव – २, खुला – ३)

(१ पद विकलांग, एलडी/सीपीसाठी राखीव)

पात्रता – १२ वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट (सीटीईटी) उत्तीर्ण.  िहदी/इंग्रजी माध्यमातून शिकविता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – १८ ते ३०

वेतन – रु. ५०,०००/- अंदाजे.

(२) ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर – (टीजीटी) सोशल स्टडिज/मॅथ्स/सायन्स/िहदी/इंग्लिश/ संस्कृत प्रत्येक विषयासाठी १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील पदवी किमान ५०%  गुणांसह उत्तीर्ण. सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट (सीटीईटी) उत्तीर्ण.  िहदी/इंग्रजी माध्यमातून विषय शिकविण्यात प्रावीण्य.

वयोमर्यादा – १८ ते ३५ वष्रे.

वेतन – रु. ६२,०००/-

(३) फायरमन -१ पद (खुला)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

शारीरिक मापदंड – उंची – १६५ सें.मी., वजन – ५० कि., छाती – ८१-८६ सें.मी. शारीरिक मापदंड चाचणी – १०० मी. अंतर १३ सेकंदांत धावणे, उंच उडी – ५ फूट,

लांब उडी – १७ फूट, गोळाफेक (७.२७ कि.) – २४ फूट, क्रिकेट बॉल २२५ फूट दूर फेकणे, १४ फूट दोरखंड फक्त हाताच्या साहाय्याने चढणे, पुलअप्स – १०; १,५०० मी. अंतर ५ मि. १५ सेकंदांत धावणे.

वयोमर्यादा – २८ ते २५ वष्रे.

वेतन – रु. २८,०००/-

(४) ड्रायव्हर कम ऑपरेटर – ३ पदे (२ पदे माजी सनिकांसाठी राखीव)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.  अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि ३ वर्षांचा अनुभव.  शारीरिक मापदंड आणि शारीरिक क्षमता चाचणी.

वयोमर्यादा – १८ ते ३० वष्रे.

वेतन – रु. ३२,०००/-.

(५) सब ऑफिसर – १ पद.

पात्रता –  बीएस्सी (पीसीएम्), सब ऑफिसर्स कोर्स उत्तीर्ण. अवजड वाहन चालविण्याचा परवाना. (्र५) शारीरिक मापदंड व शारीरिक क्षमता चाचणी. (फायरमन पदाप्रमाणे)

निवड पद्धती – लेखी परीक्षा/शारीरिक क्षमता चाचणी/ मुलाखत/स्किल टेस्ट.

ऑनलाइन अर्ज http://www.shar.gov.in या संकेतस्थळावर दि. ८ जून २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com