28 September 2020

News Flash

नोकरीची संधी

भारतीय वायुसेनेत अविवाहित पुरुष उमेदवारांची एअरमेन (ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय) पदांची भरती.

प्रतिनिधिक छायाचित्र

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

*  भारतीय वायुसेनेत अविवाहित पुरुष उमेदवारांची एअरमेन (ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय) पदांची भरती. (Intake 01/2021)

१) एअरमेन (ग्रुप एक्स) –

(एज्युकेशन इन्स्ट्रक्टर ट्रेड वगळता)

पात्रता – बारावी (गणित, फिजिक्स, इंग्रजी विषयांसह किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि इंग्रजी विषयात किमान ५०% गुण आवश्यक किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (ऑनलाइन अर्ज भरताना ड्रॉप इन बॉक्समध्ये दिलेल्या विषयातील) किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण (इंग्रजी विषयात ५०% गुण दहावी / बारावी / डिप्लोमा परीक्षेत मिळालेले असावेत.

२) एअरमेन (ग्रुप वाय)

(ऑटोमोबाइल टेक्निशियन, इंडियन एअर फोर्स (पोलीस), इंडियन एअरफोर्स (सिक्युरिटी), मेडिकल असिस्टंट आणि म्युझिशियन ट्रेड वगळता)

पात्रता – बारावी (कोणत्याही शाखेतील) किमान सरासरी ५०% गुणांसह आणि इंग्रजी विषयात किमान ५०% गुण आवश्यक

३) एअरमेन (ग्रुप वाय) (मेडिकल असिस्टंट)

पात्रता – बारावी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण (इंग्रजी विषयात सरासरी ५०% गुण आवश्यक).

जे उमेदवार ग्रुप एक्ससाठी बारावी पात्रतेनुसार अर्ज करण्यास पात्र आहेत ते ग्रुप एक्स व ग्रुप वाय परीक्षा एका वेळेला देऊ शकतात.

डिप्लोमाधारक फक्त ग्रुप एक्ससाठी पात्र आहेत.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी उमेदवाराचा जन्म १७ जानेवारी २००० ते ३० डिसेंबर २००३ दरम्यानचा असावा.

परीक्षा शुल्क – रु. २५०/- (ऑनलाइन अथवा अ‍ॅक्सिस बँकेत चलनाद्वारे).

शारीरिक मापदंड – सर्व पदांसाठी – उंची १५२.५ सेंमी, छाती किमान ५ सेंमी फुगविता येणे आवश्यक, वजन वय आणि उंची यांच्या प्रमाणात (ऑपरेशन्स असिस्टंट) (एटीएस) ट्रेडसाठी कि. ५५ कि. ग्रॅ. वजन आवश्यक) कॉर्नियल सर्जरी (पीआरके/लासिक) झालेले उमेदवार पात्र नाहीत.

निवड पद्धती – फेज-१ – ग्रुप-एक्स आणि ग्रुप-वाय पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा दि. १९ मार्च ते २३ मार्च २०२० दरम्यान होईल.

ग्रुप एक्ससाठी लेखी परीक्षा कालावधी ६० मिनिटे (इंग्लिश, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स – सीबीएसई बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न)

ग्रुप वायसाठी – कालावधी ४५ मिनिटे (इंग्लिश / सीबीएसई बारावी अभ्यासक्रम)  रिझािनग अ‍ॅण्ड जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न)

ग्रुप ‘एक्स’ आणि ग्रुप वायसाठी एकत्रित परीक्षा कालावधी ८५ मिनिटे, इंग्लिश, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स (बारावी सीबीएसई बोर्डाप्रमाणे) आणि  रिझािनग व जनरल अवरनेस विषयावर आधारित प्रश्न.

प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण दिला जाईल व प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

फेज-२ – फेज -१ मधून शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी www.airmenselection.cdac.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन परीक्षेपासून एक महिन्याच्या आत प्रसिद्ध केली जाईल.

एअरमन सिलेक्शन सेंटरवर फेज २ साठी अ‍ॅडमिट कार्ड उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेलवर पाठविले जातील.

(i) पात्रता तपासण्यासाठी कागदपत्र पडताळणी (ii) शारीरिक क्षमता चाचणी (पीएफटी) –

१.६ किमी अंतर ६ मि. ३० सेकंदांत धावणे,

१० जोरबैठका, १० उठाबशा, आणि २० स्क्व्ॉट्स (पीएफटीमध्ये पात्र होण्यासाठी दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक)

(३) अ‍ॅडाप्टिबिलिटी टेस्ट-१ – ऑब्जेक्टिव्ह टाइप लेखी परीक्षा (जानेवारी ते जून २०२० दरम्यान

४) अ‍ॅडाप्टिबिलिटी टेस्ट-२ – उमेदवार भारतीय वायुसेनेच्या वातावरणाशी आणि मिलिटरी जीवनाशी समरस होता येईल का हे तपासून निवड करण्यासाठी स्टेज-२ टेस्ट घेतल्या जातील.

५) प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ३१ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर होईल.

फेज-३ मेडिकल इक्झामिनेशन.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला जॉइंट बेसिक फेज ट्रेनिंग (जेबीपीटी) साठी बेसिक ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बेळगावी (कर्नाटक) येथे पाठविले जाईल. जेबीपीटी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर दिलेल्या टेड ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. सर्व स्तरावरील ट्रेनिंग यशस्वी केल्यावर उमेदवारांना दिलेल्या टेड नुसार ग्रुप एक्स किंवा ग्रुप वाय पदावर तनात केले जाईल. ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. १४,६००/- स्टायपेंड दिले जाईल.

दरमहा वेतन – ग्रुप एक्ससाठी रु. ३७,७२७/- अधिक इतर भत्ते, ग्रुप वायसाठी रु. ३१,४७३/- अधिक इतर भत्ते. रु. ३७.५ लाखांचे विमा संरक्षण दिले जाईल. सर्व्हिसमध्ये असताना एअरमेनना परीक्षा देऊन कमिशन्ड ऑफिसर बनण्याची संधी मिळते. शिवाय पुढील शिक्षण घेण्याची परवानगी दिली जाते.

ऑनलाइन अर्ज www.airmenselection.cdac.in  वा www.careerindianairforce.cdac.in  या संकेत स्थळावर २० जानेवारी २०२० पर्यंत करता येतील.

शंका समाधानासाठी संपर्क करा

‘President, Central Airmen Selection Board,  Brar, Square, Delhi Cantt. New Delhi – 110 010’

टेली. क्र. ०११ -२५६९४२०९, २५६९९६०६ आणि ई-मेल casbiaf@cdac.in.

अर्ज करण्याविषयीच्या शंकांसाठी ०२०- २५५०३१०५ /२५५०३१०६ वर संपर्क करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 1:10 am

Web Title: job opportunity in india employment opportunities in india zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन
2 करिअर क्षितिज : जीवतंत्रज्ञानाची क्रांती
3 नोकरीची संधी
Just Now!
X