सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रूटमेंट सेंटर. (OFRC जाहिरात क्र. १४५७

दि. ३१/१२/२०१९) देशभरातील ३८ (ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये) ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस बॅच नं. ५६ साठी नॉन-आयटीआय (दहावी उत्तीर्ण) आणि आयटीआय उमेदवारांची एकूण ६,०६० पदांची भरती. (३,८४१ पदे आयटीआयसाठी आणि २,२१९ पदे नॉन-आयटीआय उमेदवारांसाठी)

महाराष्ट्र राज्यातील पुढील १० ऑर्डनन्स फॅक्टरिजमध्ये अ‍ॅप्रेंटिसेसची एकूण रिक्त पदे आहेत १,८६० (८११ पद दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आणि १,०४९ पदे आयटीआय उमेदवारांसाठी)

(१) हाय एक्स्पलोझिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे (HEF) – एकूण ९२ पदे (दहावी पात्रता – ६८ पदे).

(२) मशिन टून प्रोटोटाईप फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे (MTPF) – एकूण ९१ पदे (दहावी पात्रता – ४५ पदे).

(३) ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर – एकूण ३७५ पदे (दहावी पात्रता – ८१पदे).

(४) ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे – एकूण ११० पदे (दहावी पात्रता – ५३ पदे).

(५) ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा – एकूण २५६ पदे (दहावी पात्रता – १९१ पदे).

(६) ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ – एकूण १०३ पदे (दहावी पात्रता – २२ पदे).

(७) ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा, चंद्रपूर – एकूण २२७ पदे (दहावी पात्रता – १६९ पदे).

(८) ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे – एकूण १९ पदे (दहावी पात्रता – ६ पदे).

(९) ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, जि. जळगाव – एकूण १६३ पदे (दहावी पात्रता – ७२ पदे).

(१०) अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी (AF), खडकी, पुणे – एकूण ४२४ पदे (दहावी पात्रता -१०४ पदे).

(I) नॉन-आयटीआय कॅटेगरीमधील पदे –

(१) नॉन-आयटीआय अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) – एकूण ४८६ पदे ((HEF – ६८ पदे, भंडारा – १४० पदे, चंद्रपूर – १६७ पदे, देहूरोड – ४ पदे, वरणगाव – ४३ पदे, आ खडकी – ६४ पदे).

(२) नॉन-आयटीआय मशिनिस्ट – एकूण १३७ पदे (MTPF – १३ पदे, अंबाझरी – ८१ पदे, अंबरनाथ – २१ पदे, भुसावळ – १२ पदे, वरणगाव – १० पदे).

(३) नॉन-आयटीआय मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट) – एकूण ४० पदे

(आ खडकी).

(४) नॉन-आयटीआय फिटर – एकूण ३५ पदे (MTPF – १० पदे, अंबरनाथ – ११ पदे, भुसावळ – ९, वरणगाव – ५ पदे).

(५) नॉन-आयटीआय टर्नर – एकूण २९ पदे (MTPF – १६ पदे, अंबरनाथ – ९ पदे,

भुसावळ – १ पद, वरणगाव – ३ पदे).

(६) नॉन-आयटीआय बॉयलर अटेंडंट – एकूण २९ पदे (भंडारा – २५ पदे, चंद्रपूर – २ पदे, देहूरोड – २ पदे).

(७) नॉन-आयटीआय इन्स्ट्रमेंटेशन – एकूण १२ पदे (भंडारा – १२ पदे).

(८) नॉन-आयटीआय प्लंबर – एकूण १० पदे (भंडारा).

(९) नॉन-आयटीआय मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – एकूण २३ पदे (MTPF – ६ पदे, अंबरनाथ – ८ पदे, वरणगाव – ९ पदे).

(१०) नॉन-आयटीआय रेफ्रिजरेटर अँड एसी मेकॅनिक – एकूण ४ पदे (भंडारा).

(११) नॉन-आयटीआय फाऊंड्री मॅन – एकूण ४ पदे (अंबरनाथ).

(१२) नॉन-आयटीआय मशिनिस्ट ग्राइंडर – एकूण २ पदे (वरणगाव).

नॉन-आयटीआय कॅटेगरीमधील पदांसाठी पात्रता – दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (गणित आणि विज्ञान विषयांत प्रत्येकी किमान ४०% गुण आवश्यक).

(II) एक्स आयटीआय कॅटेगरीमधील पदे –

(१) एक्स आयटीआय् फिटर – २६५ पदे (HEF  – १२ पदे, MTPF – १० पदे, अंबाझरी – ३७ पदे, अंबरनाथ – ११ पदे, भंडारा – ३० पदे, भुसावळ – १० पदे, चंद्रपूर – १० पदे,

देहूरोड – ३ पदे, वरणगाव – २२ पदे).

(२) एक्स आयटीआय मशिनिस्ट – ३५० पदे (MTPV – १४ पदे, अंबाझरी – १२३ पदे, अंबरनाथ – २१ पदे, भंडारा – २ पदे, भुसावळ – १७ पदे, चंद्रपूर – १३ पदे, वरणगाव – ४० पदे).

