सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

*     केंद्रीय लोकसेवा आयोग (यू.पी.एस.सी.) (परीक्षा सूचना ०६/२०२० – आय.एम.ओ.एस. दि. १२ फेब्रुवारी २०२०).

‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन २०२०’ साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२० द्यावी लागेल. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षेसाठी निवडले जाईल.

एकूण रिक्त पदे ९०.

पात्रता – बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, जिओलॉजी, झूऑलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, अ‍ॅनिमल हजबंडरी अँड वेटेनिअरी सायन्स, अ‍ॅग्रिकल्चर, फोरेस्ट्री किंवा इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पदवीचा निकाल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी लागणे आवश्यक. ही परीक्षा जुलै/ऑगस्ट, २०२० मध्ये जाहीर होईल.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे. (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत)

शारीरिक मापदंड – पुरुष – उंची – १६३ सें.मी., छाती – ७९ ते ८४ सें.मी. महिला – उंची – १५० सें.मी., छाती – ७४-७९ सें.मी.

निवड पद्धती –

(१) सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.

(२) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षा (लेखी परीक्षा व इंटरव्ह्य़ू)

सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा – दोन पेपर. प्रत्येकी २०० गुणांसाठी.

(१) जनरल स्टडीज पेपर-१ – २०० गुणांसाठी वेळ २ तास.

(२) जनरल स्टडीज पेपर-२ – २०० गुणांसाठी वेळ २ तास. (पात्र ठरण्यासाठी किमान ३३% गुण आवश्यक.)

प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ३३% गुण वजा केले जातील. दोन्ही पेपरांतील प्रश्न िहदी/इंग्रजी भाषेत असतील. पूर्व परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. जनरल स्टडीज पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेसाठी निवडले जातील. साधारणत: रिक्त पदांच्या १२ ते १३ पट उमेदवार निवडले जातील.

पूर्व परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद.

मुख्य परीक्षा – नोव्हेंबर, २०२० मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेसाठी केंद्र – नागपूर, भोपाळ, हैद्राबाद इ. (अ) लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल. पेपर-१ – जनरल इंग्लिश

३०० गुण, पेपर-२ – जनरल नॉलेज ३०० गुण.

पर्यायी विषयांच्या यादीमधून उमेदवारांना दोन विषय निवडावे लागतील.

(१) कृषी, (२) कृषी अभियांत्रिकी,

(३) पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय शास्त्र , (४) वनस्पतीशास्त्र, (५) रसायनशास्त्र,

(६) रसायन अभियांत्रिकी , (७) स्थापत्य अभियांत्रिकी, (८) वनीकरण, (९) भूशास्त्र, (१०) गणित, (११) यंत्र अभियांत्रिकी,

(१२) भौतिकशास्त्र, (१३) संख्याशास्त्र, (१४) प्राणीशास्त्र)

उमेदवारांना पुढील विषय एकत्रपणे निवडता येणार नाही – (१) रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकी; (२) कृषी, कृषी अभियांत्रिकी; (३)  कृषी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय शास्त्र ;

(४) कृषी, वनीकरण; (५) गणित, संख्याशास्त्र;

(६) कोणतेही २ अभियांत्रिकी विषय.

प्रत्येक विषयासाठी दोन पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी असतील. मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स इंग्रजी भाषेत असतील. प्रत्येक पेपरला वेळ दिला जाईल ३ तासांचा.

(ब) पर्सोनॅलिटी टेस्ट – एकूण ३०० गुणांसाठी असेल.

शारीरिक क्षमता चाचणी – पात्रता स्वरूपाची असेल पुरुषांनी २५ कि.मी. अंतर आणि महिला उमेदवारांनी १४ कि.मी. अंतर ४ तासांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/महिला/अपंग/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ मार्च २०२० (१८.०० वाजे)पर्यंत करता येतील.