संरक्षण मंत्रालयांतर्गत विस्फोटक डेपो, देहू रोड येथे ट्रेड्समन मेटच्या ३२ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’चा २० ते २६ फेब्रुवारी २०१६ चा अंक पाहावा अथवा http://www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, २९ फिल्ड अ‍ॅम्युनेशन डेपो, देहू रोड,
पुणे- ४१२१०१ या पत्त्यावर १२ मार्च २०१६ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, बंगळुरू येथे प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांना रासायनिक प्रयोगशाळेत काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २७ वर्षे. तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. अर्ज रिजनल डायरेक्टर, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, साऊथ वेस्ट रिजन, भूजल भवन, २७ वा मेन, ७ वा क्रॉस, एचएसआर लेआऊट सेक्टर- १, बंगळुरू- ५६०१०२ या पत्त्यावर १२ मार्च २०१६ पर्यंत पाठवावेत.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, बंगळुरू येथे प्रोजेक्ट असिस्टंटच्या संधी
अधिक तपशीलासाठी http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ मार्च २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

दक्षिण- मध्य रेल्वे: खेळाडूंसाठी १२ जागा
उमदेवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी. अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), जनरल मॅनेजर ऑफिस बिल्डिंग, चौथा मजला, रेल नीलयम्, साऊथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद- ५०००७१ येथे १३ मार्च २०१६ पर्यंत पाठवावेत.

इंजिनीअर्स इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी पदविका अभियंत्याच्या ३४ जागा
उमेदवार नव्याने उत्तीर्ण झालेले पदविका अभियंते असावेत. अधिक माहिती http://www.engineersindia.com या संकेतस्थळावर आहे. या संकेतस्थळावर १४ मार्च २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड- तळोजा (रायगड) येथे ट्रेड अ‍ॅपरेन्टीसची भरती
अधिक माहितीसाठी
हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या http://www.hindustancopper.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. १५ मार्च २०१६ पर्यंत अर्ज करावा.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामती येथील संशोधन साहाय्यकांच्या ८ जागा
अधिक तपशील इन्स्टिटय़ूटच्या http://www.nian.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी ९ मार्च २०१६ रोजी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅनियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, मालेगाव- बारामती- ४१३११५, जि. पुणे येथे सकाळी १०.३० वा. उपस्थित राहावे.

 

द. वा. आंबुलकर