मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी मुंबई येथे कनिष्ठ अभियंता- उपअभियंत्यांच्या १० जागा

अधिक माहितीसाठी  mmrda.maharashtra.gov.in अथवा maharecruitment.mahaonline.gov.in ल्ल’्रल्ली.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  १० मे २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्य़ांमध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अच्या ४१२ जागा भरण्यात येणार असून अधिक माहितीसाठी maha-arogya.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरलेले अर्ज संबंधित जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी कार्यालयात १० मे २०१६ पर्यंत सादर करावेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचकांसाठी ९ जागा

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र-मुंबई येथील प्रशिक्षित व एमएससीआयटी पात्रताधारक  आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी maha-arogya.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१३०५ या पत्त्यावर १० मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

इंडियन ऑइलमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन ऑफिसर्सच्या १७ जागा

उमेदवारांनी जर्नेलिझम्, मास कम्युनिकेशन अथवा जनसंपर्क विषयातील पदव्युत्तर पदविका अथवा पदवी कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा आणि त्यांनी यूजीसी नेट जुलै २०१६ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.

अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.vvmc.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ मे २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, बंगळुरू येथे वरिष्ठ लिपिकांच्या ६ जागा

अधिक माहितीसाठी http://www.iiap.res.in/ job.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.  अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, सेकंड ब्लॉक, कोरामंगला, बंगळुरू- ५६००३४ या पत्त्यावर १३ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

ऑर्डनन्स फॅक्टरी-जबलपूर येथे पदवीधर अभियंत्यांच्या १६ जागा

अर्जदारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अथवा मेटॅलर्जीकल इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज सीनिअर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, खमारिया, जबलपूर ४८२००५ (म,प्र.) या पत्त्यावर १३ मे २०१६पर्यंत पाठवावेत.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी एचआरच्या १५ जागा

उमेदवारांनी पर्सोनेल मॅनेजमेंट, एचआर, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदव्युत्तर, पदविका अथवा पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी युजीसी- नेट जुलै २०१६ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.

अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०१६.

स्टेशन वर्कशॉप-ईएमई, पुणे येथे ट्रेडस्मन म्हणून संधी

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज स्टेशन वर्कशॉप ईएमई, पिन- ९००४४९  िर6 अढड या पत्त्यावर १४ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

सेंटर फॉर फायर, एक्स्पोझिव्हज अ‍ॅण्ड एन्व्हायरॉन्मेंट सेफ्टी, दिल्ली येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या ८ जागा

उमेदवारांनी रसायनशास्त्र अथवा भौतिकशास्त्र पदव्युत्तर पदवी अथवा इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व नेट-गेट प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंटर फॉर फायर, एक्स्पोझिव्हज अ‍ॅण्ड एन्व्हायरॉन्मेंट सेफ्टी, ब्रिगेडियर एस. के. मुझुमदार मार्ग, दिल्ली- ११००५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ मे २०१६.

न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या १८३ जागा

उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, इंस्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग किंवा इंडस्ट्रियल फायर अ‍ॅण्ड सेफ्टीमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अथवा www.upcilonline.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम् येथे चार्जमनच्या १०२ जागा

उमेदवार बीएस्सी पदवीधर अथवा इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिरल सुपरिंटेंडेंट, नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम- ५३००१४ या पत्त्यावर १५ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

फुटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट इन्स्टिटय़ूट, नोएडा येथे ऑफिस असिस्टंटच्या ८ जागा

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा www.fddindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज मॅनेजर (अ‍ॅडमिन अ‍ॅण्ड पर्सोनेल), फुटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट इन्स्टिटय़ूट, ए- १०/ ए, सेक्टर २४, नोएडा- २०१३०१ (जि. गौतमबुद्धनगर) उ.प्र. या पत्त्यावर १५ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) च्या १०० जागा

अर्जदार विज्ञान विषयातील पदवीधर व एमबीए अथवा इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकातील प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा  http://www.aai.aero- onlinerecruitment या संकेतस्थळावर  १७ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

केंद्रशासित दमण प्रदेश प्रशासनात कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.  अर्ज डेप्युटी सेक्रेटरी (पर्सोनेल) युनियन टेरिटोरी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा नगरहवेली, सिल्वासा ३९६२३० या पत्त्यावर १७ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

 

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात संधी

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात हवालदार या पदावर पुढील संधी उपलब्ध आहेत-

जागांचा तपशील : एकूण उपलब्ध जागांची

संख्या- ६३५.  यांपैकी विज्ञान विभागात ३९७ जागा आणि कला विभागात २३८ जागा उपलब्ध आहेत.

आवश्यक अर्हता :  अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्याखेरीज खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक असावेत-

हवालदार- विज्ञान विभाग : एमएस्सी, बीएस्सी, एमसीए, बीसीए, एमटेक, बीटेक, अथवा संगणक विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, माहिती-तंत्रज्ञान यांसारख्या विषयातील बीएस्सी पदवी प्राप्त असावी.

हवालदार- कला विभाग : एमए अथवा इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, उर्दू साहित्य, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित, समाजशास्त्र अशा विषयांसह बीए पदवी प्राप्त असावी.

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा दिल्ली येथे ३१ जुलै २०१६ रोजी घेण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना शिक्षक क्षमता चाचणी, शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागात हवालदार म्हणून दरमहा ५,२००- २०,२०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.

अधिक माहिती : या संदर्भात  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकातील संबंधित जाहिरात पाहावी अथवा www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  १५ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

 

औषधनिर्माणशास्त्राचे पदव्युत्तम अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चतर्फे अहमदाबाद, गुवाहाटी, हाजीपूर, हैद्राबाद, कोलकाता, रायबरेली व मोहाली येथे फार्मसी विषयांतर्गत उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व संशोधनपर पीएचडीच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

एमएस (फार्मसी) : उपलब्ध विषय- मेडिसिनल केमिस्ट्री, नॅचरल प्रॉडक्टस्, ट्रॅडिशनल मेडिसीन, फार्मास्युटिकल अ‍ॅनलिसीस, फार्माकोलॉजी अ‍ॅण्ड टॉक्सिकॉलॉजी, रेग्युलेटरी टॉकीकॉलॉजी, फार्मास्युटिक्ल, बायोटेक्नॉलॉजी, फार्माकोइन्फरमॅटिक व मेडिकल डिव्हायसेस.

एमफार्म : उपलब्ध विषय- फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी (फॉम्र्युलेशन्स), फार्मसी प्रॅक्टिस, क्लिनिकल रिसर्च.

एमटेक फार्मसी : उपलब्ध विषय- फॉर्मास्युटिकल टेक्नॉलॉजी (प्रोसेस केमिस्ट्री), फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी (बायोटेक्नॉलॉजी)

एमबीए- फार्मास्युटिकल मॅनेजमेंट.

संशोधनपर पीएचडी  : फार्मसी विषयाशी संबंधित वरील सर्व विषयात.

शैक्षणिक अर्हता  : शैक्षणिक व निवड पात्रतेच्या संदर्भात  संस्थेच्या एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चच्या www.niperhyd.ac.in/admissions.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहिती : इन्स्टिटय़ूटच्या www.niperhyd.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज पाठविण्याची मुदत : अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑर्गनायिजग चेअरपर्सन, एनआयपीईआर जेईई-२०१६, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, बालानगर, हैद्राबाद- ५०००३७ या पत्त्यावर १३ मे २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.