सुहास पाटील

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये १५४ असिस्टंट मॅनेजर’ (ग्रेड-ए) (रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस (RDBS)/राजभाषा सर्व्हिस/लीगल सर्व्हिस) पदांची भरती.

(ए) असिस्टंट मॅनेजर (RDBS) –

(१) जनरल – एकूण ६९ पदे (अजा – १०, अज – ५, इमाव – १९, ईडब्ल्यूएस – ९,

खुला – २६)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना ४५ %गुण)

(२) जनरल (अ‍ॅग्रिकल्चर) – ४ पदे (अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस- १, खुला – १)

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) किमान सरासरी ५०% गुण (अज/विकलांग ४५. गुण)

(३) अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग – ३ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – १)

(४) फूड/डेअरी प्रोसेसिंग – ३ पदे (अज – १, इमाव – १, खुला – १)

(५) लँड डेव्हलपमेंट-सॉइल सायन्स (अ‍ॅग्रिकल्चर) – ३ पदे (अजा – १, अज – १, खुला – १)

(६) एन्व्हिरॉन्मेंटल इंजिनीअरिंग/सायन्सेस – ४ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १,

खुला – १)

(७) अ‍ॅग्रिकल्चर मार्केटिंग/अ‍ॅग्रिबिझनेस मॅनेजमेंट – २ पदे (इमाव – १, खुला – १)

(८) जिओ इन्फॉरमॅटिक्स – २ पदे (इमाव – १, खुला – १)

(९) अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स/इकॉनॉमिक्स – ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(१०) इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – १२ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – ३).

(११) चार्टर्ड अकाऊंटंट – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३)

(१२) कंपनी सेक्रेटरी – ३ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – १)

(१३) फायनान्स (BBA/BMS) – १६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७)

(१४) ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १)

(१५) स्टॅटिस्टिक्स – २ पदे (इमाव – १, खुला – १)

पात्रता – पद क्र. ३ ते १५ साठी संबंधित विषयातील पदवी किमान सरासरी ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ४५ % गुण)

(बी) असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए (राजभाषा) – ८ पदे (अजा – १, अज – १, खुला – ६).

पात्रता – बी.ए. (हिंदी आणि इंग्रजी विषयांसह) इंग्रजी/हिंदी माध्यमातून किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ४५% गुण)

(सी) असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए (लीगल सर्व्हिस) – ३ पदे (अजा – १, इमाव – १,

खुला – १)

पात्रता – कायदा विषयातील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ४५% गुण) किंवा कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी सरासरी किमान ४५% गुण (अजा/अज/विकलांग – ४०% गुण).

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२० रोजी २१ ते ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, विकलांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत)

निवड पद्धती – फेज-१ – प्रीलिमिनरी एक्झामिनेशन (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न एकूण २०० गुण, वेळ २ तास).

फेज-२ – मुख्य परीक्षा – पेपर-१ – जनरल इंग्लिश (वर्णनात्मक स्वरूपाची) वेळ ९० मिनिटे, १०० गुण. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.)

पेपर-२ – (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची) १०० गुण, वेळ ९० मिनिटे.

फेज-३ – मुलाखत – २५ गुण.

अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील एकत्रित गुणवत्तेनुसार.

प्री-रिक्रुटमेंट ट्रेनिंग (PRT) – नाबार्ड बँक अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांना विनामूल्य प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग देणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी ‘चीफ जनरल मॅनेजर, NABARD यांना तसा वेगळा अर्ज करावा.

महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी पुढील पत्त्यावर अर्ज दि. ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

(r) Chief General Manager, NABARD, 54, Wellesley Road, Shivaji Nagar, Pune – 411 005     किंवा

(s) Chief General Manager (Head Office), NABARD, HRMD, Mumbai – C25/G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

(प्री-रिक्रुटमेंट ट्रेनिंगसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना ठअइअफऊ च्या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत दिला आहे.)

प्रीलिमिनरी एक्झामिनेशनसाठी परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, पणजी-म्हापसा.

मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/पुणे.

परीक्षा शुल्क – रु. ८००/- (अजा/अज/विकलांग – रु. १५०/-).

अर्ज भरताना काही अडचण आल्यास Candidate Grievance Lodging and Redressal Mechanism – (NABARD Officer – in Grade A (RDBS-DR असे सब्जेक्ट मध्ये लिहून) http://cgrs.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.)

ऑनलाइन अर्ज http://www.nabard.org या संकेतस्थळावर दि. ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत करावेत. (Application Registration – Payment of Application Fee – Photograph & Signature Scan and upload).