सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

दिल्ली पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल (असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-िपट्रर ऑपरेटर)’च्या एकूण ५८५ पदांची सरळसेवा भरती करण्यासाठी दिल्ली पोलीस एक्झामिनेशन, २०१९ घेतली जाणार.

वेतन – लेव्हल-४ पे-मॅट्रिक्स रु. २५,५००/- ८१,१००-. अंदाजे वेतन रु. ४०,०००/-.

रिक्त पदांचा तपशील –

(१) हेड कॉन्स्टेबल ( AWO/TPO) पुरुष – ३९२ पदे (अजा – ७६, अज – ४९,

इमाव – ९३, ईडब्ल्यूएस – ४०, खुला – १३४).

हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO) महिला – १९३ पदे (अजा – ३८, अज – २४, इमाव – ४५, ईडब्ल्यूएस – १९, खुला – ६७).

१०% पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०१९ रोजी १८ ते

२७ वर्षे (इमाव – ३० वर्षेपर्यंत, अजा/अज – ३२ वर्षेपर्यंत, विधवा/परित्यक्ता महिला – खुला – ३५ वर्षेपर्यंत, इमाव –  ३८ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४० वर्षेपर्यंत).

पात्रता – बारावी (विज्ञान आणि गणित विषयांसह उत्तीर्ण किंवा मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम ट्रेडमधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC)

उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक तसेच संगणकावर इंग्रजी टायिपग १,०००

क्री-डिप्रेशन १५ मिनिटांत.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-

(अजा/ अज/ माजी सैनिक/ महिला उमेदवारांना फी माफ).

निवड पद्धती –

(१) कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टाईप

(जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, जनरल सायन्स – २५ प्रश्न, गणित – २५ प्रश्न, रिझिनग – २० प्रश्न, कॉम्प्युटर नॉलेज – १० प्रश्न.

एकूण १०० प्रश्न, १०० गुण, कालावधी ९० मिनिटे).

(२) शारीरिक क्षमता टेस्ट व शारीरिक मापदंड तपासणी – फक्त पात्रता स्वरूपाची शारीरिक क्षमता टेस्ट (धावणे, लांब उडी आणि उंच उडी) यांचा समावेश असेल. शारीरिक मापदंड तपासणी

(३) कागदपत्र पडताळणी.

(४) ट्रेड टेस्ट (रीडिंग अँड डिक्टेशन) पात्रता स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजीमधून.

(५) संगणक कौशल्य तपासणी – पात्रता स्वरूपाची.

अंतिम निवड कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशनमधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना ९ महिने कालावधीच्या बेसिक ट्रेिनग कोर्ससाठी पाठविले जाईल. शिक्षणाचे माध्यम हिंदी असेल.

शंका समाधानासाठी संपर्क साधा-

०११-२७४१२७१५/ २७२४१२०५/ २७२४१२०६. फक्तकामाच्या दिवशी ९.३० ते १८.०० वाजेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज http://www.delhipolice.nic.in या संकेतस्थळावर दि. २७ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.