(३) एक्स आयटीआय टर्नर – १२४ पदे (MTPF – १७ पदे, अंबाझरी – ३६ पदे, अंबरनाथ – ४ पदे, भंडारा – ४ पदे, भुसावळ –

३ पदे, चंद्रपूर – ४ पदे, देहूरोड – २ पदे, वरणगाव – १४ पदे, AF   खडकी – ४० पदे).

(४) एक्स आयटीआय इलेक्ट्रिशियन – १२८ पदे (HEF – १२ पदे, MTPF – ३ पदे, अंबाझरी – २९ पदे, अंबरनाथ – ५ पदे, भंडारा – ११ पदे, भुसावळ – ५ पदे, चंद्रपूर – १४ पदे, देहूरोड –

३ पदे, वरणगाव – ६ पदे, AF खडकी – ४० पदे).

(५) एक्स आयटीआय वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – ५१ पदे (MTPF – २ पदे, अंबाझरी – ९ पदे, अंबरनाथ – २ पदे,

भंडारा – ४ पदे, भुसावळ – ३० पदे, चंद्रपूर – २ पदे, देहूरोड – २ पदे)

(६) एक्स आयटीआय मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – ३० पदे (अंबाझरी – २४ पदे,

अंबरनाथ – ६ पदे).

(७) एक्स आयटीआय पेंटर – १२ पदे (भुसावळ – ६ पदे, चंद्रपूर – ६ पदे).

(८) एक्स आयटीआय मशिनिस्ट ग्राइंडर –

११ पदे (देहूरोड – २, वरणगाव – ९).

(९) एक्स आयटीआय सेक्रेटरियल असिस्टंट – १२ पदे (अंबाझरी).

(१०) एक्स आयटीआय स्टेनोग्राफर – १२ पदे (अंबाझरी).

(११) एक्स आयटीआय कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट – १२ पदे (अंबाझरी).

(१२) एक्स आयटीआय मेसॉन (बिल्डींग कन्स्ट्रक्शन) – ७ पदे (भंडारा – २ पदे,

चंद्रपूर – ५ पदे).

(१३) एक्स आयटीआय कारपेंटर – ८ पदे (भंडारा – ४ पदे, चंद्रपूर – ४ पदे).

(१४) एक्स आयटीआय फाऊंड्रीमेन – ६ पदे (अंबरनाथ).

(१५) एक्स आयटीआय पाईप फिटर – ४ पदे (भंडारा).

(१६) एक्स आयटीआय इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – २ पदे (अंबरनाथ).

एक्स आयटीआय कॅटेगरीतील पदांसाठी पात्रता (दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी) संबंधित ट्रेडमधील ठउश्ळ किंवा रउश्ळ (कळक कोर्स) (दहावी आणि आयटीआयला किमान ५०% गुण आवश्यक).

वयोमर्यादा – दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/अज – २९ वर्षेपर्यंत, विकलांग – खुला – ३४ वर्षे, इमाव – ३७ वर्षे, अजा/अज – ३९ वर्षेपर्यंत, आयटीआय उत्तीर्ण उच्चतम वयोमर्यादेत आयटीआय कोर्सच्या कालावधीपर्यंत).

निवड पद्धती- नॉन-आयटीआय आणि एक्स आयटीआय कॅटेगरीनुसार वेगवेगळी गुणवत्ता यादी बनविली जाईल. नॉन-आयटीआय कॅटेगरीसाठी गुणवत्ता यादी उमेदवारांच्या दहावीतील प्राप्त गुणांवर आधारित ऑर्डनन्स फॅक्टरीनुसार बनविली जाईल. सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार ट्रेड दिले जातील.

एक्स आयटीआय कॅटेगरीसाठी गुणवत्ता यादी उमेदवारांच्या दहावी आणि आयटीआयमधील एकत्रित गुणवत्तेनुसार बनविली जाईल.

(दहावीतील टक्केवारी मिळालेले एकूण गुण व सर्व विषयांसाठी असलेले एकूण गुण यावर आधारित असावी.)

ट्रेनिंगचा कालावधी – नॉन-आयटीआय कॅटेगरीतील पदांसाठी २ वर्षांचा असेल. तर एक्स आयटीआय कॅटेगरीतील पदांसाठी १ वर्षांचा असेल.

स्टायपेंड – उमेदवारांना ट्रेनिंगदरम्यान दरमहा स्टायपेंड अंदाजे पहिल्या वर्षी रु. ८,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ९,०००/- दिले जाईल.

शारीरिक मापदंड – उंची- किमान १३७ सें.मी., वजन – किमान – २५.४कि.ग्रॅ., छाती- किमान ३.८ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/विकलांग/महिला/तृतीयपंथी उमेदवारांना फी माफ आहे.)

एक्स आयटीआय उमेदवार फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करू शकतात. त्यात ते आपला पदासाठीचा पसंतीक्रम देऊ शकतात. विकलांग उमेदवार आपली पात्रता तपासून अर्ज करू शकतात. (आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन्ड कॉपीज अर्जासोबत अपलोड करावयाच्या आहेत.)

ऑनलाइन अर्ज http://www.ofb.gov.in  या संकेतस्थळावर ९ फेब्रुवारी २०२०

(२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.