News Flash

नोकरीची संधी

इंजिनीअरिंग डिप्लोमा/डिग्री पास (मेकॅनिक/प्रॉडक्शन/ऑटोमोबाइल) पात्रताधारकांसाठी-

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

*  इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), औरंगाबाद (भारत सरकारची एक स्वायत्त संस्था) आणि नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इतर मागासवर्गीय’ बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनिवासी ‘नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’.

पात्रता – महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले सद्य:स्थितीत पुढील शिक्षण घेत नसलेले इतर मागासवर्गीय (OBC, EBC आणि DNTs) समाजाचे वय किमान १८ र्वष पूर्ण असलेले उमेदवार.

इंजिनीअरिंग डिप्लोमा/डिग्री पास (मेकॅनिक/प्रॉडक्शन/ऑटोमोबाइल) पात्रताधारकांसाठी-

(१) मास्टर सर्टििफकेट कोर्स इन कॅड/कॅम

(२) मास्टर सर्टििफकेट कोर्स टूल डिझाईन.

इंजिनीअरिंग डिप्लोमा/डिग्री पास

(मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन पात्रताधारकांसाठी-

(१) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन मशीन मेंटेनन्स

अँड ऑटोमेशन.

सर्व कोस्रेसचा कालावधी प्रत्येकी ५ महिने

(७८० तास) प्रशिक्षणार्थी संख्या-

प्रत्येकी २०.

विद्यावेतन- रु. १,०००/- दरमहा विद्यावेतन बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा – इमाव –

रु. ३ लाख आणि EBCs वर्गासाठी रु. १ लाख किंवा अधिकृत अधिकाऱ्यांचे अंत्योदय अन्न योजना (AA) कार्ड किंवा दारिद्रय़रेषेखालील (BPL) कार्ड असलेले उमेदवार पात्र ठरतील.

निवड पद्धती – प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीसाठी

(दि. १२ फेब्रुवारी २०२०) बोलाविण्यात येईल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी मूळ कागदपत्रे व त्यांच्या फोटो कॉपीज दोन सेट बरोबर घेऊन येणे. रोजगारासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल. (प्रामुख्याने मोठय़ा शहरांमध्ये उदा. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक इ.) प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख १७ फेब्रुवारी २०२०. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.

प्रशिक्षण ठिकाण – इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद, पी-३१, एमआयडीसी चिखलठाणा, औरंगाबाद-४३१ ००६.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

(१) विहित नमुन्यातील व फोटोसहित परिपूर्ण अर्ज, (२) दहावी/ बारावी/ डिप्लोमा/ डिग्री इ. प्रमाणपत्रांची प्रत, (३) जातीची प्रमाणपत्रे,

(४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ अंत्योदय अन्न योजना (AA) कार्ड/दारिद्रय़रेषेखालील (BPL) कार्ड, (५) जन्म दाखला,

(६) शाळा सोडल्याचा दाखला, (७) रहिवासी प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड,

(९) पासपोर्ट साइज फोटो (४ प्रती).

पाकिटावर ‘एनबीसीएफडीसी-आयजीटीआर’ असा स्पष्ट उल्लेख करावा.

विहित नमुन्यातील अर्ज आयजीटीआरच्या www.igtr-aur.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विहित नमुन्यातील अर्ज त्या आनुषांगिक कागदपत्रांच्या छायाप्रतींसह दि. ८ फेब्रुवारी २०२० पर्यंत स्पीड अथवा साध्या पोस्टाने किंवा प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.

ई-मेल gm@igtr-aur.org.

फोन- ९३७३१६१२५१/ ९३७३१६१२५२/ ९३७३१६१२५३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 5:13 am

Web Title: job opportunity in india employment opportunities zws 70
Next Stories
1 करिअर क्षितिज : रेणवीय जीवतंत्रज्ञान
2 यूपीएससीची तयारी : परिस्थितीजन्य प्रश्न सोडविताना..
3 नोकरीची संधी
Just Now!
X